DAILY EDUCATION

Tuesday, March 1, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी विषय शारीरिक शिक्षण

वर्णनात्मक नोंदी 







विषय शारीरिक शिक्षण

• प्रत्येक खेळात सहभागी होतो.

• क्रीडांगणाविषयी चांगल्या सवयींची माहिती मिळवतो. 

• क्रिडांगणाची स्वच्छता ठेवतो.

• दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.

• स्वतःच्या पोषाखा बाबत अतिशय दक्ष असतो.

• दररोज किमान एक तरी आसन करतो.

• दररोज प्राणायाम नियमितपणे करतो.

• वाईट सवयी, व्यसनांपासून स्वतः दूर राहतो.

• वाईट सवयी कशा घातक आहे हे इतरांना सांगतो.

• व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो.

• खेळ व विश्रांतीचे महत्त्व पटवून देतो.

• नखे व केस नियमितपणे कापतो.

• सुचविलेल्या व्यायाम प्रकारासंदर्भाने विचारपूर्वक व अचूक माहिती देतो.

• कोणत्या खेळात किती खेळाडू असतात सांगतो.

• विविध खेळाडूंची नावे व माहिती ठेवतो.

• दूरदर्शन वरील खेळांचे सामने आवडीने पाहतो.

• क्रिकेट खेळाची विशेष आवड बाळगतो.

• क्रीडांगणा संबंधित चांगल्या सवयी सांगतो व पाळतो. 

• सुदृढ शरीर, सुदृढ मन ही बाब पटवून देतो.

• पारंपारिक खेळ नावे माहिती स्पष्ट करतो.

• आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो.

• खेळांची नावे व त्यांचे नियम यांचा तक्ता तयार करतो.

• खेळलेल्या खेळा संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो. 

• सुचविलेल्या आसन प्रकाराचे अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो.

• आवडत्या खेळाचे नियम बरोबर सांगतो.

• खेळ खेळताना मनोरा कृती करताना कोणत्या दक्षता घ्याव्यात ते सांगतो.

• विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

• व्यायाम प्रकार व आसनांची कृती सांगतो.

• व्यायाम व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

• स्वतःला आवडणाऱ्या खेळाची नियमा सहित माहिती सांगतो.

• दिलेल्या सूचना ऐकून तशी कृती करतो.

• स्वतःला आवडणाऱ्या खेळाची माहिती अगदी अचूक यथार्थ सांगतो.

• दिलेल्या सूचना ऐकून सूचनेप्रमाणे कृती करतो.

• प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग कसा करावा अचूक सांगतो.

• प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग कसा व कशासाठी करावा सांगतो.

• खेळ खेळताना व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे गरजेचे का आहे सांगतो.

• आवडत्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.

• सुचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.

• विचारलेल्या प्रश्नांची अचूक स्पष्ट व योग्य स्वरूपात उत्तरे देतो.

• व्यायाम प्रकार व आसनांची कृती कशी केली ते सांगतो.

• सुचविलेले व्यायाम प्रकार व आसनांची आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

• खेळलेल्या खेळा संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

• सुचविलेल्या आसन प्रकाराचे अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.

• रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो.

• स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो.

• कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.

• चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो.

• नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो.

• दररोज नियमितपणे व्यायाम करतो.

• आरोग्यदायी जीवनशैली यामुळे सहसा आजारी पडत नाही.

• प्रामाणिकपणा व खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहे.

• विविध एरोबिक्स कृती स्वयंप्रेरणेने करतो.

• शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटांना मार्गदर्शन करून खेळ खेळून घेतो.

• क्रीडांगणात कचरा, घाण होऊ देत नाही.

• शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो.

• क्रीडांगणात असलेला कचरा उचलून टाकतो.

• स्वतः कृती करतो व अनुमान लिहितो.

• स्वतः कृती करतो व अनुमान स्पष्टपणे लिहितो.

• दिलेल्या खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.

• दिलेल्या व्यायामप्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो. 

• सुचविलेला व्यायाम प्रकार करताना कृती वैशिष्ट्यपूर्ण करतो. 

• सुचविलेले व्यायाम प्रकार करताना प्रत्येक कृती सफाईदार व अचूकपणे करतो.

• सांघिक खेळात भाग घेतो.

• वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो.

• कमी श्रमात जास्त यश मिळवितो.

• सांघिक व वैयक्तिक खेळ उत्कृष्टपणे खेळतो.

• शर्यतीत सहभाग घेतो व क्रमांक पटकावतो.

• मैदानी खेळात सहभागी होतो.

• खिलाडू वृत्तीने व प्रामाणिकपणे खेळतो.

• खेळ खेळताना प्रामाणिक राहतो.

• इतर मुलांना खेळण्यास प्रोत्साहित करतो.

No comments:

Post a Comment