DAILY EDUCATION

Wednesday, February 16, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय भाषा इयत्ता पाचवी

 विषय भाषा








• बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहेे. 

• स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

• स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो. 

• प्रश्नांची योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

• एखाद्या बाबीचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.

• मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो. 

• बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.

• भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

• बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

• इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

• सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो. 

• स्वतः छोट्या-छोट्या कथा तयार करतो.

• इतरांशी संवाद साधताना देहबोलीचा अनुरूप वापर करतो. 

• कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे.

• बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वांना खूप आवडतो.

• स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

• अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो. 

• उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.

• बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो.

• सुचविलेल्या विषय अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो. 

• सुचविलेल्या कवितेचे अभिनयासह सादरीकरण करतो. 

• सुचविलेला मजकूर पाहून लिहितांना आकर्षक पद्धतीने. लिहितो 

• सुचविलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.

• शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो.

• स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

• इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषेत सांगतो.

• संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

• शब्द मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचुक लिहतो. 

• सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो. 

• सुचविलेल्या कडव्यांचा अर्थ सांगतो. 

• कडव्याचे अर्थ स्पष्ट सांगतो.

• विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न बनवून विचारतो.

• कथा, प्रसंग योग्य आवाजात आशयपूर्ण रीतीने सांगतो.

• सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो.

• दिलेल्या सूचना ऐकतो व योग्य रीतीने अंमलबजावणी करतो. 

• दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकून तंतोतंत पालन करतो. 

• सुचविलेला भाव योग्य स्वराघात व बलाघातासह स्पष्ट वाचतो.

• सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षणीय वाचन करतो. 

• कवितेच्या ओळी ऐकतो व पूर्ण करतो.

• कवितेच्या ओळी ऐकून संपूर्ण कविता म्हणतो.

• शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो

• दिलेल्या सूचना ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो.

• मजकूर लक्षपूर्वक ऐकून अगदी जलद व अचुक लिहतो.

• श्रुतलेखन करतो.

• सुचविलेल्या प्रसंगाचे अभिनयासह सादरीकरण करतो.

• सुचविलेल्या कवितेचे उच्चार करून योग्य कृतीसह सादर करतो. 

•कविता लय,तालासहित सुरेल आवाजात गातो.

•प्रश्‍नांची अचूक उत्तरे देतो.

• संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो. 

• संवाद कथा लक्षपूर्वक ऐकतो.

• भाषा वापरताना व्याकरणिक नियम सहजपणे पाळतो.

• परिचित-अपरिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.

• सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो. 

• चित्र पाहून अनुरुप प्रश्न तयार करतो.

• चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.

• सुचविलेल्या मुद्द्याच्या आधारे कथा तयार करून सांगतो. 

• दिलेला स्वाध्याय व्यवस्थित व अचूक सोडवतो.

• मुद्द्याच्या आधारे सुंदर कथा तयार करतो व सांगतो.

• दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगतो.

• दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.

• शब्दांसाठी अचूक व योग्य नवीन शब्द सांगतो.

• चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.

• चित्र पाहून योग्य भाषाशैलीत वर्णन लिहितो.

• घटनांचे चित्र योग्य क्रमवार लावून दाखवतो.

• सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.

• सर्वांशी योग्य संवाद साधतो. 

•बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो. 

• स्वतःच्या गरजा योग्य भाषेत मांडतो.

• प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तरे देतो.

• सहजपणे भाषण करतो. 

•वादविवाद स्पर्धेत भाग घेतो.

No comments:

Post a Comment