DAILY EDUCATION

Tuesday, March 1, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी विषय कार्यानुभव

वर्णनात्मक नोंदी







विषय कार्यानुभव

• मातीकाम व कागदकामात विशेष रुची आहे. 

• इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

• पाणी एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती जाणतो.

• सुचविलेला प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो 

• दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.

• विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.

• सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो. 

• प्रत्येक वर्ग मित्राला वाढदिवसाचे भेट कार्ड देतो. 

• उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र घटकाची खूपच मुद्देसूद माहिती देतो.

• श्रमाचे मोल जाणतो.

• इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न करतो.

• दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो. 

• सुचविलेले गीत, कविता तालासुरात म्हणतो. 

• केलेली कृती कशी केली ते सांगतो.

• केलेली कृती व कृतीचा क्रम सांगतो.

• पाठ्यभागातील दिलेल्या घटक बाबींचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो. 

• दिलेल्या कृतीसाठीचे साहित्य हाताळतांना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.

• सुचविलेल्या पाठ्यभागविषय अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.

• सुचविलेल्या पाठ्यभागविषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो.

• पाण्यासंबंधीचे संवाद, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व प्रश्नांची उत्तरे देतो

• परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.

• पाण्यासंबंधीचे घोषवाक्य तयार करतो.

• पाण्यासंबंधीचे सुविचार तयार करतो.

• जल साक्षरता या विषयावर आधारित वर्तमानपत्रे, मासिके यातील कात्रणांचा संग्रह करतो.

• दिलेल्या कृतीसाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.

• सुचविलेली कृती करतांना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.

• पाण्यासंबंधीचे संवाद, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो.

• उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची मुद्देसूद माहिती देतो.

• उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.

• सुचविलेले गीत कविता तालासहित सुरेल आवाजात गातो.

• सुचविलेल्या विषयासंदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

• सुचविलेल्या विषयासंदर्भाने विचारपूर्वक माहिती देतो. 

• दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी साहित्य विचारपूर्वक व सुरेख निवडतो.

• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व योग्य कारणे शोधून सांगतो.

• दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

• दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. 

• दिलेल्या सूचना ऐकतो व योग्य रीतीने अंमलबजावणी करतो. 

• दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो. 

• पाठ्यभागातील दिलेल्या घटक बाबीचे योग्य मुद्यांसह वर्णन करतो.

• परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.

• वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.

• पाण्याच्या वापरा संदर्भाने छोटेखानी नाटक तयार करतो. 

• उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षणीय असतात.

• इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो.

• टाकाऊतून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो. 

• प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे. 

• वर्गातील सर्वांना खूप मोलाची मदत करतो. 

• नळावरचे भांडण खूप सुंदररित्या सांगतो. 

• मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या माहिती ठेवतो.

• सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करून आकर्षक रंगात रंगवितो.

• मातीच्या सुंदर-सुंदर वस्तू तयार करतो व रंगवतो.

• दिलेल्या घटकांपासून योग्य कृतीद्वारे विशेष वस्तू निर्माण करतो.

• दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो.

• शालेय सुशोभन करताना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.

• शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो.

• दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

• दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून लावतो.

• स्वतः कृती करतो.

• स्वतः प्रात्यक्षिक करतो.

• सुचविलेल्या वास्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो.

• कृती अंती स्वतःचे मत अनुभवासह निष्कर्षासह सांगतो. 

• सुचविलेली कृती करतांना कृती वैशिष्ट्यपूर्ण व जलद गतीने अचूक करतो.

• परिसरातील आवश्यक घटकांबाबत ज्ञान मिळवतो.

• पाणी व त्याचे महत्त्व सांगतो.

• पाण्याचे उपयोग सांगतो.

• पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा याविषयी मित्रांमध्ये चर्चा करतो.

• इतरांनी तयार केलेल्या वस्तूंची स्तुती करतो.

• सर्वांशी मिळून मिसळून राहतो.

No comments:

Post a Comment