DAILY EDUCATION

Sunday, March 6, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय भूगोल इयत्ता सहावी



• पृथ्वीगोलाच्या साह्याने रेखांश, रेखावृत्त याचे स्पष्टीकरण करतो. 

• वृत्तजाळीचे उपयोग सविस्तरपणे लिहितो.

• गोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते काढून दाखवतो. 

• अक्षांश व रेखांश याच्या मदतीने ठिकाणाचे स्थान सांगतो.

• पृथ्वीगोलाच्या साह्याने अक्षवृत्ते व रेखावृत्ते याचा वाचन करतो.

• पृथ्वीगोल नकाशा व अक्षांश व रेखांश याचे माप सांगतो. 

• मोबाईल वरून गुगल मॅप च्या मदतीने जीआय एस व जी पी एस प्रणाली ओळखतो.

• पृथ्वीगोलाच्या मदतीने विषुववृत्तचा अर्थ सांगतो.

• पृथ्वीगोलाच्या मदतीने अक्षवृत्तांची मुल्ये सांगतो. 

• संत्र्याच्या साह्याने वर्तुळाचे अंशात्मक मूल्य व दोन्ही ध्रुव समजावून घेतो.

• प्रमुख वृत्ते नकाशावर दाखवितो.

• चेंडु अथवा गोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते काढून वृत्तजाळी तयार करतो.

• आकृतीच्या आधारे महत्त्वाच्या वृत्तांची ओळख करून घेतो.

• पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून विविध प्रश्न विचारतो.

• अक्षवृत्ते व रेखावृत्ते त्यांची मूल्ये लिहितो.

• आकृतीच्या आधारे स्थान व विस्तार संबंधी प्रश्नांची उत्तरे सांगतो.

• वृत्तांचे महत्त्व, वापर सांगतो.

• भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी जवळच्या ठिकाणाला भेट देतो. 

• निरीक्षणावरून पृथ्वीगोल व नकाशा मधील फरक सांगतो. 

• पृथ्वीगोल, जगाचा व भारताच्या नकाशाचे निरीक्षण करतो. 

• भारतातून जाणारे वृत्त व स्थाने समजावून घेतो.

• तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती लिहितो.

• आकृतीच्या सहाय्याने तापमान पट्टी समजावून घेतो.

• हवा व हवामान यातील फरक सांगतो.

• पाण्याचे तापणे व थंड होणे हे प्रयोगाच्या आधारे करून दाखवतो 

• परिसरातील हवेचे वर्णन करतो.

• शाळेतील तापमापक वापरून तापमानाच्या नोंदी वर्ग फलकावर लिहितो.

• विजेरीच्या प्रकाशझोताच्या साह्याने लंबरूप व तिरप्या भागावर व्यापलेले क्षेत्र निरीक्षण करतो.

• सरळ, तिरप्या सूर्यकिरणांमुळे पृथ्वी गोलावरील तापमानातील फरक सांगतो.

• हवा व हवामान या विषयी माहिती समजावून घेतो.

• वारे, आद्रता, वृष्टी या हवेच्या अंगाची माहिती सांगतो.

• क्षेत्रभेटीच्या दरम्यान प्रश्नावली तयार करून मुलाखती घेतो.

• पृथ्वीगोल याविषयी प्रतिकृतीच्या साह्याने माहिती देतो. 

• द्विमीत व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये सविस्तरपणे लिहितो. 

• महासागर व हवामानाबद्दल चर्चा करतो.

• मिठाचे महत्त्व सांगतो.

• जलावरणातील सजीवांविषयी उत्तरे सांगतो.

• जागतिक तापमानाचे वितरण वैशिष्ट्यांसह लिहितो.

• सागरी प्रवाह स्पष्ट करून सांगतो.

• तापमापकाची रचना व तापमापक हाताळतो.

• प्रयोगाच्या साह्याने पाण्याचे बाष्पीभवन करून दाखवतो.

• सागराचे पाणी खारट होण्याची कारणे व परिणाम स्पष्ट करतो

• महासागरातून मिळणाऱ्या पदार्थांची यादी करतो. 

