DAILY EDUCATION

Monday, January 3, 2022

१२. प्रवास कचऱ्याचा - प्रश्नोत्तरे

१२. प्रवास कचऱ्याचा

 शब्दार्थ

  * राबणे - मेहनत करणे

  * उपक्रम - प्रकल्प 

  * आश्चर्य - नवल 

  * साल - टरफल 

  * घाण - घाणेरडा 

  * उत्तम - चांगला 

  * सुका - वाळलेला 

_________________________________________

प्रश्न १.एका वाक्यात उत्तरे लिहा

१. बाईंनी उपक्रम कोणत्या वर्गासाठी राबवला ?

उत्तर - बाईंनी उपक्रम तिसऱ्या वर्गासाठी राबवला.

_________________________________________

२. मुलांनी किती दिवस शाळा स्वच्छ केली?

उत्तर - मुलांनी एक आठवडा दररोज राबून शाळा           स्वच्छ केली.

_________________________________________

३. मुलांनी काय काय स्वच्छ केले ?

उत्तर - मुलांनी शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू,         सगळे वर्ग स्वच्छ केले.

_________________________________________

४. कागद पुन्हा कशाचा बनवता येऊ शकतो?

उत्तर - सुक्या कचऱ्याचा पुन्हा कागद बनवता येऊ            शकतो.

_________________________________________

५.ओला कचरा कोणता ?

उत्तर - फळांच्या साली, कोयी, खरकटे हा ओला             कचरा आहे.

_________________________________________

६. कोरडा कचरा कोणता ?

उत्तर - कागदाचे तुकडे, काचेचे तुकडे,रद्दी ,पेपर              वाळलेले गवत हा कोरडा कचरा आहे.

_________________________________________

७.कशाचा घाण वास येत होता?

उत्तर - कचऱ्याचा घाण वास येत होता.

_________________________________________

८.घरामध्ये सरपणा ऐवजी काय वापरता येते ?

उत्तर - घरामध्ये कचऱ्यातून बाहेर पडणारा वायू                सरपणा ऐवजी इंधन म्हणून वापरता येतो.

_________________________________________

९. खत कशापासून बनवता येऊ शकतं ?

उत्तर - सडलेल्या कचऱ्यापासून खत बनवता येतं.

_________________________________________

१०.बाईने कचऱ्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केलं ?

उत्तर - बाईने कचऱ्याचे वर्गीकरण सुका कचरा व            ओला कचरा यामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण केलं.

_________________________________________

प्रश्न २ कोण कोणास म्हणाले ते लिहा 

१."फळांच्या साकी काय अन कागदाचे तुकडे काय कचराच ना तो."

उत्तर - नीला बाईंना म्हणाली.

                    _____________________

२." प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो."

उत्तर - बाई मुलांना म्हणाल्या 

                  _______________________

३."किती घाण वास येतो या कचऱ्याचा!"

उत्तर - जयंत म्हणाला 

                   ______________________

४."म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही, याचे अनेक उपयोग आहेत."

उत्तर - सर्व मुले म्हणाली.

_________________________________________

* खालील कचऱ्याचे वर्गीकरण करा :

कागद,काच, खरकटे, खराब पेन,भाजीचे देठ, शेंगांची टरफले, पुठ्ठा,केळीची साल, शिळे अन्न, फुटका कप, सडलेली फळे, फळांच्या साली, तुटकी खेळणी, वस्तूंचे खोके. 

सुका कचरा                       ओला कचरा 

 * कागद                            * खरकटे

 * काच                              * भाजीचे देठ

 * खराब पेन                      * शेंगांची टरफले

 * पुठ्ठा                               * केळीची साल

 * फुटका कप                    * शिळे अन्न

 * तुटकी खेळणी               * सडलेली फळे      

 * वस्तूंचे खोके                  * फळांच्या साली 

_________________________________________

No comments:

Post a Comment