DAILY EDUCATION

Thursday, March 3, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी विषय गणित







• कोन दुभाजक व रेषाखंडाचा लंबदुभाजक आकृत्यांवरून समजावून घेतो. 

• विविध मापाद्वारे रेषाखंड त्यांचे लंबदुभाजक कोन काढतो. 

• तीन बाजू वर त्रिकोण कसा काढायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो.

• दिलेल्या मापावरून कोन काढतो.

• अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार यांची नियम समजावून घेतो.

• पूर्णांकाचे गुणाकार व भागाकार यांच्या नियमांचा तक्ता तयार करतो.

• पूर्णांक संख्यांचा भागाकार विविध उदाहरणावरून सोडवून दाखवतो.

• पूर्णांकाची बेरीज व वजाबाकीची उदाहरणे सोडवतो.

• दोन कोन व त्यांची बाजू दिली असता त्रिकोण काढून दाखवतो.

• रचनेचे महत्त्व समजावून घेतो.

• त्रिकोण रचनेची संकल्पना स्पष्ट करतो. 

• त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म स्पष्ट करतो.

• विविध उदाहरणांद्वारे पूर्णांक संख्याच्या गुणाकाराचे नियम स्पष्ट करतो. 

• पूर्णांक घेऊन तोच पूर्णांक उत्तर येईल असा भागाकार तयार करतो. 

• दिलेल्या संख्येचा लसावी मसावी काढतो.

• दिलेल्या संख्येतील मूळ संख्या ओळखतो.

• जोडमूळ संख्या समजावून घेतो.

• दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडतो.

• स्ट्रॉ किंवा सरळ काड्या द्वारे कोनाच्या जोड्या तयार करतो.

• दिलेल्या कोणाचे अंतर्भाग व बाह्यभाग कोणते ते सांगतो.

• दिलेली पदावली सोडवून दाखवतो. 

• संख्या आणि त्यांचे वर्ग यांचा तक्ता तयार करतो.

• संख्या आणि वर्गमूळ यांचा तक्ता तयार करतो.

• वर्ग व घन यांचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

• आलेख कागदावर जोडस्तंभालेख काढून दाखवतो. 

• परिमेय संख्यावरील क्रिया करतानाचे नियम समजावून घेतो. 

• विविध उदाहरणांद्वारे परिमेय संख्यांचा गुणाकार व्यस्त समजावून घेतो.

• कोटीकोनाच्या विविध आकृत्या गोळा करतो.

• वर्तमानपत्र, कागद इत्यादी चा वापर करून विविध कोनाचे माप तयार करतो व वहीत चिकटवतो.

• पदावली यांचे विविध उदाहरणे गोळा करून ते सोडवतो.

• विविध उदाहरणे घेऊन वर्गमूळ काढतो.

• बैजिक राशींची उदाहरणे सोडवतो.

• बैजिक राशी संबंधित आकृतिबंधाचे निरीक्षण करतो व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.

•समप्रमाणाची विविध उदाहरणे सोडवतो.

• विज्ञानातील व दैनंदिन व्यवहारातील समप्रमाणाची उदाहरणे गोळा करतो. 

• भागीदारीची संकल्पना समजून घेतो.

• भागीदारी विषयी मित्रांमध्ये चर्चा करतो.

• समप्रमाण व व्यस्तप्रमाणाची विविध उदाहरणे गोळा करतो. 

• विविध उदाहरणांद्वारे समीकरणाची मांडणी अचूक करतो.

• क्रेडिट-डेबिट, एटीएम कार्डचे उपयोग सविस्तरपणे लिहितो.

• विविध खात्यांची माहिती समजावून घेतो. 

• बँकेच्या कार्यालयीन कामकाजाचे चित्र काढतो.

• विविध गोलाकार वस्तू पाहून त्यांचा परीघ व व्यास मोजतो. 

• अभ्यासावर आधारित उदाहरणे सोडवतो.

• व्याज ही संकल्पना स्पष्ट करून घेतो.

• व्याजावर आधारित उदाहरणांमध्ये विषयी माहिती मिळवितो.

• वर्तुळ कंसाची माहिती समजावून घेतो. 

• विविध सूत्रांची यादी बनवतो.

• खोखो, कबड्डी,टेनिस कोर्ट, बॅडमिंटन यांचे क्षेत्रफळ काढतो.

• परिसरातील वस्तूंची परिमिती मोजतो व नोंदी ठेवतो.

• परिमिती वरील उदाहरणांचा संग्रह करतो.

• वारंवारतेच्या उदाहरणांचा संग्रह करून ती सोडवतो. 

• टीव्ही, वर्तमानपत्रात कोणकोणत्या सरासरी विषयी बातम्या येतात याची नोंद घेतो.

• शिक्षक हजेरी पत्रकात महिन्याची सरासरी हजेरी कसे काढतात याचे निरीक्षण करतो,

• सरासरीचे सुत्र समजावून घेतो.

• सरासरीचा उपयोग कोणकोणत्या विषयात होतो याची यादी बनवतो.

• पृष्ठफळ व घनफळ याचे उदाहरण सोडवतो.

• वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काढतो.

• एक ते पन्नास या संख्या समूहातील पायथागोरसची त्रिकूटे शोधतो.

• वर्ग विस्ताराची माहिती समजावून घेतो. 

• विविध राशी घेऊन त्यांचा विस्तार करतो.

• चलाच्या ठिकाणी किमती घेऊन वर्ग विस्तार सूत्रांचा पडताळणी घेतो.

• परिमितीच्या सूत्राचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

• वर्तुळाचे माप मोजण्याची पद्धत सांगतो. 

• दिलेल्या वर्तुळातील कंसांची नावे लिहितो. 

• त्रिकोणाच्या बाजू वरून कर्ण काढून दाखवतो.

No comments:

Post a Comment