DAILY EDUCATION

Friday, February 25, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सहावी विषय शारिरीक शिक्षण

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सहावी








विषय शारीरिक शिक्षण 

• साहित्यासह चालत किंवा धावत जातो.

• जागा बदलत करावयाच्या हालचालींचा सराव करतोो. 

•धावण्याची विविध तंत्रे समजावून घेतो.

•जागेवर उड्या मारतो.

• जागेवर उड्या मारत दिशा बदलतो.

• जागेवर कमी अधिक उंचीच्या उड्या मारण्याचा सराव करतो.

• विविध व्यायाम प्रकाराचा सराव करतो.

• व्यायाम प्रकाराच्या यादी बनवतो.

 • सहकार्‍यांसह व साहित्यासह अवयवाच्या हालचालींचा सराव करतो

• विविध आकार व आकारमानाचे चेंडू अंतरावर फेकतो.

•साहित्यासह करावयाच्या हालचालीची माहिती समजावून घेतो.

• हालचालीचे एकत्रीकरण करून उडी मारतो.

 •उडी मारत गोल फिरण्याच्या कृतीचा सराव करतो.

 •धाडसी व्यायाम प्रकाराविषयी माहिती मिळवितो.

 •तालबद्ध व्यायाम प्रकाराची माहिती मिळवितो.

 • चपळता येणाऱ्या व्यायाम प्रकारांची यादी बनवतो.

• व्यायाम प्रकारांचा सराव करतो.

• व्यायामाच्या माध्यमातून तोल व समन्वय साधण्याचे प्रकार प्रदर्शित करतो.

• सूर्यनमस्कार घालण्याचा सराव करतो.

 •सूर्यनमस्काराचे फायदे सांगतो.

 •सूर्यनमस्कार संबंधित पद्धती सांगून सराव करतो.

• पोषक व्यायामाची संकल्पना समजून घेतो.

 •स्वतःच्या कल्पनेतून नव्या गतिरोध मालिका शोधतो.

• गतिरोध मालिकेविषयी माहिती समजावून घेतो. 

•गतिरोध मालिकेची कृती समजावून घेतो.

• गतिरोधक मालिकेची कृती लिहतो. 

•कवायत संचलनामध्ये हालचालींचा समन्वय साधतो. 

•कवायत संचलनामध्ये कृतीचे प्रात्यक्षिक व सराव करतो.

• पोषक व्यायाम पद्धतीची माहिती संग्रहित करतो.

 •गतिरोध मालिका खेळण्याचा सराव करतो. 

•गतिरोध मालिका फायदे व तोटे याविषयी मित्रांसमवेत चर्चा करतो.

• कवायत संचलन विषयी माहिती सांगतो. 

•मोठ्या खेळातील कौशल्यावर आधारित पूरक खेळ खेळतो.

• पूरक खेळाचे नाव व कौशल्य यांची यादी तयार करतो.

• पूरक खेळाची माहिती करून घेतो.

 •शालेय स्पर्धेत सहभागी होतोो.

• अंतर कुल स्पर्धेचे महत्त्व उपयोग समजावून घेतो.

• शाळेतील विविध उपक्रमाच्या आयोजनात सहभागी होतो.

• नंतर फॉल पद्धती म्हणजे काय याविषयी माहिती लिहितो.

• क्रीडा स्पर्धेची माहिती संकलित करतो.

• विविध सणांची चित्रे व माहिती यांचा तक्ता तयार करतो.

• विविध मुद्रांची माहीती मिळवितो.

• विविध सणांची कृती करतो.

 •मुद्रांच्या नावाची यादी बनवून कृती करतो.

• विविध मुद्राचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. 

•विविध मुद्रांचा सराव करतो.

 •योगाभ्यासाची माहिती मिळवितो.

• योगाभ्यासाचे फायदे समजाऊन घेतो. 

•प्राणायामा विषयी विविध चित्रे गोळा करतो.

• प्राणायामा विषयी चित्रे मिळवून चिकट वहीत चिकटवतो.

• आहाराविषयीची माहिती समजावून घेतो .

