DAILY EDUCATION

Friday, December 31, 2021

इयत्ता तिसरी १४. स्वयंपाक घरात जाऊया

 स्वयंपाक घरात जाऊया

प्रश्न 1 खालील पदार्थ कोणत्या प्रक्रियेने करतात ते लिहा

          ढोकळा - वाफवणे

            करंजी - तळणे

           बासुंदी - उकळणे 

           आमटी - उकळणे 

       थालीपीठ - भाजणे

              रस्सा - उकळणे 

________________________________________

प्रश्न 2 दुधापासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी तयार करा            उत्तरदही,ताक,लोणी,तूप,पनीर,बासुंदी,खवा,शिकरण, खीर, रबडी, रसमलाई.

________________________________________

प्रश्न 3 हरभरा वापरून कोणकोणते पदार्थ बनवतात ?

उत्तर- हरभरा वापरून लाडू,शेव,फाफडा, ढोकळा,उसळ,वरण,पुरण,भजी, वडे, कचोरी असे पदार्थ बनवतात.

_________________________________________

प्रश्न ४ भाजी मंडईतून आणलेल्या काही भाज्या आपण न शिजवता खातो अशा भाज्यांची यादी करा:

उत्तर - काकडी, बीट, शेंगडी, टोमॅटो, कैरी,मेथी, गाजर, मुळा 

_________________________________________

 प्रश्न ५ थोडक्यात उत्तरे द्या

  अ ) अन्न पदार्थ बनवताना उष्णता दिल्याने कोणते फायदे होतात?

उत्तर - अन्न पदार्थ बनवताना उष्णता दिल्याने ते पचायला हलके होतात तसेच अन्नपदार्थ खमंग आणि रुचकर लागतात.

_________________________________________

आ ). सरपण वापरल्याने परिसराची काय हानी होते?

 उत्तर - सरपण मिळवण्यासाठी परिसरात असणारी झाडे तोडावी लागतात त्यामुळे झाडांची संख्या कमी होते व प्रदूषण वाढते, पाऊस कमी पडतो. लाकडाचा धूर देखील होतो.

_________________________________________

इ ) स्वयंपाकासाठी गॅस वापरण्याचे फायदे कोणते ?

उत्तर - स्वयंपाकासाठी गॅस हे इंधन वापरणे सोपे असते गॅस पटकन पेटतो व त्याचा धूर होत नाही. गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो.

_________________________________________

प्रश्न ६. एका वाक्यात उत्तरे द्या

अ ) उष्णता देण्याच्या विविध पद्धती कोणत्या ?

उत्तर - उकळणे,वाफवणे, तळणे ,भाजणे या उष्णता देण्याच्या विविध पद्धती आहेत.

_________________________________________

आ )शेगडी मध्ये कोणते इंधन वापरतात ?

उत्तर -शेगाडीमध्ये लाकूड, कोळसा हे इंधन वापरतात. 

_________________________________________

इ )ज्वलनशील पदार्थ म्हणजे काय?

उत्तर - जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ म्हणतात.

_________________________________________

ई )उष्णता न देता तयार करता येणारे पदार्थ कोणते ?

उत्तर - कोशिंबीर ,शिकरण,भेळ असे पदार्थ उष्णता न देता तयार करतात.

_________________________________________

उ )इंधन कशाला म्हणतात ?

उत्तर - जे सहज भेटू शकतात व जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांना इंधन असे म्हणतात.

No comments:

Post a Comment