DAILY EDUCATION

Wednesday, February 16, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय विज्ञान इयत्ता सातवी

 विषय विज्ञान 








• प्रयोगाची कृती करतो. 

• प्रयोग करताना साहित्य व्यवस्थित हाताळतो. 

• वनस्पतींच्या विविध अवयवांची नावे सांगतो.

• विविध प्रकारच्या फुलांची छायाचित्रे जमवतो.

• हिमप्रदेशातील वनस्पतींची नावे सांगतो.

• वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींची वैशिष्ट्ये सविस्तरपणे लिहितो.

• परिसरातील नदी,ओढे,तलाव अशा जलाशयांना भेटी देतो.

• वाळवंटी प्राण्यांची सचित्र माहिती संग्रहित करतो. 

• आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले अनुकूलन या विषयी माहिती मिळवितो.

• विविध प्रकारच्या पानांचा संग्रह करतो.

• पानांचे विविध भाग दर्शविणारी आकृती काढतो.

• परिसरातील झाडांच्या पानांचे काळजीपूर्वक निरीक्षण करतो. 

• संगणकावर ब्रशच्या साह्याने विविध पानांची चित्रे काढतो. 

• प्राण्यांमधील अनुकूलन कशा पद्धतीने होतो याची माहिती लिहितो. 

• इंटरनेटच्या साह्याने वनस्पतीमधील अनुकूलनाची माहिती मिळवितो. 

• सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे आहे याविषयी माहिती सांगतो.

• कुपोषण म्हणजे काय ते सांगतो. 

• कुपोषण रोखण्यासाठी करता येणाऱ्या उपायांची यादी करतो. 

• मृदेची सुपिकता कमी होण्याची कारणे सविस्तर पणे लिहितो. 

• सहजीवी पोषण हे दगडफूल या वनस्पती वरून समजावून घेतो.

• सपुष्प वनस्पती विषयी सचित्र माहिती संकलित करतो. 

• उपयुक्त मृदेच्या काही प्रकारांची नावे सांगतो.

• पाण्याचे गुणधर्म सविस्तरपणे लिहितो.

• हवेचे गुणधर्म कोणते आहेत हे समजावून घेतो.

• डॅनियल बर्नोलीची इंटरनेटवरून माहिती मिळवतो.

• नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण याविषयी माहिती लिहितो. 

• मृदेचे उपयोग समजाऊन घेतो.

• मृदेतील विविध घटकांच्या नावांची यादी तयार करतो.

• अचूक मापनासाठी वापरायच्या साधनांची माहिती संग्रहित करतो.

• अन्न नासाडी होऊ नये म्हणून काय करावे याविषयी माहिती लिहितो.

• शरीर वाढीस  कारणीभूत घटकावर चर्चा करतो.

• शरीर वाढीसाठी आवश्यक घटकांची नावे सांगतो.

• अन्नभेसळ म्हणजे काय हे प्रत्यक्षरीत्या जाणून घे. 

• अन्नरक्षण पद्धतीवर वर्गात मित्रांसोबत चर्चा करतो 

• मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करतो. 

• त्वरण काढण्याचे सूत्र कसे तयार होते हे समजून घेतो.

• चाल व वेग येथील फरक फलकावर लिहितो.

• अंतर व विस्थापन यांचा परस्पर संबंध समजावून घेतो.

• न्यूटन यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती मिळवितो.

• वीज पडल्यामुळे काय नुकसान होते याविषयी माहिती मिळवितो.

• वीजेमुळे नुकसान होऊ नये म्हणून जनजागृती कशी करावी ते लिहितो. 

• पाठ्यचित्रांमध्ये दिसणार्‍या विविध घटनांमागील कारणे सांगतो.

• थर्मास ची आकृती काढतो.

• विद्युत प्रभार ही संकल्पना स्पष्ट करतो. 

• सरासरी वेग व तात्कालिक वेगाची माहिती लिहितो.

• आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे देतो. 

• चाल,वेग, त्वरण काढण्याची सूत्रे यांचा तक्ता तयार करतो.

• दैनंदिन जीवनात आढळून येणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाच्या विविध उदाहरणांच्या नोंदी घेतो

• उष्णतेमुळे द्रवपदार्थाचे होणारे प्रसरण व आंकुचन प्रयोगाच्या साहाय्याने दाखवतो. 

• उष्णतेचे संक्रमण कसे होते हे उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करतो. 

• ॲल्युमिनियमचा पातळ पापुद्रा वापरून विद्युतदर्शी तयार करण्याचा प्रयोग करतो. 

• स्थितिक विद्युत प्रभार याची वैशिष्ट्ये सविस्तरपणे लिहितो. 

• संकेतस्थळाला भेट देतो.

• आपत्ती व्यवस्थापना संदर्भात माहिती संग्रहित करतो.

• ढगफुटी होण्याची कारणे सविस्तर पणे लिहितो.

• आपत्तीसंबंधी विविध बातम्या गोळा करतो. 

• तापमापी मध्ये पारा वअल्कोहोलचा वापर का करतात याविषयी माहिती लिहितो. 

• उष्णतेचे सुवाहक म्हणजे काय ते सांगून साधनांची यादी करतो. 

• उष्णता संक्रमणाचे प्रकार उदाहरणावरून सांगतो.

• महापुराचे परिणाम याविषयी वर्गात चर्चा करतो.

• किन्वन प्रक्रिये विषयी माहिती मिळवितो.

