DAILY EDUCATION

Monday, January 17, 2022

प्रकाशातले तारे तुम्ही - प्रश्नोत्तरे

१३ प्रकाशातले तारे तुम्ही 
शब्दार्थ  

*प्रकाश - उजेड 

*अंधार - काळोख
 
*बोलवी- बोलावले 

*आनंदाचे शिखर - खूप खूप आनंद 

*भारतभू - भारत देश 

*चिंता - काळजी

*अरुण - सूर्य

*खुणवी - दाखवतो.
_________________________________________
*वाक्प्रचार व वाक्प्रचारांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग

१.ठसा उमटविणे - मनावर बिंबवणे.
उत्तर - बालपणापासूनच थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्या मनावर ठसा उमटला.
                __________________

 २.आनंदाच्या शिखरावर असणे - खूप आनंदी होणे. 
उत्तर - बाबांनी माझ्यासाठी आणलेली नवी सायकल पाहून मी आनंदाच्या शिखरावर जाऊन बसलो.
_________________________________________

 प्रश्न १तुमच्या शब्दात सांगा :
 १.आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय ?
 उत्तर - आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप आनंदी होणे.
________________________________________

 २. तुम्हाला कशाची चिंता वाटते? त्यावेळी तुम्ही काय करता?
उत्तर - मला परीक्षेची चिंता वाटते तेव्हा मी पहिल्या दिवसापासून अभ्यासाची तयारी करतो.
_________________________________________

 प्रश्न 2 एका वाक्यात उत्तरे लिहा 
 १.प्रकाशातले तारे कोणाला म्हटले आहे ?
 उत्तर - प्रकाशातले तारे मुलांना म्हटले आहे.
-------------------------------------------------
 २.मुलांना कोण बोलावत आहे?
 उत्तर - मुलांना फुलराणी बोलवत आहे.
-------------------------------------------------
 ३. मुलांना कोठे जाऊन बसण्यास सांगितले आहे? उत्तर - मुलांना आनंदाच्या शिखरावर जाऊन बसण्यास सांगितले आहे.
------------------------------------------------
 ४. आपण कशासाठी जन्म घेतला आहे असे कवी म्हणतो?
 उत्तर - आपण हसण्यासाठी जन्म घेतला आहे असे कवी म्हणतो.
-----------------------------------------------
 ५. कवीने कोणाच्या आदर्शाचा मनावर ठसा उमटवण्यास सांगितले आहे?
 उत्तर - कवीने भारतभूच्या आदर्शाचा मनावर ठसा उमटवण्यास सांगितले आहे.
-----------------------------------------------
 ६.कवी मुलांना काय सांगत आहे?
 उत्तर - कवी मुलांना अंधारावर रुसून हसायला सांगत आहे.
-----------------------------------------------
 ७. मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते?
 उत्तर - मुलांनी उद्याची चिंता करू नये असे कवीला वाटते.
-----------------------------------------------
 ८.मुलांना कोण खुणावत आहे?
 उत्तर - मुलांना अरूण म्हणजेच सूर्य खुणावत आहे.
-----------------------------------------------
 ९. कवी मुलांना काय विसरायला सांगत आहे?
 उत्तर - कवी मुलांना मागचा गुंता विसरायला सांगत आहे.
-----------------------------------------------
 १०. प्रकाशातले तारे या कवितेचे कवी कोण आहेत?
 उत्तर प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे कवी उमाकांत काणेकर आहेत.
________________________________

 प्रश्न ३.खालील व्यक्तीवर तुम्ही केव्हा रुसता किंवा खूश होता ते प्रत्येकी एका वाक्यात लिहा:

१. आई - अ) तिच्या हाताने मला जेवू घालते तेव्हा          मी खूप खूश असते. 
        आ )मला तिने बाजारातून खाऊ आणला               नाही की मी रुसते. 
                   ------------------------------
२.बाबा - अ) मला सोबत फिरायला बाहेर नेतात         तेव्हा मी खूप खूश असते. 
       आ) माझ्यासोबतत खेळले नाही की मी रुसते.
                ---------------------------------
 ३.आजोबा - अ) मला गोष्टी सांगतात तेव्हा मी                 खूप  खूश असते.
              आ) मला मनिमाऊ सोबत खेळताना            रागावतात तेव्हा मी रुसते.
                  -------------------------------
४. आजी - अ) माझ्या आवडीचे पदार्थ बनवते तेव्हा मी खूप खूश असते.
           आ) आजी गावाला जाते तेव्हा मी रुसते.
                  ------------------------------
५. मैत्रीण / मित्र - अ) मला पुस्तक वाचायला देतात तेव्हा मी खूप खूश होते.
              आ) माझ्या वाढदिवसाला आले नाही तर मी रुसते.
                  ------------------------------
 ६.शिक्षक / शिक्षिका - अ) मला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मी खूप खूश होते.
         आ) मी दिलेले फुल बाईंनी केसात माळले नाही की मी रुसते.
                 --------------------------------
७. बहीण / भाऊ - अ) मला तिचा ड्रेस घालायला देते तेव्हा मी खूप खूश होते. 
        आ) मला छोटी म्हणून चिडवते तेव्हा मी रुसते.
                ---------------------------------
 ८.पाळीव प्राणी - अ) माझी मांजर मी घरी आल्याबरोबर माझ्या पायाभोवती खेळते तेव्हा मी खूप खूश होते. 
    आ) मी अभ्यास करताना माझी मनिमाऊसारखी ओरडत असली की मला तिचा राग येतो.
________________________________________

प्रश्न ४ खालील गोष्टी घडल्यावर तुम्हाला काय वाटते? 
१.बाबा बाहेरगावी गेले - राग येतो.
२.ताईने सुंदर पेन दिले - खूप आनंद होतो.
३.शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही - भिती वाटते. ४.रस्त्यात पाय घसरून पडलात - वाईट वाटते. ५.तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला - आनंद होतो.
________________________________________

प्रश्न ५.शेवटी समान अक्षर असणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा.

१. फुलराणी -पाणी
२. बसा - रुसा, ठसा, हसा, कसा
३. गुंता - चिंता 
________________________________________

प्रश्न ६ खालील शब्दातील अक्षरापासून शब्द तयार करा 
१. भारत - भारत, भात, तर 

२. शिखरावर - शिखर, शिख, खरा, राव, वर, शिरा,          शिव, शिर, राख 

३.आकाशात - आकाश, आशा, आत, कात

 ४.अंधारावर - अंधार, धारा, धार, धाव, राव, वर

 ५.पाऊसधारा - पाऊस, पास, पारा, ऊस, धारा,             धापा 
________________________________________

*समानार्थी शब्द 

             प्रकाश = उजेड 

              अंधार = काळोख, तम

               चिंता = काळजी 

              अरुण =सूर्य, भास्कर, रवी,प्रभाकर

              आनंद = हर्ष
________________________________________

*विरुद्धार्थी शब्द 

              प्रकाश × अंधार 

               हसणे ×रडणे

              आनंद × दुःख
________________________________________

No comments:

Post a Comment