DAILY EDUCATION

Thursday, February 15, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १. प्राण्यांचा जीवनक्रम











१. प्राण्यांचा जीवनक्रम

•जरा डोके चालवा 

कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे?


उत्तर - कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीला जसे दोन पाय, चोच असते तशीच चोच आणि पाय कोंबडीच्या पिल्लांनाही असते. कोंबडीचे पिल्लू अंड्यातून बाहेर निघाल्यावर कोंबडीसारखेच दाणे टिपते. या बाबतीत कोंबडी व कोंबडीच्या पिल्लांमध्ये सारखेपणा आहे.

----------------------------------------------

स्वाध्याय

जरा डोके चालवा

१) कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला २० ते २२ दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का?


उत्तर - कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला २० ते २२ दिवस लागतात. परंतु इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला तितकेच दिवस लागत नाहीत. कारण, प्रत्येक सजीवाचा जीवनक्रम हा वेगवेगळा असतो त्यामुळे इतर पक्ष्यांना अंड्यातून बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो.

------------------------------------------------- 

२) गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे ?


उत्तर - गवतात भिरभिरणारा चतुर ही प्रौढ अवस्था आहे.

----------------------------------------------

३. पालेभाजी निवडायला घेतली, की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल ?


उत्तर - पालेभाजी निवडायला घेतली, की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. कारण, जेव्हा फुलपाखरू ' अळी ' अवस्थेत असते म्हणजेच सुरवंट असते तेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते. त्यामुळे सुरवंट ज्या पानांवर अंड्यातून बाहेर पडतो तेच पान खायला सुरुवात करतो.

-------------------------------------------------

४) पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या, की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. फुलपाखराच्या वाढीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते ?


उत्तर - पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या, की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. फुलपाखराच्या वाढीतील चार अवस्थांपैकी ही सुरवंट अवस्था आहे. 

------------------------------------------------

आ) थोडक्यात उत्तरे लिहा 

१) कोंबडीला अंडी का उबवावी लागतात ?


उत्तर - कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. पिल्लांची वाढ पूर्ण व्हावी आणि पिल्लू अंड्यातून बाहेर पडावी यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात.

--------------------------------------------------

२) अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते ?


उत्तर - अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक होते, कारण जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा तिला अंड्याची काळजी वाटत असते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते.

-----------------------------------------------

३) फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या ?


उत्तर - फुलपाखरांची वाढीच्या अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात.

----------------------------------------------------

४) कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात ?


उत्तर - कोशाच्या आत बिबळ्या कडवा अकरा किंवा बारा दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही. पण, आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल होत असतात. पायाची लांबी वाढते. आकर्षक पंख निर्माण होतात.

------------------------------------------- 

इ) चूक की बरोबर ते सांगा 

१) शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. - चूक

२) मुंग्यांची अंडी छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. - बरोबर 

३) अंड्यातून फुलपाखरांची सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. - चूक 

-----------------------------------------------

ई) गाळलेले शब्द भरा 

१)फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते. 

२)फुलपाखरांच्या अळीला सुरवंट म्हणतात.

--------------------------------------------------

No comments:

Post a Comment