DAILY EDUCATION

Friday, February 11, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सहावी विषय इतिहास नागरिकशास्त्र

विषय इतिहास आणि नागरिकशास्त्र







• भारतीय उपखंडाची सविस्तर माहिती लिहितो.

• परिसरात आढळणाऱ्या जलाशयाजी विषयी माहिती मिळवतो.

• इतिहासाच्या साधनांची माहिती समजावून घेतो. 

• इतिहासाच्या भौतिक व मौखिक साधनांची माहिती मिळवतो. 

• हडप्पा संस्कृतीचा इतिहास सविस्तरपणे लिहितो.

• हडप्पा संस्कृतीची चित्रे ओळखतो.

• इतिहास लेखनाबाबत कोणती काळजी घ्यावी याविषयी समजून घेतो.

• भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये याविषयी माहिती मिळवितो. 

• घराच्या प्रकाराची माहिती मिळवतो. 

• घराच्या वेगवेगळ्या प्रकाराचे चित्रे काढतो.

• घरांच्या वेगवेगळ्या प्रकाराची चित्रे जमा करतो. 

• परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात याची यादी बनवतो. 

• प्राचीन भारताचा इतिहास लेखनाच्या साधनांची यादी बनवतो. 

• प्राचीन काळातील नगररचना व घरे कशा प्रकारची होती हे स्पष्ट करून सांगतो. 

• गटारे झाकली नसतील तर कोणत्या समस्या निर्माण होतील याविषयी चर्चा करतो. 

• आणखी पन्नास वर्षानंतर समाज कसा असेल याविषयी चर्चा करतो.

• माणसाला समाजाची गरज का वाटली या विषयी माहिती लिहितो. 

• समाज म्हणजे काय हेच समजून घेतो. 

• हडप्पाकालीन लोक जीवन व व्यापार या विषयी माहिती मिळवितो.

• हडप्पाकालीन मुद्रा, भांडी यांची माहिती समजावून घेतो. 

• समाज कसा तयार होतो याची सविस्तर माहिती लिहितो. 

• बँकेला भेट देतो.

 • बँक कोणत्या कामासाठी कर्ज देते याची माहिती मिळवितो. 

• हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे यांची कारणे सांगतो. 

• मानवाच्या मूलभूत गरजा व नवीन गरजा यांची यादी करतो. 

• वैदिक काळातील शेती, पशुपालन, आर्थिक, सामाजिक स्थितीचे वर्णन करतो. 

• वैदिक वांग्मय याविषयी माहिती मिळवितो. 

• बौद्ध धर्माची सविस्तर माहिती लिहितो. 

• जैन धर्माची सविस्तर माहिती लिहितो.

 • गौतम बुद्धा विषयी माहिती चित्रासहित संकलित करतो. 

• महावीर जैन यांच्या विषयीची माहिती चित्रासहित संकलित करतो. 

• गौतम बुद्ध विषयीची माहिती इंटरनेटवर मिळवितो. 

• ज्यू धर्माची माहिती सांगतो. 

• ख्रिश्चन प्रार्थना स्थळाचे चित्र काढतो. 

• इस्लाम धर्माची माहिती सांगतो.

 • इस्लाम धर्मा विषयीची माहिती मिळवितो.

 • विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांना भेटी देतो. 

• विविध सणांची माहिती व चित्रे यांचा संग्रह करतो. 

• अष्टांगिक मार्ग क्रमानुसार सांगतो. 

• विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांची चित्रे जमवतो. 

• प्रार्थना स्थळांची चित्रे जमा करुन चिकटवहीत चिकटवतो. 

• मगध साम्राज्याच्या उदयाची माहिती लिहितो.

 • भारतातील महाजन पदाविषयी माहिती संग्रहित करतो. 

• जनपदाची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगतो. 

• सोळा महाजन पदांची प्राचीन व आधुनिक नावांचा तक्ता तयार करतो. 

• परिसरातील किल्ल्याविषयीची माहिती मिळवितो. 

• लष्करात कोणकोणती दले आहेत याविषयी माहिती मिळवितो. 

• भारतीय लष्करा विषयीची माहिती इंटरनेटवर मिळवतो. 

• भारताच्या नकाशाच्या आराखड्यात महाजनपदे दाखवतो. 

• सिकंदराच्या स्वारीचे वर्णन करतो.

 • मौर्य साम्राज्य विषयी माहिती मिळवितो.

 • चंद्रगुप्त मौर्य विषयी माहिती लिहून आणतो.

 • अशोकाची माहिती संग्रहित करतो. 

• माहिती संग्रहित करून वर्गात वाचून दाखवतो.

• कलिंगच्या युद्धाची माहिती मिळवितो. 

• सम्राट अशोकावर कलिंगच्या युद्धाचा झालेला परिणाम यावर वर्गात चर्चा करतो. 

• मौर्यकालीन लोकजीवनाची माहिती सांगतो.

• कला आणि साहित्याची माहितीची वर्गात चर्चा करतो. 

