DAILY EDUCATION

Thursday, February 10, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय गणित इयत्ता सहावी

 विषय गणित








• कंसाच्या साह्याने कोनदुभाजक काढून दाखवतो. 

• गुण्य, कर्कटकचा उपयोग वैयक्तिकरित्या करून दाखवितो.

• कंपास, मोजपट्टी, कोनमापक यांचा उपयोग सांगतो.

• विशालकोनाची आकृती काढतो. 

•शून्यकोन कशाला म्हणतात हे आकृतीवरून समजून सांगतो. 

• कोनमापकाच्या साह्याने लघुकोन, विशालकोन काढून दाखवतो. 

• वेगवेगळ्या रंगाच्या कापडाच्या साह्याने कोनाची रचना करून दाखवतो. 

• कोनाच्या आकृत्यावरून त्यांचे नाव ,शिरोबिंदू, बाजू सांगतो 

• विविध प्रकारची चित्रे पाहून त्यातील कोन ओळखतो

• नैसर्गिक संख्यावर आधारित मित्रांमध्ये चर्चा करतो. 

• नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या यातील फरक ओळखतो. 

• नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या यांचा तक्ता तयार करतो.

• संख्यांची उजळणी उदाहरणांच्या साहाय्याने करतो. 

• प्रतलाची आकृती काढून त्यावरून व्याख्या समजून घेतो.

• किरणांची आकृती फलकावर काढून दाखवतो. 

• किरणाची नावे वाचतो.

• ऋण व धन संख्या ओळखतो. 

• ऋण व धन संख्या फळयावर लिहितो. 

• संख्यारेषेवर पूर्णांक संख्या दाखवतो. 

• दिलेली संख्या पूर्णांक रेषेवर अचूक सांगतो. 

• पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतो. 

• अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून दाखवतो.

• दिलेल्या उदाहरणाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करतो. 

• शहराचे तापमान चिन्हाच्या साह्याने लेखन करून दाखवतो. 

• दिलेल्या संख्यांचे धन व ऋण संख्येमध्ये वर्गीकरण करतो. 

• शाब्दिक उदाहरणे दिली असता त्याचे अपूर्णांक रूपात रूपांतर करून लिहितो.

• विविध प्रकारच्या गणिती गंमती गोळा करतो.

 • विविध प्रकारच्या गणिती गंमती वर्गात सांगतो.

 • व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करतो. 

• दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करून दाखवतो. 

• श्रेष्ठ भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे चरित्र मिळवतो. 

• गुणाकार व्यस्त कसा करायचा याची माहिती सांगतो.

• दशांश अपूर्णांकावरील गुणाकाराची उदाहरणे सोडवून दाखवितो. 

• दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा ते समजावून घेतो. 

• व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करून दाखवतो.

• संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवतो. 

• दशांश अपूर्णांकावर आधारित वजाबाकीची उदाहरणे सोडवतो. 

• बाजारात जाऊन वजनांची नोंद करतो. 

• सममिती या शब्दाचा अर्थ समजून घेतो. 

• सममिती असणाऱ्या अक्षरांची यादी बनवतो.

• A ते  Z पर्यंतच्या अक्षरांमधील असममित अक्षरांची यादी बनवतो. 

• माहितीच्या आधारे स्तंभालेख काढतो. 

• स्तंभालेखाची वैशिष्टे सविस्तरपणे लिहितो.

• वर्तमानपत्रे, मासिके यामधून विविध माहिती दर्शवणारा स्तंभा लेखांचा संग्रह करतो.

• माहितीवरून स्तंभालेख कसा काढायचा याविषयी मित्रांमध्ये चर्चा करतो. 

• आलेखाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.

• चित्रलेखाचे स्तंभालेखात रूपांतर करून दाखवतो.

• आलेख कागदाची ओळख करून माहिती सांगतो.

• संख्यात्मक माहितीवरून चित्रालेख काढून दाखवतो.

• दोरा, रंग व घडी घातलेला कागद यांचा उपयोग करून सममित आकार काढतो.

• विविध आकाराच्या सममिती आकृत्या काढून त्यांचा संग्रह करतो.

• विविध आकाराच्या सममित आकृत्या काढून चिकटवहीत चिकटवतो.

• कागदाची ओळख करून घेतो.

• व्यवहारातील विविध वस्तूंचे निरीक्षण करून सममित आकार शोधतो व संग्रह करतो. 

• पाठ्यचित्राचे बारकाईने निरीक्षण करून माहिती सांगतो

• 2 ते 10 पर्यंत चे पाढे क्रमाने लिहून आणतो

• विभाज्यतेच्या कसोट्या समजून घेतो व सांगतो.

• विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या याविषयी माहिती करून घेतो. 

• विभाज्यता या भागावर उदाहरणे समजून घेतोव उजळणी करतो. 

• दिलेल्या संख्यांचा मसावी काढून दाखवतो. 

• गणिता संबंधित विविध प्रकारच्या गणिती कोड्यांचा संग्रह करतो. 

• सारणी वरून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो.

