*खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा:
१. सखाराम व त्याचे कुटुंब कोणत्या विभागातील गावात राहत होते ?
उत्तर - सखाराम व त्याचे कुटुंब खानदेश विभागात राहत होते.
---------------------------------
२. सुलभा व सखाराम कोणते काम करायचे?
उत्तर - सुलभा व सखाराम मजुरी करायचे.
--------------------------------
३. घरी येतात सुलभाने कोणास हाक दिली ?
उत्तर - घरी येताच सुलभाने स्नेहास हाक दिली.
-------------------------------
४.गावात कितवी पर्यंत शाळा होती?
उत्तर -गावात चौथीपर्यंत शाळा होती.
-------------------------------
५.स्नेहा का रडत होती ?
उत्तर - स्नेहाला पाचवीमध्ये नाव घालायचे होते परंतु तिचे वडील तिला शिकवायला तयार नव्हते म्हणून स्नेहा रडत होती.
-----------------------------
६. सरपंचांनी बबलीचा कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता?
उत्तर - सरपंचांनी बबलीचा पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.
-------------------------------
७.स्नेहा शाळेत कोणत्या वाहनाने जाणार होती?
उत्तर - स्नेहा शाळेत एस.टी.ने जाणार होती.
--------------------------------
८. स्नेहाची मैत्रीण कोण होती ?
उत्तर - स्नेहाची मैत्रीण बबली होती.
-------------------------------
९. बबली कोणाची मुलगी होती?
उत्तर - बबली सरपंचांची मुलगी होती.
------------------------------
१०. मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले?
उत्तर - स्नेहाचा पाचव्या इयत्तेत प्रवेश करा हे सांगण्यासाठी
मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी गेले.
--------------------------------
११. स्नेहाने घरी राहून काय करावे असे सखारामला वाटे?
उत्तर - स्नेहानी घरी राहून आपल्या धाकट्या भावाला सांभाळावे असे सखारामला वाटे.
------------------------------
१२.सखारामला काय अवघड वाटत होते ?
उत्तर - गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणे सखारामला
अवघड वाटत होते.
------------------------------
१३. स्नेहाने कोणती परीक्षा दिली होती?
उत्तर - स्नेहाने शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती.
-----------------------------
१४. कोणाची मुलगी डॉक्टर झाली होती?
उत्तर - दामू अण्णांची मुलगी डॉक्टर झाली होती.
------------------------------
१५. स्नेहाला अतिशय आनंद का झाला ?
उत्तर -सखारामने स्नेहाला पुढील शिक्षण देण्याचे ठरविले, म्हणून स्नेहाला अतिशय आनंद झाला.
______________________________________________
No comments:
Post a Comment