DAILY EDUCATION

Friday, January 21, 2022

१७. रानपाखरा - प्रश्नोत्तरे

 १७. रानपाखरा 


**शब्दार्थ

 *येसी - येतो

 *देह - शरीर 

 *सानुला - लहान 

 *भास्कर - सूर्य 

 *संगे - सोबत 

 *सुस्वर - गोड आवाज 

 *सखा - मित्र 

 *आभाळ - आकाश 

_________________________________________ 

प्रश्न १. कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा 

१.घरा - खरा

२.त्यावरी - गोजिरी, पंखावरी 

३.सानुला - तुला 

४.भास्कर - सुस्वर 

________________________________________

प्रश्न २-खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा 

अ) शरीर - निळसर 

आ) डोळे - सतेज

 इ) पाय - चिमुकले 

ई) पंख - चिमुकले 

उ) देह - सानुला 

ऊ) आभाळ - अफाट 

ए) गाणे - सुस्वर 

_________________________________________

प्रश्न ३ एका वाक्यात उत्तरे लिहा

१.कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते? 

उत्तर कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते.

________________________________________

२. रानपाखराचे डोळे कसे आहेत ?

उत्तर - रानपाखरा चे डोळे सतेज चमचमणारे रत्ना सारखे आहेत.

_________________________________________

३. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे ?

उत्तर - रानपाखराचा चिमुकला देह बघून मुलीला प्रश्न पडतो, की एवढ्या अफाट आभाळात त्याला कसे उडता येते.

_______________________________________

४.सूर्य डोंगर चढून वर कधी येतो ?

उत्तर -  रात्र संपल्यावर, सकाळी सूर्य डोंगर चढून वर येतो. 

_________________________________________

५.कवितेतल्या मुलीला रानपाखरा बरोबर कोठे जायचे आहे? 

उत्तर - कवितेतल्या मुलीला रानपाखरा बरोबर त्याच्या घरी जायचे आहे.

________________________________________

 ६. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे 

उत्तर - कवितेतल्या मुलीला पाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहे.

_________________________________________ 

७.कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते?

उत्तर - कवितेतल्या मुलीला एकदा तरी पाखराच्या घरी जायचे आहे तिथे गेल्यावर तिला मजा येईल असे वाटते. 

_________________________________________

८.रानपाखरु मुलीला कसे उठवते? 

उत्तर - रानपाखरु गाणे गाऊन मुलीला उठवते.

_________________________________________ 

९.रानपाखराचे शरीर कसे आहे ?

 उत्तर - रानपाखराचे शरीर निळसर आहे.

_________________________________________

 १०.झालर कशाची आहे ?

 उत्तर -  झालर ठिपक्यांची आहे.

_________________________________________

११. रानपाखरा या कवितेचे कवी कोण आहेत?

 उत्तर - रानपाखरा या कवितेचे कवी गोपीनाथ आहेत.

_________________________________________ 

प्रश्न ४ थोडक्यात उत्तरे लिहा:

१. रानपाखराच्या शरीराचे वर्णन थोडक्यात लिहा 

 उत्तर - रानपाखराचे शरीर निळसर रंगाचे आहे. त्यावर ठिपक्यांची झालर आहे. त्याचे डोळे तेजाने चमकत असून सुंदर रत्ने आहेत असे वाटते. रानपाखराचे पाय आणि शरीर चिमुकले असून अफाट आभाळातून तो उडतो.

_________________________________________

प्रश्न ५.कोणाला म्हटले आहे ते लिहा 

* जीवाचा मित्र - रानपाखराला

* गोजिरे रत्ने - रानपाखराच्या डोळ्यांना

_________________________________________

प्रश्न ६ कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा:

 १.रेश्माला तिची आई उठवते ती 'रेश्मा, उठ लवकर' अशा हाका मारून उठवते.

             ------------------------------

 २.सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते मोबाईल 'उठा, चला' अशा गाण्याच्या गजराने उठवतो.

            ------------------------------- 

३.भिकूचे घर जंगलात आहे. त्याला पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते. 

            -------------------------------

४.रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते. तो दररोज रेल्वेच्या आवाजामुळे उठतो. रेल्वे झुक झुक आवाज करत जाते. 

            --------------------------------

५.रेवतीचे घर घाऊक भाजीबाजार समोर आहे. बाजार पहाटेच सुरू होतो. रेवती दररोज भाजीवाल्यांच्या आवाजामुळे  उठते.

            ------------------------------

 ६.जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे त्यामुळे ती दररोज बसच्या भोंग्याच्या आवाजामुळे उठते. 

             ------------------------------

७. जमिलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमिला रोज यंत्राच्या आवाजामुळे उठते.

            -------------------------------

८ दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेत रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपर्‍यातच त्यांचे घर आहे. दिनेशला रोज पशूपक्ष्यांच्या किलबिलाट आवाजामुळे जाग येते.

_______________________________________ 

*समानार्थी शब्द 

    सकाळ = प्रभात 

         रात्र = निशा 

         मित्र = दोस्त, सखा 

           देह = शरीर 

     भास्कर = सूर्य 

           घर = सदन गृह 

        डोळे = नयन नेत्र 

   आभाळ = गगन 

    बिऱ्हाड = घर 

_________________________________________

*विरुद्धार्थी शब्द 

    सकाळ × संध्याकाळ 

       येसी × जाशी

    माझ्या × तुझ्या 

       तुला × मला 

       मित्र × शत्रू

       रात्र × दिवस 

      येतो × जातो 

    चढणे ×उतरणे 

   सुस्वर × कर्कश 

_________________________________________


कवितेचा अर्थ

.कवितेतील मुलगी रानपाखराशी बोलत आहे ती त्याला म्हणत आहे की तू खरोखरीच माझा जवळचा मित्र आहे कारण रोज सकाळी माझ्या घरी येऊन मला गाणे गाऊन उठवतो. तू फार सुंदर आहेस तुझे शरीर निळसर आहे आणि त्यावर ठिपक्यांची सुंदर झालर आहे तुझे डोळे रत्नाप्रमाणे सुंदर व तेजस्वी असून ते चमचम करत आहे.

२.रानपाखरा तुझे पाय छोटेसे आहेत. पंख देखील छोटेसे आहे. तुझे शरीरही छोटेसे असून तुला एवढ्या मोठ्या उंच आभाळात कसे उडता येते असा प्रश्न मुलीला पडला आहे. रात्र संपत आहे तोच तू डोंगरावर चढून जातोस व नाहीसा होतो. सकाळी सूर्य आकाशात वर येताच तू ही त्याच्यासोबत येतो आणि गोड गोड गाणी गोड स्वरात गातो.

३.हे रान पाखरा मला वाटतं तुझ्या प्रमाणे मजेत आकाशात उडावे मला तुझ्या सोबत तुझ्या पंखावर बसून तुझ्या घरी नेशील का? तुझी आई आणि सूर्य मला भेटायला येईल तेव्हा फारच मजा येईल मित्रा तू मला एकदा तुझ्या सोबत ने.



No comments:

Post a Comment