DAILY EDUCATION

Wednesday, January 19, 2022

१५. सुट्टीच्या दिवसांत- प्रश्नोत्तरे

१५.सुट्टीच्या दिवसांत 


* शब्दार्थ

*निराळा - वेगळा

*बिलागणे - कवटाळणे, मिठी मारणे

*उनाड - खोडकर 

*अदभुत - आश्चर्यकारक 

*विटका - रंग उडालेला, रंग फिका पडलेला 

*प्रचंड - खूप मोठा 

*उसळणे - जोराने वर येणे 

*गगनचुंबी - आकाशाला टेकणारा असा उंच, खूपच उंच 

*भान - आठवण, लक्ष 

*अंग - शरीर 

*नवतेज - नवीन तेज 

*शक्ती - ऊर्जा

*महिना - मास 

*काल - काळ 

________________________________________

*वाक्प्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग 

१. बिलगणे - कवटाळणे 

उत्तर - सैनिक असलेले बाबा सुट्टीवर घरी येताच त्यांची मुले त्यांना बिलगली. 

              ------------------------------

२.कालचक्र मोडून पडणे - काळाचे भान नसणे 

उत्तर - सुट्टी मध्ये मुले खेळण्यांमध्ये इतके गुंतून जातात, की त्यांचे कालचक्र मोडून पडते.

_________________________________________

 प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा :

१कवीला आकाशात केव्हा जावेसे वाटते?

 उत्तर - कवीला सुट्टीच्या दिवसात आकाशात उडावे असे वाटते. 

_________________________________________

२.सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर - खाली व्हावेसे वाटते? 

उत्तर - सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवरुन वर-खाली व्हावेसे वाटते.

_________________________________________

३. सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते?

उत्तर - सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग आश्चर्यकारक म्हणजेच अद्भुत होते.

_________________________________________

४.माळावरचा वारा कसा आहे?

 उत्तर माळावरचा वारा उनाड आहे.

_________________________________________

५. उन्हातही अंगाला काय बिलगतो?

उत्तर - उन्हातही अंगाला माळावरचा उनाड वारा बिलगतो. 

_________________________________________

६.संपूर्ण जगावर जादू कोण करते?

उत्तर - संपूर्ण जगावर सुट्टी जादू करते.

_________________________________________

७. नवतेजाची झगमग कोठे चमकते ?

उत्तर - नवतेजाची  झगमग मळक्या विटक्या वस्तूवरती चमकते.

_________________________________________

 ८.सात समुद्र व उंच पर्वत ओलांडण्यासाठी काय हवे आहे ? 

उत्तर - समुद्र व उंच पर्वत ओलांडण्यासाठी प्रचंड शक्ती हवी आहे.

_________________________________________

९. कशामुळे काळाचे भान राहत नाही?

 उत्तर - सुट्टीमुळे काळाचे भान राहत नाही.

_________________________________________

१०. कालचक्र कशाचे आहे ?

उत्तर - कालचक्र आठवडा, महिना, वर्ष यांचे आहे.

_________________________________________

११.' सुट्टीच्या दिवसांत' या कवितेचे कवी कोण आहेत?

 उत्तर - सुट्टीच्या दिवसात या कवितेचे कवी अनंत भावे आहेत.

_________________________________________

प्रश्न २ खालील शब्दापुढे कंसातील योग्य शब्द लिहा.

 उदा.घमघमणारा - वास 

           ( पंख, पाणी, पक्षी, वारा )

    *खळखळणारे - पाणी 

    *फडफडणारे - पंख 

    *किलबिलणारे - पक्षी 

    *घोंगावणारा - वारा 

_________________________________________

प्रश्न ३ खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा:

अ) उन्हात माळावर फिरतांना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो.

उत्तर - उन्हातही अंगाला बिलगे, माळावरचा उनाड वारा.

           ------------------------------------

 आ) समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे.

 उत्तर - वाटे पोहू साती सागर , गगनचुंबी ओलांडू पर्वत.

          --------------------------------------

इ) सुट्टीच्या दिवसांत वेळ कसा गेला हे लक्षात न येणे.

उत्तर - सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते.

_________________________________________

प्रश्न ४ उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठी माणसे करू देत नाहीत अशा गोष्टींची यादी करा:

उत्तर - उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला पोहायला आवडते, मित्रांसोबत लपाछपी, लंगडी,क्रिकेट, लगोरी असे खेळ खेळायला खूप आवडतं पण बाहेर खूप ऊन असल्यामुळे कुणाचीच आई घराबाहेर पडू देत नाही.

_________________________________________

प्रश्न ५ सारखी अक्षरे एकमेकांना जोडून येणारे म्हणजेच जोडाक्षर युक्त शब्द लिहा:

 सुट्टी, कट्टी, बट्टी, हत्ती, चित्ता, कट्टा, पट्टा 

_________________________________________

प्रश्न ६.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा:

 १.सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा.

२ मळक्या विटक्या वस्तूवरती नवतेजाची चमके झगमग.

३. वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत.

४. इंद्रधनूच्या घसरगुंडीवर खाली - वर, वर - खाली व्हावे.

५.सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते

_________________________________________

*समानार्थी शब्द 

       दिवस = दिन 

    आकाश = गगन 

          अंग = शरीर देह तनू काया

         वारा = वायू पवन 

       उनाड = खोडकर 

      शक्ती  = ऊर्जा 

      नेहमी = सतत

_________________________________________

*विरुद्धार्थी शब्द 

    दिवस × रात्र 

 आकाश × जमीन 

    खाली × वर

      भान × बेभान 

     प्रचंड × चिमुकले 

_________________________________________



*कवितेचा अर्थ 

१. सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंदाचा दिवस असतो. सुट्टीची मुले वाट बघत असतात. सुट्टी असली की मुलांना असे वाटते, कि आपण आकाशात उडावे आकाशातल्या इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवरुन वर खाली, खाली वर अशा चकरा माराव्या.

२ सुट्टीच्या दिवसाचा आनंद निराळाच असतो या दिवसात वाहणारा वारा देखील छान सुगंधाने भरलेला असतो.उन अंगाला  बिलगते पण त्या उन्हातही माळावरचा उनाड वारा शरीराला छान वाटतो.

३.सुट्टीच्या दिवशीचे जग हे आश्चर्यकारक वेगळे झाल्यासारखे वाटते. सुट्टीच्या दिवशी वेगळीच जादू जगावर पसरते. जगातील सर्व वस्तू ज्या मळलेल्या खराब झालेल्या असतात त्यावर एक नवीन प्रकारचे तेज आल्यासारखे वाटते व त्यामुळे त्या झगमगत असतात. 

४.सुट्टी आहे हे लक्षात येताच मुलांच्या मनात प्रचंड शक्ती शरीरात उसळत राहते. या शक्तीमुळे मुलांना  सात समुद्रात पोहावे आणि आकाशाला जाऊन मिळणाऱ्या उंच पर्वताला ओलांडून पार करावे असे वाटते 

५.आठवडाभर शाळा असते व रविवारी सुट्टी असते तसेच उन्हाळ्यात देखील सुट्टी असते त्यामुळे वर्षभर शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळा असताना जे कालचक्र लक्षात राहते ते सुट्ट्यांमध्ये पूर्णपणे मोडून पडते. आठवडा, महिना,वर्ष यांचे त्यांना भान राहत नाही.








No comments:

Post a Comment