१०. आमचा शब्दकोश
शब्दार्थ
शब्दपट्ट्या - शब्द लिहिलेल्या पट्ट्या
क्रमाने - रांगेने
गट - समूह
_________________________________________
जोडाक्षरयुक्त शब्द
शब्दकोश गोष्ट त्याच्या
शब्दपट्ट्या मीनाच्या पौष्टिक
फळ्यावर किल्ला त्यात
म्हणजे अर्थ पूर्व
_________________________________________
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा
१.मीना काय करत होती?
उत्तर - मीना गोष्ट वाचत होती.
_________________________________________
२.बाईंनी मीनाच्या गटाला शब्दपट्ट्या बनविण्यासाठी कोणते अक्षर दिले ?
उत्तर - बाईंनी मीनाच्या गटाला शब्दपट्ट्या बनविण्यासाठी ' प ' हे अक्षर दिले.
_________________________________________
३ बाईंनी फळ्यावर शब्द कोणत्या क्रमाने लिहिले ?
उत्तर - बाईने फळ्यावर शब्द वेगळ्या क्रमाने लिहिले.
_________________________________________
४. रोहनच्या गटाला बाईंनी कोणत्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधायला सांगितले?
उत्तर - रोहनच्या गटाला बाईनी ' क ' या अक्षरापासून सुरु होणारे शब्द शोधायला सांगितले.
_________________________________________
५. बाईंनी फळ्यावर पहिल्यांदा शब्द कुठल्या क्रमाने लिहिले ?
उत्तर - बाईंनी पहिल्यांदा फळ्यावर शब्द बाराखडी नुसार लिहिले.
_________________________________________
६. दुसऱ्यांदा बाईंनी फळ्यावर कोणत्या क्रमाने शब्द लिहिले ?
उत्तर - दुसऱ्यांदा बाईंनी फळ्यावर वर्णमाले नुसार शब्द लिहिले.
_________________________________________
७. मीनाच्या गटाने प चे कोणते शब्द शोधले?
उत्तर - पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचर, पिवळा, पीठ, पेरणी, पैलवान, पौष्टिक.
_________________________________________
८. रोहनच्या गटाने कोणते शब्द शोधले ?
उत्तर - कीड, कप, किल्ला, कौल, कंद, कुत्रा, कूट, कान, केस, कैरी.
_________________________________________
प्रश्न २ कोण कोणास म्हणाले ते लिहा
१. "बाई, तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला?"
उत्तर - रोहनने बाईंना विचारले.
______________________
२."शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो."
उत्तर - बाई रोहनला म्हणाल्या.
_______________________
३." पण बाई मला नाही समजलं, क्रम कसा लावायचा ते ."
उत्तर - नेहा बाईंना म्हणाली.
_______________________
४."आता हेच शब्द मी वेगळ्या क्रमाने लिहिते."
उत्तर - बाई विद्यार्थ्यांना म्हणाल्या.
_______________________
५.बाई तुम्ही मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे."
उत्तर - नीता बाईंना म्हणाली.
_________________________________________
No comments:
Post a Comment