• अलंकारिक शब्द •
*अ
• निरक्षर अडाणी - अक्षरशत्रू
• मूर्ख अकलेचा - कांदा
• अतिशय तापट माणूस - अकरावा रुद्र
• सर्वगुणसंपन्न - अष्टपैलू
• ज्याचा उपयोग नाही असे कृत्य - अरण्यरुदन
• फार काळ न टिकणारे - अळवावरचे पाणी
• पदरी असलेला कपटी मनुष्य - अस्तनीतला निखारा
• अतिशय हट्टी - अडेलतट्टू
*ओ
• सुरुवात प्रारंभ - ओनामा
*उ
• दुर्मिळ वस्तु - उंबराचे फूल
• मूर्खपणाचा सल्ला देणारा - उंटावरचा शहाणा
*क
• अतिशय झोपाळू - कुंभकर्ण
• भांडण लावणारा - कळीचा नारद
• दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा - कळसूत्री बाहुले
• उदार मनुष्य - कर्णाचा अवतार
• संकुचित वृत्तीचा - कूपमंडूक
• हडकुळा - काडीपहिलवान
• क्षुद्र लोकांची बडबड - कोल्हेकुई
• अत्यंत कंजूष मनुष्य - कवडीचुंबक
*ख
• शब्दाने खरडपट्टी काढणे - खेटराची पूजा
• मोठे भांडण - खडाजंगी
• जोरदार भांडण - खडाष्टक
• चैनी खोर माणूस - खुशाल चेंडू
• बिनकामाची माणसे आणून केलेली भरती - खोगीरभरती
*ग
• अश्रू - गंगा यमुना
• भीतीदायक संकट - गंडांतर
• मर्म, रहस्य - गुरुकिल्ली
• मंदबुद्धीचा - गुळाचा गणपती
• जन्मापासून श्रीमंत - गर्भश्रीमंत
• गरीब निरुपद्रवी मनुष्य - गोगलगाय
• अतिशय प्रिय असलेली व्यक्ती- गळ्यातील ताईत
*घ
• चिकाटी धरून राहणारा - घोरपड
• घराबाहेर न पडणारा - घर कोंबडा
*च
• मार - चौदावे रत्न
• निरर्थक बडबड - चर्पटपंजरी
*छ
• शत्रुत्व - छत्तीसचा आकडा
*ज
• रागीट - जमदग्नीचा अवतार
*त्र
• धड इकडे ना धड तिकडे - त्रिशंकू
*ट
• कामात नासाडी करणारे लोक - टोळभैरव
*त
• दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा - ताटाखालचे मांजर
• अतिशय प्रिय व्यक्ती - तळहातावरचा फोड
*द
• चांगला सज्जन माणूस - देव माणूस
• कधीही न बदलणारे - दगडावरची रेघ
• घाबरट मनुष्य - दळूबाई
*ध
• सरळ मेहनतीचा मार्ग - धोपट मार्ग
*न
• हो ला हो म्हणणारा - नंदीबैल
• खूप श्रीमंत - नवकोट नारायण
*प
• अर्थ नकळता पाठांतर करणारा - पोपटपंची
• लबाड - पांढरा परीस
• म्हातारे लोक - पिकले पान
• कारस्थान करणारा - पाताळयंत्री
• निसर्गात नसलेली वस्तू - पांढरा कावळा
• अतिशय दुर्मिळ योग - पर्वणी
*ब
• केवळ शाब्दिक वचने - बोलाचीच कडी
• बिन भाड्याचे घर - तुरुंग
• ढोंगी मनुष्य - बोकेसंन्यासी
• बुद्धिमान - बृहस्पती
*भ
• कठीण प्रतिज्ञा - भीष्मप्रतिज्ञा
• बाष्कळ गोष्टी - भाकडकथा
• आटोकाट प्रयत्न - भगीरथ प्रयत्न
*म
• केवळ आभास - मृगजळ
• लांबत जाणारे काम - मारुतीचे शेपूट
• पराक्रमी मनुष्य,मायाळू - मायेचा पूत
• बावळट - मेषपात्र
• दुष्ट स्त्री - मंथरा
• खोटी आशा - मधाचे बोट
• वेडेवाकडे शब्द - मुक्ताफळे
• घनिष्ट मैत्री - मेतकूट
• मुका नसतानाही काहीच न बोलणारा - मुखस्तंभ
*र
• अचूक गुणकारी - रामबाण औषध
*ल
• बेअकली - लंबकर्ण
• अत्यंत गरीब स्त्री - लंकेची पार्वती
*व
• आलेली संधी - वाहती गंगा
• ठेंगणा किंवा बुटका माणूस - वामनमूर्ती
• नकार - वाटाण्याच्या अक्षता
*श
• भित्रा - शेंदाड शिपाई
• कपटी मनुष्य - शकुनीमामा
• प्रारंभ - श्रीगणेशा
*स
• उलट सुलट काम करणारा - सव्यसाची
• उशिरा उठणारा - सूर्यवंशी
• जीव धोक्यात घालणारे काम - सुळावरची पोळी
• अत्यंत भोळा माणूस - सांबाचा अवतार
• तात्कालिक वैराग्य - स्मशानवैराग्य.
• आपत्तीचा काळ - साडेसाती
*ह
• सहज होऊ शकणारी गोष्ट - हातचा मळ
No comments:
Post a Comment