DAILY EDUCATION

Friday, January 21, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय मराठीइयत्ता तिसरी

 


विषय भाषा 

• चित्रात काय काय दिसते याचे वर्णन करतो.

• कवितेचे वैयक्तिकरित्या हावभावासहित गायन करतो.

• यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी तयार करतो.

• समानार्थी शब्द सांगतो /यादी तयार करतो. 

• विरुद्धार्थी शब्दांची यादी तयार करतो.

• सुचविलेल्या शब्दांसाठी समानार्थी /विरुद्धार्थी शब्द सांगतो.

• कवितेच्या ओळी ऐकून लगेचच पूर्ण करतो. 

• इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

• मजकुराचे हावभाव सहित वाचन करतो.

• चित्रातील गोड पदार्थांची यादी तयार करतो.

• जोडाक्षरयुक्त शब्दाचे अनुलेखन करतो.

• परिसरातील मिठाईच्या दुकानावषयी माहिती मिळवतो.

• वर्तमानपत्रे मासिके यातील चित्र गोष्टीचे कात्रणे जमा करतो.

• पावसाचे वर्णन करतो.

• पाळीव प्राण्यांची चित्रे व जमवून चिकट वहीत चिकटवतो. 

• संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे. 

• बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

• बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

• कवितेतील नादमय शब्द शोधून त्यांची यादी तयार करतो.

• बातम्यांचे स्पष्ट आवाजात वाचन करतो. 

• प्रमाणभाषा व बोलीभाषा यातील फरक समजून घेतो.

• बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो. 

• स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

• एकच वस्तू किंवा व्यक्तीसाठी कोणते शब्द वापरले जातात याचे वर्णन करतो.

• पाठातील संवादाचे हावभावासहित वाचन करतो. 

• पाठातील चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात लिहितो. 

• प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो. 

• पाठाचे प्रकट वाचन आरोह-अवरोहा नुसार करतो.

• परिसरातील झाडा - झुडपांची नावे सांगतो. 

• भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो. 

• कवितेतील ओळीचा अर्थ सोप्या शब्दात सांगतो. 

• फुलांची झाडे व वेली यांची यादी तयार करतो.

• स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

• मोठ्या विषयी बोलताना फार नम्रतेने बोलतो. 

• पाठातील प्रसंगांचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो. 

• वर्तमानपत्रे/ मासिके यात येणारे विनोद शोधतो. 

• आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग वर्गात सांगतो.

• कवितेचा अर्थ स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो.

• उदाहरणे पटवून देताना म्हणीचा वापर करतो. 

• स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो. 

• स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो. 

• छोट्या छोट्या कविता तयार करतो. 

• आवडलेल्या चित्राचे वर्गात वर्णन करतो. 

• धान्याचे नमुने गोळा करून त्याद्वारे नक्षीकाम करतो.

• शेतीविषयक अवजारांची चित्रे मिळतो. 

• अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो. 

• स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

• पाट्यावर दिसणार्‍या शब्दांचे वाचन करतो. 

• पाठातील मजकुराचा अर्थ समजून घेतो. 

• पाठावर आधारित प्रश्न विचारतो.

• प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो. 

• विविध प्रकारचे शब्द बाराखडीच्या क्रमाने लावतो. 

• पाठातील शब्दार्थ मुळाक्षराच्या क्रमाने लिहितो. 

• एखाद्या बाबीचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो. 

• अपूर्ण गोष्ट दिल्यास कल्पना करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. 

• संतांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो. 

• सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो. 

• स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

• पाठातील संवादाचे नाट्यीकरण करण्याचा प्रयत्न करतो.

• कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करतो. 

• इतरांशी संवाद साधताना देहबोलीचा अनुरूप वापर करतो. 

• बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वांना खूप आवड.तो

• सूर्याचे चित्र काढून दाखवतो. 

• सुचविलेला भाग /कथा /प्रसंग योग्य आवाजात सांगतो. 

• सुचविलेला भाग /कथा अतिशय सुंदर रीतीने सांगतो. 

• थोर व्यक्तींची छायाचित्रे मिळवतो. 

• थोर व्यक्तींच्या माहितीचा संग्रह करतो. 

• सुचविलेल्या कडव्याचा अर्थ सांगतो.

• परिचित-अपरिचित व्यक्तीशी उत्तम संवाद साधतो. 