• समीकरणाची उकल म्हणजे काय? हे समजावून घेतो.

• गणिती क्रिया व त्याच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करतो.

• समीकरण ही संकल्पना उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करतो.

• माहिती फलकावर अक्षर वापरून लेखन करतो.

• वैयक्तिकरित्या समीकरण सोडून दाखवतो. 

• माहिती व त्यावरून समीकरणे तयार करून आणतो.

• संख्येसाठी अक्षराचा वापर करून त्याचे निरीक्षण करतो.

• गुणोत्तर प्रमाण यावर वर्गात चर्चा करतो.

• गुणोत्तर कसे काढायचे याची रीत समजावून घेतो.

• गुणोत्तर कसे काढायचे याची रीत समजावून सांगतो.

• दैनंदिन व्यवहारातील प्रमाणाची उदाहरणे गोळा करतो.

• प्रमाणाचे गुणोत्तर रुपात लेखन करतो.

• प्रमाणाची व्यवहारातील उदाहरणे सोडवतो. 

• शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात लिहितो.

• शेकडेवारी ही संकल्पना उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेतो.

• सममूल्य अपूर्णांक याचा उपयोग सविस्तरपणे लिहितो.

• दिलेल्या आकृतीमध्ये आवडीचे रंग भरतो.

• दिलेल्या उदाहरणातील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढतो.

• एकमान पद्धतीवर वर्गात चर्चा करतो. 

• एकमान पद्धतीचा अर्थ समजावून घेतो. 

• शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाचा रूपात लिहितो. 

• अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारी मध्ये करतो.

• नफा-तोटा यावरील उदाहरणांचा संग्रह करतो.

• नफा-तोटा या वरील चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात सांगतो.

• नफा-तोटा याविषयी माहिती समजावून घेतो.

• शेकडेवारीचे सूत्र तयार करून दाखवतो.

• शेकडेवारी वरील शाब्दिक उदाहरण यांचा संग्रह करतो. 

• शेकडेवारी वरील शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 

• घरी खरेदी केलेल्या साहित्याचा तपशील लिहून आणतो.

• नफा काढण्याचे सूत्र तयार करतो.

• नफा म्हणजे काय हे समजावून सांगतो.

• तोटा म्हणजे काय हे उदाहरणावरून समजावून सांगतो.

• तोट्यावरील उदाहरणे वैयक्तिकरित्या सोडवतो.

• व्यवहारात अनुभवास आलेले नफा तोट्याची उदाहरणे सांगतो.

• माहितीच्या आधारे शेकडा नफा शेकडा तोटा यावर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.

• एकूण खरेदी किंमत म्हणजे काय? हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो 

• बँकेचे खाते उघडताना आवश्यक कागदपत्रांची यादी तयार करतो.

• सरळव्याज म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेतो.

• व्याज आकारणी विषयी सविस्तरपणे माहिती लिहितो.

• बँकेविषयी माहिती मिळवितो.

• बँकेच्या कार्याविषयीची माहिती सविस्तरपणे लिहितो.

• बँकेचे व्यवहार करणाऱ्या व्यक्ती विषयीची सविस्तर माहिती संग्रहित करतो.

• बँकेच्या कार्यालयीन कामकाजाचे चित्र काढतो.

• कोनावरून पडणाऱ्या त्रिकोणाच्या प्रकारांचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

• त्रिकोणाचे गुणधर्म सविस्तरपणे क्रमाने लिहितो.

• चौकोनाचे लगतचे कोन कशाला म्हणतात ते सांगतो.

• चौकोनाचे वाचन करून दाखवितो.

• चौकोनाच्या आकृत्यावरून चौकोनाच्या बाजूंची नावे सांगतो.

• चौकोना विषयी माहिती जाणून घेतो.

• त्रिकोणाचे घटक यावर वर्गात चर्चा करतो.

• गुण्याचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढून दाखवतो. 

• कंपासचा उपयोग करून लंब काढण्यास प्रयत्न करतो.

• भौमितिक रचना संकल्पना स्पष्ट करून सांगतो.

• बहुभुजाकृती काढतो व चिकटवहीत चिकटवतो.

• चौकोनाच्या सन्मुख बाजूची आकृती वरून नावे सांगतो 

• गोलाची व्याख्या आकृतीवरून स्पष्ट करतो.

• शंकुची आकृती काढून तिची ओळख करून देतो.

• चौकोनसूची तयार करण्याची कृती क्रमानुसार लिहितो. 

• वृत्तचीतीची आकृती काढून दाखवतो.

• इष्टिकाचितीचा आकार तयार करून दाखवतो. 

• कंपासच्या साह्याने रेषाखंडाचा लंबदुभाजक काढतो. 

• लंबदुभाजक म्हणजे काय हे समजावून सांगतो.

• विविध उदाहरणांचा संग्रह करतो.

• विविध वजनांचा व मापांचा संग्रह करतो.

• रेषाखंड व रेषा यातील फरक समजावून सांगतो.

No comments:

Post a Comment