• सूक्ष्मजीव म्हणजे काय सांगतो.

•सूक्ष्मजीवांची नावे सांगतो.

• संदर्भ पुस्तकांच्या आधारे पेशी विषयी माहिती मिळवितो. 

• पेशीचे मोजमाप करून निरीक्षण करतो. 

• परिसरातील बेकरी व्यवसायाला भेट देतो.

• बेकरी व्यवसायाला भेट देऊन पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती मिळवितो. 

• साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक कशासाठी वापरतात ते सविस्तर लिहितो. 

• सूक्ष्मजीवांचे प्रकार सांगतो.

• वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या सुबक आकृत्या काढून नावे देतो. 

• सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता याविषयी सविस्तर माहिती लिहितो.

• नैसर्गिक बदल म्हणजे काय हे उदाहरणासह स्पष्ट करतो. 

• स्नायूंचे कार्य स्वतःच्या शब्दात सविस्तरपणे लिहितो.

• स्नायू व हाडे यांचा परस्पर संबंध सांगतो.

• पचन संस्थेची आकृती काढून नावे देतो.

• परिच्छेद वाचून बदलाचे प्रकार नोंदवतो.

• नैसर्गिक बदल म्हणजे काय हे उदाहरणासह स्पष्ट करतो.

• सभोवताली होणाऱ्या शिघ्र व सावकाश बदलांची यादी करतो.

• मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर कोणते परिणाम होतो याविषयी लिहितो.

• विविध इंद्रिय संस्थांची माहिती मिळवितो.

• अन्नपचनाची प्रक्रिया स्वतःच्या शब्दात सांगतो.

• सुबक व सुंदर आकृत्या काढतो.

• आरोग्याची सुरक्षा यासंदर्भात तक्ते तयार करतो.

• साबणाच्या प्रकाराची नावे सांगतो.

• साबणाची निर्मिती कशी होते याची कृती करून दाखवितो. 

• अनु व रेणू यातील फरक उदाहरणासहित लिहितो.

• धातुसदृश्य मूलद्रव्यांची नावे सांगतो. 

• इंटरनेट किंवा पुस्तकातून मुलद्रव्या विषयी माहिती मिळवितो. 

• संयुग व मिश्रणे यातील फरक सांगतो.

• पदार्थांच्या अवस्थाची नावे सांगतो.

• दिलेल्या पदार्थांचे विविध अवस्थेत वर्गीकरण करतो.

• कुडाचे घर, मातीचे घर व सिमेंटचे घर यावर संवाद लिहितो.

• सिमेंट कसे तयार होते यावर चर्चा करतो. 

• सीएनजी ची वैशिष्ट्ये सविस्तरपणे लिहितो.

• नैसर्गिक संसाधनाचा विषयी माहिती मिळवितो.

• खनिजे आणि धातुके यातील फरक समजावून घेतो. 

• आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट यातील साम्य व फरक लिहितो.

• निसर्गनिर्मित अपमार्जक यांची माहिती मिळवितो. 

• दात स्वच्छ करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करतात याविषयीची यादी बनवतो. 

• अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यातील फरक स्पष्ट करतो. 

• विविध आकार व रंगाचे शंख-शिंपले यांचा संग्रह करतो.

• विविध खनिजांच्या खाणी विषयी माहिती मिळवतो.

• जंगल संवर्धनासाठी कोणते उपाय योजना कराल याविषयी सविस्तरपणे लिहितो. 

• औषधी वनस्पतीची चित्रासह माहिती मिळवितो.

• जंगलाची कार्य स्पष्ट करतो. 

• प्रकाशाच्या विकरणाची उदाहरणे सांगतो.

• चंद्रग्रहण व सूर्यग्रहण यांच्या विषयी सविस्तर माहिती मिळवितो. 

• ग्रहण लागले म्हणजे काय याविषयी लिहितो.

• लेझर किरणांचा वापर कसा करायचा याविषयी माहिती मिळवितो. 

• दोलनाचा आयाम हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून घेतो.

• दोलन व दोलन गती याविषयीची माहिती मिळवितो.

• ध्वनी संकल्पना विविध उदाहरणावरून स्पष्ट करून घेतो. 

• सूर्यग्रहण पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चष्म्याची माहिती मिळवितो.

• शून्य छाया दिन म्हणजे काय हे पृथ्वीगोलावरून स्पष्ट करतो. 

• दोलकाचा दोलनकाळ व दोलनाची वारंवारिता स्वतःच्या शब्दात लिहितो.

• ध्वनीची तीव्रता व ध्वनीची पातळी याविषयी माहिती देतो. 

• चुंबकीय क्षेत्र समजावून घेतो.

• पृथ्वी एक प्रचंड मोठा चुंबक यावर चर्चा करतो.

• कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या पद्धतीची नावे सांगतो.

• धातूशोधक यंत्राच्या कार्याची माहिती मिळवितो.

• विद्युत चुंबक म्हणजे काय हे समजावून घेतो.

• तारांगण केंद्राला भेट देऊन त्या विषयी माहिती मिळवितो.

• विविध तारकासमुह व आकाश निरीक्षणाची माहिती मिळवितो 

• आकाशाचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेतो.

• दिर्घीकेचे घटक कोणते ते सांगतो. 

• वटवाघुळ याविषयीची माहिती मिळवितो. 

• श्राव्य व अश्राव्य ध्वनी यातील फरक जाणून घेतो.

No comments:

Post a Comment