• पाठातील मजकुराचा अर्थ साध्या सोप्या शब्दात सांगतो. 

• इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषेत सांगतो. 

• पाठात आलेले समूह शब्द ओळखतो. 

• समूह शब्दांचा प्रसंगानुरूप वापर करण्याचा प्रयत्न करतो. 

• स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो. 

• शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो.

• शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.

• समुच्चय दर्शक शब्द ओळखतो 

• विविध प्रकारच्या झाडांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो.

• शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो.

• शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो. 

• संवाद कथा गाणे लक्षपूर्वक ऐकतो.

• इंद्रधनुष्याचे सुंदर चित्र काढतो व रंगाची नावे सांगतो. 

• कवितेतील आवडणाऱ्या ओळींचे सुंदर गायन करतो. 

• सुचवलेली कथा योग्य पण सुंदर भाषेत सांगतो.

• दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो. 

• चालू वर्षाच्या कॅलेंडर मधील सुट्ट्यांची यादी तयार करतो. 

• दिलेल्या घटनांचे चित्रे योग्य क्रमवार लावून दाखवतो.

• दिलेल्या घटनांचे चित्रे योग्य व अचूक क्रमवार लावतो. 

• दिलेले चित्र पाहून योग्य भाषाशैलीत वर्णन लिहतो. 

• उन्हाळ्याच्या सुट्टीत करावयाच्या गोष्टींची यादी करतो.

• फळांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो. 

• परिसरातील किराणा दुकाना विषयी माहिती लिहितो. 

• दाखविलेल्या पाट्या /चित्राबद्दल माहिती सांगतो. 

• आवडत्या सणाविषयी माहिती लिहितो. 

• सणांची घरी कशी तयारी करतात याचे वर्णन करतो. 

• आकाश कंदील तयार करतो. 

• सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो. 

• सुचविलेला विषय /भाग या अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न विचारतो.

• वर्णन लिहितांना विरामचिन्हांचा योग्य वापर करतो. 

• विरामचिन्हांचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

• पक्ष्यांचे सुरेख वर्णन करतो.

• करवंद या विषयाचे सामान्य ज्ञान सविस्तरपणे लिहितो. 

• पाठातील जोडाक्षर युक्त शब्दांची यादी तयार करतो. 

• जंगलातील प्राण्यांची नावे सांगतो. 

• जंगलातील प्राण्यांची चित्रे जमा करतो. 

• कागदाच्या होड्या तयार करतो. 

• गोष्ट नाटकाच्या रुपात वर्गासमोर सादर करतो. 

• वर्तमानपत्रे /मासिके यातून चित्रकथा संकलित करतो. 

• आंबट फळांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो.

• विविध घोषवाक्य तयार करण्याचा प्रयत्न करतो.

• तराजू चे चित्र काढून दाखवतो.

• पणत्यापासून तराजू तयार करतो.

• विविध शास्त्रज्ञांची माहिती मिळवितो.

• शास्त्रज्ञांची चित्रे जमा करतो.

• शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांचा तक्ता तयार करून वर्गात लागतो. 

• फोन कसा बनवायचा याची कृती सांगतो. 

• जत्रेतील प्रसंगांचे वर्णन करतो. 

• मित्रा विषयी थोडक्यात निबंध लिहितो.

• मित्रा विषयी माहिती सांगतो. 

• पाठातील वाक्प्रचार याची यादी अर्थासहीत तयार करतो. 

• पाठातील वाक्प्रचारांचे अर्थ सांगतो. 

• गाई - म्हशी पाळणाऱ्या लोकांविषयी माहिती मिळवतो. 

• मधमाशीचे चित्र काढून माहिती लिहितो /सांगतो.

• वर्तमानपत्रे मासिके यातील पक्ष्यांची चित्रे जमवतो.

• विविध तेलबियांचा नावासहित संग्रह करतो. 

• थोर महिलांची चित्रे मिळवतो. 

• थोर महिला विषयी माहिती सांगतो. 

• भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो.

• समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द शोधतो.

• वाहतुकीचे नियम सांगतो.

• लाल दिवा लागला त्यावेळी काय कराल ते सांगतो.

• गावाचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करतो.

• आई बाबांचे चित्र काढून आणतो.

• चित्रावर आधारित प्रश्न तयार करतो. 

 •परिसरातील व्यवसायांची नावे सांगतो.




No comments:

Post a Comment