• परिसरातील लोकप्रतिनिधी विषयी माहिती मिळतो.

• लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाची माहिती मिळवून लेखन करतो.

• ग्रीक सम्राट सिकंदर विषयी माहिती लिहितो. 

• सिकंदरने पाडलेल्या नाण्यांचे चित्र मिळवतो. 

• वर्धन राजघराणे याविषयी माहिती लिहितो. 

• घराणे याविषयी माहिती स्पष्ट करून सांगतो. 

• नकाशाचे निरीक्षण करुन गुप्त साम्राज्यातील आधुनिक शहरांची या नावाची यादी करतो. 

• कनिष्काची माहिती मिळवितो. 

• प्राचीन इतिहासाविषयीचे शब्दकोडे जमा करतो. 

• वाकाटक राजघराणे विषयी माहिती मिळवितो. 

• भारतातील प्राचीन राज्याची माहिती समजावून घेतो. 

• राजघराणे व माहिती यांचा तक्ता तयार करतो.

• वेरूळच्या लेण्यांची चित्रे व माहिती संग्रहित करतो. 

• अजिंठा येथील लेण्यांची माहिती गोळा करतो. 

• पाठातील चित्रांचा संग्रह करून माहिती मिळवितो. 

• सातवाहन राजघराणे विषयी माहिती मिळवितो. 

• भारतातील प्राचीन राज्यांची माहिती समजावून घेतो.

 • स्थापत्य व कला याविषयी चर्चा करतो.

• विविध विषयांची माहिती समजावून घेतो. 

• प्राचीन ग्रंथांची यादी तयार करतो. 

• प्राचीन भारतातील लोकजीवनाविषयी माहिती लिहितो. 

• भाषेविषयी माहिती सांगून विविध भाषांची यादी बनवतो. 

• व्यापारासाठी महत्त्वाच्या बंदरांचे केंद्र याविषयी माहिती मिळवितो. 

• गांधार शैलीचे चित्र पाहून माहिती सांगतो.

• गांधार शैली व रेशीम मार्ग याविषयी अधिक माहिती मिळतो. 

• परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू कोणत्या आहे हे जाणून घेतो. 

• प्राचीन भारतातील शिक्षणाच्या केंद्राविषयी माहिती मिळवितो. 

• आवडलेल्या कलेविषयी माहिती मिळवतो व वर्गात सादरीकरण करतो. 

• चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला का चालना मिळाली या विषयी वर्गात चर्चा करतो. 

**नागरिकशास्त्र 

• स्थानिक शासन संस्था विषयी माहिती मिळवितो. 

• ग्रामपंचायतीचे कार्य स्पष्ट करतो.

• ग्रामपंचायतीचे कार्य समजावून घेतो.

• विविधता हिच ताकद हे विधान स्पष्ट करतो. 

• धर्मनिरपेक्षते विषयी सविस्तर माहिती लिहितो. 

• शाळेत वर्गात कोणते नियम पाळले जातात त्याचा तक्ता तयार करतो. 

• समाजासाठी आवश्यक असणाऱ्या नियमांची यादी बनवतो. 

• धर्मनिरपेक्षतेसाठी संविधानातील तरतुदीची यादी करतो.

• गावातील ग्रामसभा कशी असते याविषयी माहिती मिळवितो. 

•अभिरूप ग्रामसभेचे आयोजन करतो.

•अभिरूप ग्रामसभा आयोजित करून सरपंच सदस्य नागरिक या भूमिका वर नाट्यीकरण तयार करतो. 

• परिसरातील किंवा शहरानजीकच्या परिषदेच्या योजनांची माहिती मिळवितो.

• पंचायत समितीची माहिती सांगतो. 

• पंचायत समितीचे पदाधिकारी व कामे यांची यादी तयार करतो. 

• आपत्ती व निवारण्याचे उपायांची यादी बनवतो. 

• आपल्या नजीकच्या पोलिस ठाण्याविषयी माहिती मिळवितो. 

• नजीकच्या पोलिस ठाण्याच्या कामकाजाविषयीची माहिती मिळवितो. 

• जिल्हा पोलीस प्रमुख विषयी माहिती संग्रहित करतो.

• जिल्हाधिकाऱ्यांची कार्य समजावून घेतो. 

• जिल्हा न्यायालयाची माहिती सांगून कामकाजाचे वर्णन करतो. 

• नगरपंचायती विषयी माहिती लिहितो. 

• शहरातील प्रश्न व त्यावरील उपाय यांचा तक्ता बनवतो.

• स्थानिक शासन संस्थाची माहिती देणारा तक्ता तयार करतो. 

• महानगरपालिकेच्या कामांची यादी बनवतो. 

• नगरपरिषदला भेट देऊन त्यांची कामे कोणते हे जाणून घेतो. 

• नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग याविषयी माहिती गोळा करतो.

•साथीच्या रोगांचा प्रसाराची कारणे समजावून घेतो आरोग्य जागृती विषयी घोषवाक्य तयार करतो.


No comments:

Post a Comment