•चांगल्या आहाराचे महत्त्व लिहितो. 

•शारीरिक शुद्धीसाठी विविध क्रियांचा सराव का महत्त्वाचा आहे हे समजावून घेतो.

• विविध पर्यायांची माहिती समजावून घेतो.

 •शारीरिक कसरत यांची कृती करून दाखवतो.

• चौरस आहाराचे महत्त्व समजून घेतो.

• चौरस आहाराचे उपयोग सांगतो.

• चांगल्या आहाराचे परिणाम स्पष्ट करतो.

 •प्राणायामाचे जीवनातील महत्त्व लिहितो.

 •वैयक्तिक स्वच्छतेची माहिती मिळवतो.

 •स्वच्छतागृहाची माहिती समजावून घेतो. 

•स्वच्छतागृहाचे महत्त्व पटवून देतो. 

•स्वच्छतागृहाचे फायदे व तोटे यांची यादी बनवतो.

 •अपंग व्यक्तीची मुलाखत घेतो.

• मानवी शरीराचे अवयव व उपयोग यांचा तक्ता तयार करतो. 

•शरीराच्या अवयवांची माहिती मिळवतो.

 •शरीराच्या अवयवांचा तक्ता तयार करतो व वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतो.

• विश्रांती व झोप यांचा संबंध स्पष्ट करतो.

• विश्रांती व झोप यांचे नियम सांगतो.

 •विश्रांती विषयी माहिती सांगतो. 

•विश्रांती विषयी माहिती सांगून जीवनातील महत्त्व स्पष्ट करतो.

• स्वच्छतागृहाचा वापर न केल्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी चर्चा करतो.

 •पोषाखाची निगा कशी राखावी हे स्पष्ट करतो.

 •पोषाख नीटनेटका व स्वच्छ ठेवतो.

• वाईट सवयींना प्रतिबंध घालण्याचे उपाय सुचवतो.

 •वाईट सवयीची माहिती सांगून त्यांचे दुष्परिणाम सांगतो.

• कपडे, मोजे, रुमाल, गणवेश इत्यादी साफ व नीटनेटके ठेवतो

 •क्रिडांगणाचे आखणी करण्याची कृती सांगतो .

•क्रीडांगणाच्या स्वच्छते विषयी माहिती मिळवितो.

• विविध क्रीडांगणाची माहिती मिळवितो.

 •क्रीडांगण व खेळ या विषयीची माहिती संग्रहित करतो.

•क्रीडांगणाचे मोजमाप याविषयीचा तक्ता तयार करतो.

• सुरक्षिततेची माहिती समजावून घेतो.

 •सुरक्षिततेचे महत्त्व स्पष्ट लिहितो.

• क्रीडा प्रकारानुसार साहित्याचा परिचय करून घेतो.

• क्रिडांगणाची निगा कशी राखावी या विषयी माहिती सांगतो.

•प्रथमोपचार पेटीचे महत्व स्पष्ट करतो.

• प्रथमोपचार पेटीतील साहित्याची यादी बनवतो.

• प्रथमोपचार पेटीचे उपयोग सांगतो.

• मुख्य खेळांची यादी बनवतो.

 •खेळ, खेळाचे नियम याची यादी बनवतो.

• खेळ व खेळासंबंधित नियमांचा तक्ता तयार करतो.

• उपक्रमाची माहिती लिहितो.

 •उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करतो.

• शाळाबाह्य उपक्रमाचा सराव करतो.

• क्रीडा स्पर्धेत सहभागी होतो.

• क्रीडा स्पर्धेचे महत्त्व समजावून घेतो.

• खेळ प्रकारानुसार अनुरूप पोशाखाची उपयुक्तता समजून घेतो.

 •सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी क्रिडांगणाची स्वच्छता करतो.

• क्रीडांगण सजवतो.

• विविध खेळांच्या वेळी क्रिडांगणाची आखणी करण्यास मदत करतो. 

•कवायत संचलनाचे नेतृत्व करतो.

No comments:

Post a Comment