DAILY EDUCATION

Sunday, January 2, 2022

११.स्वाध्याय - स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा - प्रश्नोत्तरे

 ११. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा

शब्दार्थ

*ग्राम - गाव                      *अभियान - मोहीम 

*प्रसारक - प्रसार करणारा *कष्ट - काम 

*हौस - आवड                  *ऋण - कर्ज 

*भले - चांगले                  *राबणे - कष्ट करणे

*वजन - भार                   *सगेसोयरे - नातलग

* विश्व - जग                    *दंड - शिक्षा 

*शुभ्र - पांढरा                  *सदा - नेहमी 

*पर्वा - काळजी,फिकीर   *झिम्मड - गर्दी

*कळवळून - मनापासून   *लेकरे - मुले

*सगेसोयरे - नातलग 

_________________________________________

* वाक्प्रचार व अर्थ आणि वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग :  

१.पसार होणे - पळून जाणे

उत्तर - पोलिसांना पाहताच चोर पसार झाले.

              ___________________________

२.पायाखाली घालणे - सर्वत्र फिरणे

उत्तर - सहलीच्या दिवशी आम्ही लोणार सरोवराचा         संपूर्ण परिसर पायाखाली घातला.

               __________________________

३.कष्ट करणे - काम करणे 

उत्तर - शेतकरी शेतात वर्षभर कष्ट करतात.

                 __________________________

 ४.जीव तुटणे - वाईट वाटणे

उत्तर - गोर गरीब लोकांसाठी संत गाडगे बाबांचा              जीव तुटत होता.

_________________________________________

प्रश्न १. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा

१.संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर - संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात                शेंडगाव येथे झाला.

_________________________________________

२. संत गाडगे महाराजांचे नाव काय होते ?

उत्तर - संत गाडगे महाराजांचे नाव डेबू असे होते.

_________________________________________

३. डेबूची आई आपल्या भावाकडे का राहू लागली?

 उत्तर - डेबूचे वडील वारले त्यामुळे डेबूची आई                 आपल्या भावाकडे येऊन राहू लागली.

_________________________________________

४. डेबुला कशाची हौस होती?

 उत्तर - कोणतेही काम मनापासून करण्याची डेबुला         हौस होती.

_________________________________________

५. डेबूची काम करण्याची पद्धत कशी होती ?

 उत्तर - आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले             पाहिजे अशी डेबूची काम करण्याची पद्धत           होती.

_________________________________________

 ६.डेबुचा जीव का तुटत होता?

उत्तर - काबाडकष्ट करणाऱ्या असंख्य लोकांचे              दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता.

_________________________________________

७. संत गाडगेबाबा काय मानून वावरू लागले ?

उत्तर - सगळी माणसे हे आपले सगेसोयरे, सगळे              विश्व हेच आपले घर असे मानून संत                     गाडगेबाबा वावरू लागले.

_________________________________________

८. संत गाडगेबाबा यांचा कोणता ध्यास होता?

उत्तर - भजन-कीर्तन, उपदेश हाच संत गाडगेबाबा             यांचा ध्यास होता.

_________________________________________

९. संत गाडगेबाबा देव कशाला मानत ?

उत्तर - गाडगेबाबा अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी             लोक यांना आपला देव मानत .

_________________________________________

१०.गाडगेबाबांची देवपूजा कोणती?

 उत्तर - रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच                           गाडगेबाबांची देवपूजा होती.

_________________________________________

प्रश्न २. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा

१.लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते?

 उत्तर - काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. ते ज्या समाजात वावरत होते ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होते. ऋण काढून सण करत होते. रोगराई झाली तरी औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडी-बकरी यांचे बळी देत होते. समाजातील लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नव्हते.

_________________________________________

२.गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले ?

उत्तर - गाडगेबाबांनी मनाशी ठरवले, की मी इतके कष्ट करीन, की मी न बोलता हे लोक माझे ऐकतील. त्यांच्यात सुधारणा होईल.

_________________________________________

३. गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे ?

उत्तर - गाडगेबाबा कीर्तनातून सांगत असत, की लोकांनी सद्गगुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही ,असे त्यांचे म्हणणे असे. बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे देव आपल्यातच आहे, त्याला जागा करा. हा उपदेश ते कीर्तनातून करायचे.

_________________________________________

४.गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे?

 उत्तर - गाडगेबाबा गावात वस्तीत जेथे जात तेथे खराटे, फावडे, घमेली मागवत मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई.

_________________________________________

प्रश्न ३ खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा.

  ( पसार होणे, पायाखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, पर्वा न करणे )

१. लोक पाया पडायला येतात गाडगेबाबा गर्दीतून पळ काढत.

२. सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला.

३. आम्ही जवळ जाताच खारीने पळ काढला.

४. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटत होता.

५. खेळताना मार लागला तरी मुले पर्वा करत नाही.

_________________________________________

प्रश्न ४.वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळवाल

अ ) गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली.

उत्तर - १ गरीब अनाथ अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले ?

         २. बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली ?

                  ___________________

आ ) काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता ?

उत्तर - १. काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख ,दारिद्र्य पाहून कोणाचा जीव तुटत होता ?

           २.डेबूचा जीव कोणासाठी तुटत होता ?

                ___________________

इ ) वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला.

१. गाडगेबाबांनी कशाचा त्याग केला ?

२. कितव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला?

                  ___________________

ई ) बाबांनी स्वतः राबून कष्ट करून मदत मागून धर्मशाळा बांधल्या.

१. धर्मशाळा कोणी बांधल्या ?

२) बाबांनी काय बांधले ?

               ___________________

उ ) गाडगेबाबांनी जात मानली नाही.

१ ) गाडगेबाबांनी काय मानले नाही?

२ ) जात कोणी मानली नाही ?

_________________________________________

प्रश्न ५ कोण कोणास म्हणाले ते लिहा

१. "बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे."

उत्तर - गाडगेबाबा लोकांना कीर्तनातून सांगत.

               _____________________

२." अरे देव आपल्यातच आहे त्याला जागा करा."

उत्तर - गाडगेबाबा लोकांना सांगत

________________________________________

* समानार्थी शब्द

            लहानपण = बालपण

                  ध्यास = ध्येय

                      घर = गृह, सदन 

                    गाव = खेडे, ग्राम

_________________________________________

 *विरुद्धार्थी शब्द 

                  एक × अनेक 

               स्वच्छ × अस्वच्छ

                 जागे × निद्रिस्त 

                गरीब × श्रीमंत 

              अनाथ × सनाथ

                सद्गुण × दुर्गुण

             दुष्काळ × सुकाळ

________________________________________

No comments:

Post a Comment