DAILY EDUCATION

Tuesday, January 18, 2022

१४. खजिनाशोध - प्रश्नोत्तरे

खजिनाशोध

शब्दार्थ 

* हुडकत - शोधत 

* गट - समूह 

* वावर - शेत 

* ढोली - झाडाच्या खोडात असलेली पोकळ जागा. 

*गट, संघ, टोळकं, झुंड,पलटण,चमू,टोळी,घोळका - समूह 

_________________________________________

*वाक्प्रचार,अर्थ आणि वाक्यात उपयोग 

१.हुडकणे - शोधणे.

उत्तर - १.माझा हरवलेला चेंडू आम्ही सर्व मैदानावर हुडकला.

२. माझा मोती कुत्रा घरी न आल्यामुळे आम्ही सर्व परिसर हुडकून काढला.

_________________________________________

प्रश्न १. खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल मुलगी की मुलगा ते तुम्हाला कशावरून कळले?

उत्तर - खजिना शोधाची ही गोष्ट एक मुलगी सांगत आहे, कारण भाजीवाली आजी तिला आवाज देते "अगं ए ss " या शब्दावरून कळते की गोष्ट मुलगी सांगत आहे.

_________________________________________

प्रश्न २ खजिना शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते. वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? ही संख्या कशी शोधली, ते तुमच्या मित्र-मैत्रिणींना समजून सांगा ?

उत्तर - पाठात दिल्याप्रमाणे बाईंनी सहा जणांचे दोन गट अन सात जणांचे दोन गट करायला सांगितले यावरून वर्गात एकूण २६ मुले हजर होती. 

_________________________________________

प्रश्न ३. विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठेकोठे शोधल्या ते क्रमाने लिहा?

 विजयी झालेल्या संघाने,

१.झुडपाजवळ

२. वडाच्या झाडाच्या ढोलीत

३. खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागे

४. काळूमाच्या आंब्याकडे 

५.ओढ्यापासाच्या वावरात खजिना शोधला.

_________________________________________

प्रश्न ४. खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते ? त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल?

उत्तर - खजिन्याच्या खाऊच्या डब्यात चॉकलेट, गोळ्या किंवा बिस्किटे असतील असे वाटते. त्या डब्यात प्राणी-पक्ष्यांची चित्रे असल्यास मला फार आवडेल.

_________________________________________

प्रश्न ५. पुढील वाक्य वाचा व समूहदर्शक शब्द गाळलेल्या जागी भरा:

अ) अनेक पक्षी उडत आहेत, म्हणजे पक्षांचा थवा चाललाय.

आ) अनिताला एकत्र बांधलेली फुले भेट मिळाली, म्हणजे तिला फुलांच गुच्छ मिळालाय.

 इ) मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा झुबका असतो.

________________________________________

प्रश्न ६ जोड्या लावा

    वाहनांचा - ताफा 

     द्राक्षांचा - घोस

     संत्र्यांचा - ढीग 

    हरणांचा - कळप 

     फुलांचा - झुबका 

_________________________________________

प्रश्न ७.वाचा समजून घ्या व लिहा.

अ) चपात्यांची / भाकऱ्यांची - चवड

आ) पुस्तकांचा / वर्तमानपत्रांचा - गठ्ठा 

इ) धान्याच्या पोत्यांची - थप्पी 

ई) धान्याची - रास 

उ) भाजीची - जुडी

ऊ) केळ्यांचा - घड 

ए) माणसांचा - जमाव 

_________________________________________

प्रश्न ८ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .

अ) खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. भाकऱ्यांची चवड रचता रचता आई थकून गेली.

          ------------------------------

आ) भिकूने दिवसभरात वीस पोत्यांची थप्पी गोदामातून ट्रकमध्ये हलवली. 

_________________________________________

प्रश्न ९ एका वाक्यात उत्तरे लिहा

१.शाळेत कोणता खेळ झाला?

 उत्तर - शाळेत खजिना शोधायचा खेळ झाला.

_________________________________________

२.वस्तू कुठे आहेत हे बाईंनी कुठे लिहून ठेवले?

उत्तर - वस्तू कुठे आहेत हे बाईंनी वेगवेगळ्या चिठ्ठ्यामध्ये लिहून ठेवले.

_________________________________________

३.बाईंनी मुलांचे किती गट केले ?

उत्तर - बाईंनी मुलांचे सहा जणांचे दोन गट सात जणांचे दोन गट केले.

_________________________________________

४. बाईंनी खजिना कुठे लपवून ठेवला होता ?

उत्तर - काळूमाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता.

_________________________________________

५. खेळाचा कोणता नियम होता?

 उत्तर - वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची हा खेळाचा एक नियम होता.

_________________________________________

६.मुलांना झाडावर फार चढावं का लागलं नाही?

 उत्तर - चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती म्हणून मुलांना झाडावर फार चढावं लागलं नाही.

_________________________________________ 

७.खिचडीच्या खोलीत चिठ्ठी कोठे होती?

उत्तर - खिचडीच्या खोलीत चिठ्ठी तांदळाच्या पोत्यामागे होती. 

_________________________________________

८.मुलांना व्हरांड्यातून समोर कोण दिसले?

उत्तर - मुलांना व्हरांड्यातून समोर केंद्रप्रमुख दिसले.

_________________________________________

९.गेटच्या बाहेर मुलांना कोण दिसले?

उत्तर - गेटच्या बाहेर मुलांना सरपंच ताई दिसल्या.

_________________________________________

१०.सरपंचताई कोणाला भेटायला आल्या असाव्या ?

उत्तर - सरपंच ताई केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्या. 

_________________________________________

११. खाऊ कोणाला मिळणार होता?

उत्तर - खजिना कुणालाही सापडला तरी खाऊन सगळ्यांना मिळणार होता.

_________________________________________

प्रश्न १० कोण कोणास म्हणाले ते लिहा.

१." सहा जणांचे दोन गट अन् सात जणांचे दोन गट करा."

उत्तर - बाई मुलांना म्हणाल्या.

             ------------------------------------

२. "अगं ए ss,शाळा सोडून कुठे चाललंय टोळकं?"

उत्तर - बोरंवाली आजी मुलांना म्हणाली. 

            -------------------------------------

३."आज शाळा बाहेरच आहे."

उत्तर - चंब्या बोरंवाली आजीला म्हणाला.

           -------------------------------------

४."ए ss तुमची झुंड झाडावर चढते की काय ?"

उत्तर - चिंगीचे अजोबा मुलांना म्हणाले.

           ---------------------------------------- 

५."कुठे चालली टोळी ?"

उत्तर - सरपंचताई मुलांना म्हणाल्या.

          ----------------------------------------

६."आज दोन तास खजिनाशोध आहे."

उत्तर - मुले सरपंचताईंना म्हणाले.

_________________________________________

*समानार्थी शब्द 

         खजिना = भांडार 

            वावर = शेत, शिवार 

           शाळा = विद्यालय

              झुंड = समूह 

         आवाज = ध्वनी 

_________________________________________

*विरुद्धार्थी शब्द 

         विचार × अविचार

         जवळ × दूर 

        उशिरा × लवकर 

     सापडणे × हरवणे 

________________________________________

**ओळखा पाहू ?

* काळ्या राणी उभी तलवार.- केसातला भांग 

* सगळीकडे आहे, जाणवते पण दिसत नाही. - हवा 

* एवढंसं पोर, घर कसं राखतं.- कुलूप 

* एक विहीर, तिला बत्तीस पायऱ्या, त्यामध्ये एकच रस्ता - तोंड (दात, जीभ )

* दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी - डोळे 

_________________________________________

No comments:

Post a Comment