DAILY EDUCATION

Thursday, February 15, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय ११.पाहू तरी शरीराच्या आत

 


११. पाहू तरी शरीराच्या आत.

• जरा डोके चालवा.

१) काचेच्या बरणीत सुटी बिस्किटे ठेवून, ती जोरजोराने उलटी पालटी केली. बिस्किटांचे काय होईल?

उत्तर - काचेच्या बरणीत सुट्टी बिस्किटे ठेवून ती उलटी पालटी केली तर बिस्किटे तुटतील त्यांचा चुरा पडू लागेल.

                      --------------------------

२) बिस्किटांचा पुडा जोरजोराने हलवला. पुड्यातील बिस्किटांचे काय होईल?

उत्तर - बिस्किटाचा पुडा जोराने हलवला तरी पुड्यातील बिस्किटांचे तुकडे होणार नाहीत.

                     ----------------------------

 ३) बरणीतील बिस्किटे फुटू शकतात, पण पुड्यातील बिस्किटे फुटत नाहीत. असे का होते?

उत्तर - बरणी ही बिस्किटे टाकल्यानंतर बरीच रिकामी आहे त्यात हवा साठली आहे. शिवाय बरणी जोरजोराने हलवली, की बिस्किटे बरणीच्या बाजूंना लागून एकमेकांवर आदळतात त्यामुळे ती फुटतात. बरणीच्या तुलनेत बिस्किटांचा पुडा हवाबंद असतो. पुडा जोरात हलवला तरी बिस्किटांना हलायला जागा नसते. म्हणून बिस्किटे फुटत नाहीत.

----------------------------------------------

• सांगा पाहू 

हे काका तोटीतून येणारे पाणी पिंपामध्ये भरत आहेत. तोटीपासून पिंप काही अंतरावर आहे. तरीही तोटीतून पडणारे पाणी पिंपापर्यंत पोचत आहे त्याचे कारण काय असेल?

 उत्तर - नळाच्या तोटीपासून पिंप काही अंतरावर असला तरी नळ उंच असल्याने पाईपात पाणी सहज वेगाने येते. पाईप पिंपामध्ये पाणी नेण्याचे काम करत असल्याने पाणी पिंपापर्यंत पोचत आहे.

----------------------------------------------

• जरा डोके चालवा 

१) पचनाचे काम करणारी इतर आंतरेंद्रिये उदरपोकळीत असतात, पण ग्रासनलिका मात्र वक्षपोकळीत असते त्याचे कारण काय ?

उत्तर गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोचवण्याचे काम ग्रासनलिका करीत असते. म्हणून ग्रासनलिका ही वक्षपोकळीत असते. 

-----------------------------------------------

२) ग्रासनलिकेच्या लवचिक भिंतीचा उपयोग कोणता?

उत्तर - ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते. त्यामुळे घशापासून आलेला घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो. 

-------------------------------------------------

• जरा डोके चालवा 

हृदय अंकुचन पावले की रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते त्याचे कारण काय असेल ?

उत्तर - हृदयाच्या आंकुचन आणि प्रसरण आलटून पालटून न थांबता होत असते. हृदय आंकुचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते. कारण बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला, तर जागा मिळेल तेथून द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो.

-----------------------------------------------

 स्वाध्याय 

अ) जरा डोके चालवा

• जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते?

उत्तर - जोराने पळत गेल्यामुळे पळत असताना श्वासोच्छवासाची क्रिया जलद गतीने होत असते. म्हणून जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप लागते.

---------------------------------------------------

आ) खालील प्रश्नांची उत्तरे द्या  

१) आंतरेंद्रिय म्हणजे काय?

 उत्तर -शरीराच्या आतील भागात असणाऱ्या इंद्रियांना आंतरेंद्रिय म्हणतात.

--------------------------------------------------

 २) पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे सांगा.

उत्तर - पोटाच्या भागातील पोकळीचे दोन भाग असतात त्यांना  ' उदरपोकळी ' आणि ' कटीपोकळी ' अशी नावे आहेत.

-------------------------------------------------

३) वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात? 

उत्तर - वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात हृदय आणि फुफ्फुसे ही महत्त्वाची इंद्रिये असतात.

-----------------------------------------------------

 ४) श्वास घेतल्याने छाती का फुगते?

 उत्तर - श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात त्यामुळे श्वास घेतल्यानंतर छाती फुगते. 

----------------------------------------------------

५) निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे?

 उत्तर - मेंदूला इजा झाली, तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे.

-------------------------------------------------------

इ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये उदरपोकळीत असतात.

                 ------------------

 २) आपल्याला दोन फुफ्फुसे असतात.

                 -------------------

 ३) हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात.

                  -------------------

 ४) सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते.

                   -------------------

 ५) मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे.

------------------------------------------------

ई )चूक की बरोबर ते लिहा 

१) ग्रासनलिका वक्ष पोकळीत असते.- बरोबर 

२) हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. - बरोबर 

३) तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. - बरोबर 

४) ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. - बरोबर 

------------------------------------------------

उ) कारणे लिहा. 

१) आंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावी अशीच शरीराची रचना असते.

कारण - शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवी .आपण कितीही हालचाल केली तरी आपली जागा सोडून इकडे तिकडे होणार नाहीत. अशी शरीराची रचना असते.

------------------------------------------------- 

 २) शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते राहते. 

कारण - आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो. ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करते. आपण अन्न खातो. त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते. म्हणून, शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते राहते. 

-------------------------------------------------

३) मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. 

कारण - आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. मेंदूला इजा झाली, तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो. किंवा तो दगावण्याचा संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची गरज असते.

--------------------------------------------------

 जोड्या लावा 

अ गट                                           उत्तर

१) रक्तपुरवठा                                हृदय 

२) श्वसन                                       फुफ्फुसे 

३) घास जठरापर्यंत पोहोचवणे        अन्ननलिका

४) हालचालींवर नियंत्रण                 मेंदू

--------------------------------------------------


No comments:

Post a Comment