• महासागराचे प्रदूषण व त्यामुळे होणारे परिणाम यावर चर्चा करतो.

• जगातील महासागरांची माहिती चित्रासह संकलित करतो.

• परिसरातील डोंगर, नदी, जमीनीवरून विविध आकाराचे दगड मिळवितो.

• अग्निजन्य खडकाची निर्मिती प्रक्रिया व उपयोग सांगतो. 

• महासागरातील जलमार्ग व त्याचे फायदे सांगतो.

• निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे प्रकार सांगतो.

• चित्र व आकृतीच्या साह्याने पृथ्वीवरील जलसाठा व उपलब्धता सांगतो.

• विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.

• दिलेल्या मुद्द्याद्वारे प्रश्न विचारतो.

• परिसरातील ऐतिहासिक किल्ला, धरण, मंदिराला भेट देऊन खडकाची माहिती मिळवितो.

• नमुन्याच्या मदतीने खडक प्रकारची तुलना करतो.

• महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचे वितरण समजावून घेतो. 

• गाळाच्या खडकांची निर्मिती व उपयोग सांगतो.

• रूपांतरित खडकांची निर्मिती व उपयोग सांगतो. 

• लाकूड, कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूची माहिती देतो. 

• पदार्थावर आधारित व प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधनांची यादी तयार करतो.

• भारतातील विद्युत निर्मिती केंद्रे नकाशात दाखवतो.

• विद्युत केंद्राची सचित्र माहिती लिहितो. 

• ऊर्जासाधनांचा वापर करून कोणकोणती विद्युत निर्मिती होते ते लिहितो.

• पदार्थावर आधारित व प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधनांची तुलना करतो.

• चित्रे व नकाशाच्या मदतीने वनस्पतीचे अक्षवृत्तीय वितरण समजावून घेतो.

• नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीची माहिती देतो.

• नैसर्गिक संसाधने ओळखतो.

• नैसर्गिक संसाधनाचा वापर कसा करावा याविषयी मित्रांमध्ये चर्चा करतो.

• गोड पाणी असणाऱ्या स्त्रोतांची चित्रे जमवितो व माहिती लिहितो.

• सागरी वने व वनांचे प्रकार चित्राच्या मदतीने सांगतो.

• भारताच्या नकाशात विद्युत निर्मिती केंद्र दाखवतो.

• सौरचूल, दिवे, कुकर, हिटर इत्यादी उपकरणाची ओळख करून देतो.

• परिसरात आढळणाऱ्या व्यवसायांची यादी तयार करतो. 

• प्राथमिक व्यवसाय कोणते ते लिहितो.

• भूगर्भीय ऊर्जा निर्मिती केंद्राची माहिती देतो. 

• पवन ऊर्जेची निर्मिती व वापराबाबत चर्चा करतो.

• आपल्या राज्यातील जलविद्युत केंद्रांची माहिती मिळवितो.

• कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची चित्राद्वारे माहिती मिळवितो.

• सागरी लाटांपासून ऊर्जा निर्मिती बाबत माहिती लिहितो.

• बायोगॅस यंत्रास भेट देऊन माहिती मिळवतो. 

• आकृतीच्या आधारे कोळसा व खनिजतेल क्षेत्र ओळखतो.

• कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची चित्राद्वारे माहिती मिळवितो.

• आकृतीच्या सहाय्याने देशातील व्यवसायातील मनुष्यबळ समजावून घेतो.

• तृतीयक व्यवसाय यांची भेट घेऊन माहिती मिळवितो.

• परिसरातील व्यवसायावर परिणाम करणारे घटक कोणते ते सांगतो.

• निसर्गाचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतो ते लिहितो.

• परिसरातील व्यवसायांचे प्राथमिक चतुर्थक असे वर्गीकरण करतो.

• व्यवसायाची यादी करून महत्त्व सांगतो

• व्यवसायाची नावे लिहितो व माहिती गोळा करतो. 

• द्वितीयक व्यवसायांची यादी करून महत्त्व सांगतो.


No comments:

Post a Comment