DAILY EDUCATION

Wednesday, February 16, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी विषय भाषा

 विषय भाषा 







• चित्राची माहिती समजून घेतो.

• झाडाचे उपयोग सांगतो.

• झाडाचे महत्त्व समजून घेतो.

• स्वतःच्या कल्पकतेने कवितेला चाली लावतो.

• कवितेचा अर्थ समजून घेतो.

• चित्राचे निरीक्षण करतो.

• कवितेचे हावभावासहित गायन करतो.

• विविध खेळाडूंची माहिती गोळा करतो.

• खेळाडूंची चित्रे जमा करतो. 

• परिसरात खेळल्या जाणाऱ्या खेळांची नावे सांगतो.

• चित्रे पाहून चित्रातील फरक शोधतो. 

• स्वतः वापरलेल्या खेळण्याची यादी बनवतो.

• भिंगरी च्या गमती जमती सांगतो.

• चित्राचे स्वतःच्या शब्दात वर्णन करतो.

• पाठाचा अर्थ समजून घेतो.

• पाठातील चित्रावर प्रश्न विचारतो.

• पोळा सणाची माहिती सांगतो.

• बैलाचे चित्र काढतो.

• बैलाचे उपयोग सांगतो.

• शेतात बैलाद्वारे केल्या जाणाऱ्या कामाची यादी करतो.

• दिलेला परिच्छेद पाटीवर सुंदर अक्षरात लिहितो. 

• फुलपाखराचे चित्र काढतो. 

• कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी बनवतो.

• फुलपाखराप्रमाणे हालचाली करतो.

• सफाईचे महत्व सांगतो.

• सफाईचे महत्व स्वतःच्या शब्दात स्पष्ट करतो.

• साफसफाईची यंत्रणा कशी काम करते यावर लिहितो. 

• पाठातील जोडाक्षर युक्त शब्द शोधतो.

• प्राणी व पक्षाचे वर्णन करतो.

• पाठाचे योग्य आरोह-अवरोह अनुसार वाचन करतो. 

• लाकडापासून गाडी बनवतो.

• कोण कोणती खेळणे आवडतात ते सांगतो.

• चित्रे पाहून चित्रांची नावे सांगतो. 

• चित्रातील वस्तू, प्राणी, पक्षी यांची नावे सांगतो.

• काव्य चित्राचे निरीक्षण करतो 

• हावभावासहित कवितेचे गायन करतो.

• कवितेतील समानार्थी शब्द शोधून लिहितो.

• पाठातील विरुद्धार्थी शब्दांची यादी करतो.

• काव्य चित्राचे निरीक्षण करतो.

• वारा सुटला नसता तर याचा कल्पना विस्तार करतो. 

• स्वच्छतेचे महत्त्व स्वतःच्या शब्दात सांगतो.

• शब्दाच्या शेवटी सारखे असणार्‍या शब्दांची यादी तयार करतो.

• भेळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करतो. 

• चित्र शब्दकोडे पूर्ण करतो.

• पाठाचे वाचन करतो. 

• चांगल्या सवयींची माहिती सांगतो.

• सशाचे सुंदर चित्र काढतो व रंग देतो.

• पाळीव प्राण्यांच्या नावाचा तक्ता तयार करतो.

• पाळीव प्राण्यांची चित्रे वहीत चिटकवतो.

• पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांचा तक्ता तयार करतो.

• चित्र निरीक्षण करून वर्णन करतो.

• मुद्द्यांच्या आधारे परिसराची माहिती सांगतो.

• मुद्द्यांच्या आधारे घराची माहिती सांगतो.

• नातेवाईकांविषयी माहिती सांगतो. 

• पाड्यावरचे राहणीमान कसे असते ते वर्णन करून सांगतो.

• भेळ करण्याच्या उपक्रमात सहभागी होतो.

• पत्राचा परिचय करून नावाऐवजी येणारे शब्द ओळखतो. 

• वारली चित्रकलेविषयी माहिती सांगतो. 

• वारली चित्रकलेप्रमाणे चित्र काढतो.

• नदीचे चित्र काढतो. 

• हत्ती बोलू लागला तर कल्पना करून सांगतो.

