DAILY EDUCATION

Thursday, March 3, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिक शास्त्र






**इतिहास**

• इतिहासाच्या लिखित साधनांची यादी करतो.

 •भौतिक साधनांची यादी करतो.

• पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करून सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करतो. 

•शीख संप्रदायबद्दल माहिती मिळवतो व लिहितो.

• महानुभाव पंथाची स्थापना व विस्तार या विषयी माहिती संग्रहित करतो.

 •शिवपूर्वकालीन काळातील संतांची चित्रे मिळून त्यांचे विषयी माहितीचा संग्रह तयार करतो.

• शिवपूर्व काळातील महाराणा प्रताप यांचे विषयी चित्र माहिती मिळवून संग्रहित करतो.

 •शिवपूर्वकालीन भारतातील राजसत्ता व त्यांचे प्रांत, राजे, राजधान्यांची सूची बनवितो.

• मुघल सत्तेची स्थापना व विस्तार व संघर्ष या विषयी माहिती सांगतो.

• संत नामदेवाचे अभंग व गुरु ग्रंथसाहिब मधील पदांचा संग्रह करतो.

• गाव, कसबा, परणा याविषयी माहिती स्पष्ट करतो.

 •वारकरी संप्रदायातील संत परंपरेविषयी माहिती लिहितो.

• संत एकनाथाचे भारुड मिळवून वर्गात सादर करतो.

 •संत तुकारामाची माहिती व कार्य स्वतःच्या शब्दात लिहितो.

• पंढरपूरच्या वारी विषयी अधिक माहिती मिळवितो. 

•शहाजीराजे विषयी माहिती सांगतो. 

•शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित नाट्यीकरण करतो.

• शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी बनवतो. 

•स्वराज्याची राजधानी रायगड विषयी माहिती मिळवितो.

• परिसरातील ऐतिहासिक स्थळास भेट देऊन अहवाल बनवितो.

• शिवरायांच्या राज्यभिषेकाची तयारी कशी केली होती याची माहिती सांगतो.

 •शिवरायांच्या राज्याभिषेकाचे वर्णन लिहतो.

• शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर वेगवेगळी चित्रे मिळवून ती वहीत चिकटवतो.

• बाजीप्रभूच्या घोडखिंडीतील पराक्रमावर चर्चा करतो. 

•शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचा तक्ता तयार करतो. 

•शिवरायांचे व्यापार व उद्योग धोरण या विषयी माहिती लिहितो. 

•शिवाजी महाराजांची लष्करी व्यवस्था विद्यार्थी समजून घेतो. 

•शिवरायांच्या शेती धोरणाविषयी माहिती मिळवितो.

• शिवाजी महाराजांचे लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचतो व चर्चा करतो.

• शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीच्या प्रसंगाचे वर्णन करतो.

• संभाजी महाराजांच्या सिद्धी विरुद्धच्या मोहिमेची माहिती लिहितो.

• भारताच्या नकाशात गोवा, विजापूर, गोवळकोंडा, जिंजी, अहमदाबाद ही ठिकाणे दाखवतो.

 •महाराणी ताराबाईच्या कार्याची माहिती लिहितो. 

•संभाजी महाराजांचा बुधभूषण या ग्रंथाविषयी माहिती मिळवितो.

• पेशवा नानासाहेब यांच्या कार्याची माहिती सांगतो. 

•नकाशाच्या मदतीने मराठी सत्तेचा विस्तार समजून घेतो. 

•समाजातील अनिष्ट चालीरिती दूर करण्यासाठी उपाय सुचवितो.

•शिवपूर्व काळातील खेळाचे वर्गात प्रात्यक्षिक करतो.

 •मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे स्पष्ट करतो.

 •त्या काळातील सामाजिक परिस्थितीची माहिती मिळवितो. 

•महादजी शिंदे यांचे चित्र मिळवून त्यांच्या पराक्रमाची माहिती सांगतो.

• अहिल्याबाई होळकर यांचे विषयी भाषण तयार करतो आणि वर्गात सादर करतो.

• सवाई माधवराव पेशव्यांच्या राजदरबाराची माहिती सांगतो.

• इंटरनेटच्या मदतीने पानिपतच्या लढाईची माहिती मिळवितो.

• देशातील कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती मिळवून वाचन करतो.

• पेशवेकाळातील चित्र मिळवून वर्गात दाखवतो.

 •परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात याविषयी टिपणी तयार करतो.

• परिसरातील सण व उत्सव याची माहिती लिहितो.

• भारतात साजरे साजरे केल्या जाणाऱ्या सणांची यादी तयार करतो. 

**नागरिक शास्त्र**

• संविधानाचा अर्थ सांगतो.

• विविध देशाच्या संविधानाची माहिती मिळवितो.

• संविधानातील तरतुदी व संकल्पना स्पष्ट करतो. 

•समाजवादाची संकल्पना सविस्तरपणे समजून घेतो.

 •संविधान दिन शाळेत कसा साजरा झाला याचा अहवाल तयार करतो.

• संविधान लिहिण्यास प्रति डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याविषयी माहिती लिहितो.

• संविधानाची आवश्यकता का आहे या विषयावर चर्चा करतो.

• धर्मनिरपेक्षतेचा अर्थ समजावून घेतो.

• न्याय, स्वातंत्र्य व समता या मूल्यांचा अर्थ समजावून घेतो. 

•संविधान सभेसाठीच्या समित्यांमधील सदस्यांचा चित्रासहित नावाचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

• संघराज्य व्यवस्था या संविधानाच्या वैशिष्ट्याची वर्गात मित्रांसोबत चर्चा करतो.

• भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश व राजधान्या यांचा तक्ता तयार करतो.

 •संघराज्यात कोणते विषय आहेत याची यादी तयार करतो.

• समानतेच्या हक्काविषयी माहिती सांगतो.

 •बालकांचे हक्क, महिलांचे हक्क,आदिवासीचे हक्क कोणते ते इंटरनेटवर शोधतो.

• केंद्र व राज्य सरकार द्वारा देण्यात येणाऱ्या पदव्या व पदकांच्या नावांची यादी तयार करतो. 

•परिसरातील बालकामगार शोधतो. 

•शोषणाविरुद्धचा हक्क विषयीची माहिती समजावून घेतो. 

•स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करतो.

•मार्गदर्शक तत्त्वांची सूची तयार करून वर्गात लावतो.

 •शिक्षण हा आपला हक्क आहे त्या संदर्भातील आपली कर्तव्य यावर चर्चा करतो.

• पर्यावरणाचे जतन व संरक्षण कशा प्रकारे करू शकतो हे उदाहरणासह लिहितो.

• मूलभूत कर्तव्याची यादी लिहून त्याचा तक्ता वर्गात लावतो.

•शासनावर कोणते निर्बंध असतात याचा माहिती मिळवितो.


No comments:

Post a Comment