DAILY EDUCATION

Thursday, March 3, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सातवी विषय कार्यानुभव

 







• वस्त्र या संकल्पनेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करतो. 

• भाज्यांचे जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतो व माहिती नोंदवतो. 

• भाज्यांची चित्रे पाहून भाज्यांची नावे सांगतो.

• कार्डशिट पासून पत्रपेटी तयार करतो.

• पत्रपेटीची ओळख करून घेतो.

• पुठ्यापासून कॅलेंडर बनविण्याची कृती करतो.

• नवीन वर्षाच्या कॅलेंडरची ओळख करून घेतो.

• अपघात होण्याची कारणे लक्षात घेतो 

• मानव निर्मित आपत्तीची चित्रे पाहून निरीक्षण करतो. 

• निरनिराळ्या वस्तू प्रकारांचे नमुने तयार करतो. 

• दैनंदिन जीवनामध्ये पाणी कोठे कोठे उपयोगी पडते या विषयी माहिती लिहितो.

• दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्त्व समजावून घेतो.

• पाण्याचे महत्व व उपयोग याविषयी मित्रांमध्ये चर्चा करतो.

• पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा याविषयी तक्ता तयार करतो.

• कापडी वस्तू तयार करून दाखवतो.

• विविध कापडी वस्तू तयार करतो.

• भरपूर उत्पन्न देणाऱ्या पिकाविषयी माहिती संग्रहित करतो.

• विविध पिकांची चित्रे पाहतो व नावे सांगतो.

• मण्यांपासून माळा तयार करतो.

• पेनच्या रिकाम्या रिफिल्सपासून माळा तयार करतो.

• मातीच्या फुलदाण्याचे निरीक्षण करतो.

• मातीच्या फुलदाण्या तयार करून त्यावर सुबक नक्षीकाम करतो. 

• जलसाक्षरते विषयीचे ज्ञान मिळवितो.

• पाण्याचे पुनर्भरण कसे करायचे हे कृतीद्वारे समजावून सांगतो.

• आकाशकंदिलाचे बारकाईने निरीक्षण करतो.

• रंगीत कागदाला घड्या घालून आकाशकंदील तयार करतो. 

• सुधारित सिंचन पद्धतीचे उपयोग सांगतो.

• सुधारित प्रवाही सिंचन पद्धती विषयी माहिती मिळवितो.

• दरडोई उपलब्धी ही संकल्पना स्पष्ट करून घेतो.

• पिकांसाठी पाण्याची गरज अत्यंत उपयोगी असते हे उदाहरणासह स्पष्ट करतो.

• तलावाची सफाई करण्याकरता आवश्यक साहित्याची नावे सांगतो.

• परिसरातील तलावाला भेट देतो व निरीक्षण करतो.

• घराच्या प्रतिकृती तयार करून दाखवतो.

• दंगल होण्याची कारणे लिहितो.

• दंगल आणि युद्ध यातील फरक समजावून घेतो.

• मानवी चेहऱ्याची सजावट वैयक्तिकरित्या करतो.

• फळ संरक्षणाची तत्वे क्रमानुसार सांगतो.

• फळांची चित्रे पाहून नावे सांगतो. 

• कापूस, कापड यांपासून आकृतिबंध तयार करतो.

• खडू तयार करण्याची कृती करतो. 

• खडू बनविण्याच्या साहित्याची नावे सांगतो.

• वाळलेल्या पानांना कसे रंगवायचे याचे प्रात्यक्षिक करतो.

• वाळलेल्या पानाचे निरीक्षण करतो.

• आपत्ती प्रतिबंध साधनांची नावे सांगतो.

• वायुगळती होणे म्हणजे काय हे विद्यार्थी सांगतो.

• रांगोळीचे साचे तयार करून दाखवतो.

• गर्दी, चेंगराचेंगरी याविषयी माहिती सांगतो.

• समाजामध्ये सुरक्षितते संबंधी घ्यावयाची काळजी याविषयी जाणीव निर्माण करतो.

• आग लागण्याची कारणे या विषयीची यादी तयार करतो.

• आपत्ती प्रतिबंधक साधनांची चित्रे व नावे यांचा तक्ता तयार करतो. 

• पाणी कोणकोणत्या ठिकाणापासून मिळते याची माहिती मिळवितो.

• गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा आराखडा तयार करतो. 

• लाकूड कामातील खिळे ,स्क्रू इत्यादी साहित्याची निरीक्षण करतो. 

• कार्डशिट व कापडापासून विविध आकाराच्या फाईल तयार करतो.

• केरसुणी तयार करण्याची कृती करतो.

• शोभिवंत मासे पाहून त्यांचे निरीक्षण करतो.

• द्रवरूप साबण तयार करतो.

• द्रवरूप फिनेल तयार करून दाखवतो.

No comments:

Post a Comment