• प्राण्यांची चित्रे पाहून नावे सांगतो.

• संवादाचे वाचन करतो.

• संवादावर नाट्यीकरण करतो.

• खीर बनवण्याची कृती सांगतो. 

• विविध प्राण्यांच्या नकला करतो.

• चित्रातील प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील याची कल्पना करतो आणि त्याचे वर्णन करतो.

• संवादाचे हावभावासहित वाचन करतो.

• ऋतूंची माहिती सांगतो. 

• आवडत्या ऋतू विषयी माहिती सांगतो.

• स्वतःच्या कल्पनेने कविता पूर्ण करतो. 

• संगणकाचे सुबक चित्र काढतो.

• संगणकाचे उपयोग सांगतो.

• संगणकावर कोणकोणती कामे केली जातात याची यादी करतो. 

• संगणकाचे दुरुपयोग शोधतो व सांगतो

• पाठयसंवादाचे नाट्यीकरण करतो.

• चिकटलेले शब्द सुटे करून लिहितो.

• दिनदर्शिकेचे वाचन करतो. 

• मराठी महिन्यांची नावे सांगतो.

• इंग्रजी महिन्यांची नावे सांगतो.

• मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसांच्या तारखेला गोल करतो. 

• जाहिरातीवर आधारित प्रश्न विचारतो.

• विविध उदाहरणांद्वारे एक अनेक सांगतो. 

• दिलेले शब्द जसेच्या तसे लिहून दाखवतो.

• दिलेल्या वाक्यात कोण कोणास म्हणाले ते सांगतो.

• उदाहरणावरून कोण म्हणाले असेल ते सांगतो. 

• विविध शब्दातून विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या ओळखतो.

• विविध वाक्य सांगून उच्चारांच्या गंमती सांगतो.

• पाठा विषयी वर्गात चर्चा करतो.

• भारतातील राहणीमान  या बद्दल माहिती मिळवितो. 

• परिसरातील नदी, पर्वत, डोंगर यांची नावे सांगतो.

• पक्षी व प्राण्यांचे नाव सांगून वर्णन करतो.

• आकाशातील गमती जमती सांगतो.

• ग्रहांच्या नावाची यादी तयार करतो.

• विविध शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य बनवतो.

• झाडे-वेलीची माहिती लिहितो. 

• झाडांचे व वेलींचे वर्गीकरण करतो.

• स्वतःच्या शाळेतील गमती जमती सांगतो.

• फुलांचे चित्र काढून सुंदर रंग भरतो.

• फुलांचे चित्रे व नावे याचा तक्ता तयार करुन त्यांच्या गमतीजमती सांगतो. 

• आवडणाऱ्या निसर्गरम्य ठिकाणाचे वर्णन करतो.

• पाहिलेल्या दहीहंडीचे वर्णन स्वतःच्या शब्दात लिहितो. 

• आवडणारी गोष्ट वर्गात सांगतो.

• पाठातील मांजरांनी कशी गंमत केली याचे वर्णन करतो. 

• विविध शब्द उलट्या क्रमाने लिहितो व वाचतो 

•परिसरातील विविध फुले गोळा करून त्यांचा संग्रह करतो. 

• फुलांची चित्रे जमा करुन चिकट वहीत चिकटवतो. 

• दहीहंडीची विविध चित्रे जमा करतो.

• एकच शब्द दोन वेळा वापरून खूप शब्द तयार करतो.

• एका शब्दापासून अनेक शब्द तयार करतो.

• चांदोबा आपल्याशी काय बोलेल याची कल्पना करून सांगतो. 

• आकाशात गेले तर काय पाहाल याचे वर्णन करतो.

• ढगांची माहिती सांगतो.

• कागदापासून सूर्य तारे चंद्र बनवितो

• चांदोबा चे सुंदर चित्र काढतो

• उंदीर मामा चे सुंदर चित्र काढून रंग होतो.

• ज्याप्रमाणे उंदराला पिसारा हवा होता त्याप्रमाणे स्वतःला काय पाहिजे ते सांगतो.

• उंदरांचे दुरुपयोग या विषयी माहिती सांगतो.


No comments:

Post a Comment