९.शेरास सव्वाशेर
शब्दार्थ
* निबर - कडक
* बेगमी - साठा
* करुणा - दया
* कोपणे - रागावणे
* तरफ - टेकू दिलेली लाकडी फळी
* निरव - शांत वातावरण
* कुजबुजणे - हळूहळू बोलणे
* बेत - योजना
* चतुर - हुशार
________________________________________
जोडाक्षरयुक्त शब्द
सव्वाशेर शेताच्या
वाऱ्यावरून सोन्यासारखे
त्यांच्या निसर्गाने
माळावरच्या भरलेल्या
लोंब्या आडव्या
पडल्या होत्या
करण्याचे शेताजवळच्या
खड्डा पत्र्याचे
पाण्याने त्याच्या
मोकळ्या पिंपळावरच्या
फळीच्या झाल्यावर
तळलेल्या भज्यांच्या
ठेवलेल्या त्यांना
युक्ती संध्याकाळी
पुन्हा दुसऱ्या
फस्त आश्चर्य
घ्यायचे पडायच्या
स्वारीवर मोठ्या
त्यांच्यापैकी प्रत्येकाने
खाल्ली
* वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग.
१. करुणा करणे - दया करणे
उत्तर - संत महात्मे यांच्या मनात प्राणीमात्रांविषयी करुणा असते.
_________________________________________
२.सामसूम होणे - शांतता पसरणे
उत्तर - थंडीच्या दिवसात रात्री आठ वाजताच सगळीकडे सामसूम होते.
_________________________________________
३.अधीर होणे - उत्सुक असणे
उत्तर - रोज रात्री आजीची गोष्ट ऐकण्यासाठी आम्ही अधीर असतो.
_________________________________________
४. नवल वाटणे - आश्चर्य वाटणे
उत्तर - सतत कामाचा कंटाळा करणाऱ्या संगीताने आज घर आवरलेले पाहून आईला नवल वाटले.
_________________________________________
५.कूच करणे - प्रस्थान करणे
उत्त्तर - रात्री सगळीकडे शांतता पसरली की चोरांची टोळी कूच करते.
_________________________________________
६. फस्त करणे - संपवणे
उत्तर - भुकेल्या मांजरीने पातेल्यातील दूध फस्त केले.
_________________________________________
७. कपाळावर हात मारणे - निराश होणे.
उत्तर - अवकाळी पावसाने सर्व पिकांचे नुकसान झालेले पाहून काकांनी कपाळावर हात मारला.
_________________________________________
८.युक्ती सफल होणे - योजना यशस्वी होणे.
उत्तर - उंदरांना मारण्याची नाना काकांनी केलेली युक्ती पहिल्या वेळेस सफल झाली.
_________________________________________
प्रश्न १ एका वाक्यात उत्तरे लिहा
१.नाना काका कोठे फिरवत होते ?
उत्तर नाना काका शेताच्या बांधावरुन फिरत होते.
_________________________________________
२.नाना काका आनंदाने का डोलत होते ?
उत्तर - वाऱ्याने डोलणारी शेती पाहून नानाकाका आनंदाने डोलत होते.
_________________________________________
३.नाना काका कोणते गाणे गुणगुणत शेतापाशी थांबले?
उत्तर - ' निसर्गाने करुणा केली. भाते पिकुनी पिवळी झाली.' असे गाणे गुणगुणत नानाकाका शेतापाशी थांबले.
_________________________________________
४. शेताची नासाडी कोण करत होते ?
उत्तर - शेताची नासाडी उंदीर करत होते.
_________________________________________
५.नानकाकानी गोल खड्डयात काय ठेवले?
उत्तर - नानाकाकांनी गोल खड्ड्यात एक पिंप ठेवला.
_________________________________________
६.उंदराची टोळी केव्हा बाहेर पडली?
उत्तर - सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची टोळी बाहेर पडली.
_________________________________________
७.सर्वच उंदीर पिंपळापाशी धावत का आले ?
उत्तर - तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले.
_________________________________________
८.नाना काकांना कशाचे समाधान वाटले?
उत्तर - आपली युक्ती सफल झाली याचे नाना काकांना समाधान वाटले.
_________________________________________
९. झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते?
उत्तर - झाडाच्या आडोशाला नाना काका लपून बसले होते.
_________________________________________
१०..नाना काकांना शेरास सव्वाशेर कोण भेटले ?
उत्तर - उंदीर नाना काकास शेरास सव्वाशेर भेटले.
_________________________________________
प्रश्न २. तर काय झाले असते
१.नानाकाकानी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर ......
उत्तर - दररोज एक उंदीर पकडला गेला असता.
______________________
२.नाना काकांच्या शेतात साप असते तर ...........
उत्तर - साप उंदीर खातो म्हणून उंदराचे प्रमाण कमी झाले असते.
___________________
३.नानाकाका यांच्या शेतात उंदीर नसते तर.....
उत्तर - शेतातल्या पिकांची नासाडी झाली नसती.
___________________
४. नानाकाका यांच्या शेतात मांजर असते तर ......
उत्तर - मांजरांनी उंदरांना खाल्ले असते व शेताची नासाडी झाली नसती.
_________________________________________
प्रश्न ३ खालील शब्दांचा सुरुवातीला ' अ ' लावून नवीन शब्द तयार करा.
धीर - अधीर
शक्य - अशक्य
स्वस्थ - अस्वस्थ
प्रकाशित - अप्रकाशित
शांत - अशांत
विचार - अविचार
स्वच्छ - अस्वच्छ
एक - अनेक
________________________________________
प्रश्न ४ शेरास सव्वाशेर यासारख्या शब्द समूहांना म्हणी म्हणतात ,तुम्ही ऐकलेल्या वाचलेल्या अशा म्हणी सांगा.
१.घरोघरी मातीच्या चुली.
२.गर्वाचे घर खाली.
३.अति तेथे माती.
४.काखेत कळसा गावाला वळसा.
५.नाचता येईना अंगण वाकडे.
६. आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते.
७. खाई त्याला खवखवे.
८. शहाण्याला शब्दाचा मार.
९. उथळ पाण्याला खळखळाट फार.
१०. पालथ्या घड्यावर पाणी.
_________________________________________
प्रश्न ५.खालील शब्दात लपलेले शब्द शोधा लिहा
नासाडी - साडी, नासा, नाडी, नासा
कपाळावर - कपाळ, कर, कळा, पाक, पाव, पार, वर
________________________________________
* समानार्थी शब्द
शेत = वावर
सोने = सुवर्ण
कोपले = रागावले
फळी = पाटी
भार = वजन
सफल = यशस्वी
अंधार = काळोख
निरव = शांत वातावरण
_________________________________________
* विरुद्धार्थी शब्द
विचार × अविचार
अंधार × उजेड
शांत × अशांत
धीर × अधीर
समाधान × असमाधान
संध्याकाळी × सकाळी
No comments:
Post a Comment