DAILY EDUCATION

Friday, February 16, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय,२. सजीवांची परस्परांशी नाते



२. सजीवांचे परस्परांशी नाते.

•सांगा पाहू 

परिसरातल्या अनेक वनस्पती निरनिराळ्या कारणांसाठी आपल्याला उपयोगी पडतात. पुढे काही वनस्पतींची नावे दिली आहेत. त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो?

१) नागवेल - नागवेल ही वनस्पती अन्नपचनासाठी, खोकल्यासाठी योग्य व गुणकारी वनस्पती आहे. जेवणानंतर याचे पान खाल्ल्या जाते.

               --------------------------------

२) पळस - पळसाच्या शिंगेतील बियांपासून तेल काढतात  खोडापासून नोंद निघतो त्याचा औषधी म्हणून वापर करतात. पळसाच्या नवीन मुळापासून मजबूत दूर बनविता येतो. हे झाड उन्हाळ्यात गर्द लाल भडक रंगाच्या फुलांनी अग्नी पेटल्यासारखे वाटते. रंगपंचमीसाठी रंग तयार करण्यासाठी याच्या फुलांचा वापर केला जातो.

                   -----------------------------

३) मेथी - मेथीचा औषधी म्हणून खूप उपयोग आहे. मधुमेहासारख्या रोगावर मेथीचा उपयोग होतो. मेथीची पाने आणि मेथीच्या दाण्याचा उपयोग खाण्यासाठी होतो त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात.

               ---------------------------

४) अडुळसा - अडुळसाच्या पानांचा उपयोग खोकल्यावर औषध म्हणून केला जातो. तसेच दमा व घशाच्या विकारावर आणि विंचूदंशावर देखील या पानांचा रस गुणकारी ठरतो. 

                   -----------------------

५) कढीलिंब - कढीलिंब या वनस्पतीचा उपयोग आपण नेहमी करत असतो. ही वनस्पती आपण अनेक अन्नपदार्थात वापरतो याचा उपयोग केसावरील विकार तसेच पोटावरील विकार यावर केला जातो.

--------------------------------------------------

•सांगा पाहू 

पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले ते त्यांना जमेल का ?

उत्तर - पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले तरी ते त्यांना जमणार नाही. कारण मासे हे जलचर प्राणी आहेत. त्यांचे पोषण हे पाण्यातच होते. मासे हे पाण्याबाहेर श्वासही घेऊ शकत नाही. त्यामुळे पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले तरी त्यांना ते कधीच जमणार नाही.

--------------------------------------------------

• सांगा पाहू.

१) रेशीम माणसाला कुठून मिळते?

उत्तर - रेशीमच्या किड्यापासून माणसाला रेशीम धागा मिळतो.

--------------------------------------------------

 २) झाडांची उपयोग पक्ष्यांना कसा होतो ?

उत्तर - पक्षी हे झाडांवर घरटं करून राहतात. तसेच झाडावर लागलेली फळे खातात. अशा प्रकारे झाडांचा पक्षांना उपयोग होतो.

--------------------------------------------------

३) झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो?

उत्तर - माकड वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांचा उदरनिर्वाह हा झाडांवरील फळांमुळे होतो. तसेच माकडांचे घर म्हणजे ही झाडेच असतात. स्वतःचा बचाव करण्यासाठी माकड झाडांचा उपयोग करतात.

--------------------------------------------------

 ४) वाळवीने झाड पोखरले तर काय होते?

उत्तर - वाळवीने झाड पोखरले तर झाडाचे खोड हे आतून पोकळ होत जाते आणि तुटून पडते.

--------------------------------------------------

स्वाध्याय 

अ) काय करावे बरे ? 

गुरप्रीतकौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुटीतील छंदवर्गाला जायचे आहे. तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत.

उत्तर  गुरप्रीतकौर या मुलीला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुटीतील छंदवर्गाला जायचे आहे. तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रमाणात पाणी  प्यावे. तसेच लिंबू सरबत आणि ग्लुकोज पाणी बरोबर ठेवावे. घाम पुसायला हात रुमाल, टॉवेल सोबत न्यावा.

--------------------------------------------------

आ) विचार करा.

१. शेतात पीक उभे आहे अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पिक सोडून जाते त्याचे कारण काय असेल ?

उत्तर - पीकांना काही प्रमाणात पाणी आणि काही प्रमाणात ऊन हवे असते. त्यामुळे पीक चांगले होते. परंतु खूप पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी जमा होते. त्यामुळे पाणथळ जागी वनस्पती जगू शकत नाही. गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्याने पीक सडून जाते.

--------------------------------------------------

२) एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्यावर्षी, शेते का पिकत नाहीत?

उत्तर - शेतात पाणी जास्त झालं की पिक सडून जाते. त्याचप्रमाणे पाऊस कमी पडला की पीक येत नाही. कारण शेताला पाऊस आणि ऊन हे सारख्या प्रमाणात हवे असते. परंतु कमी पाऊस पडल्याने शेतीला पोषकता मिळत नाही. त्यामुळे शेती पिकत नाही.

--------------------------------------------------

 ३) धामण हा एक सापाचा प्रकार आहे. तो शेताच्या आसपास का राहत असेल?

उत्तर - साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. धामण साप हा शेताची नासाडी करणाऱ्या प्राण्यांचे भक्षण करीत असतो. त्यामुळे धामण साप हा शेताच्या आसपास राहत असेल.

--------------------------------------------------

 ४) बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ? त्याचे कारण काय असेल?

उत्तर - बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, तर त्यांचे केस दाट असतात. कारण, त्यांचे थंडीपासून रक्षण व्हावे ही निसर्गाची योजना आहे; मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या, रेनडिअर,अस्वल या प्रकारचे प्राणी बर्फाच्छादित प्रदेशात राहतात.

--------------------------------------------------

 इ) माहिती मिळवा.

महाराष्ट्रातील पुढील ठिकाणे कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत? 

क) नागपूर : संत्री

ख) घोलवड : चिकु 

ग) सासवड : फणस

घ) देवगड : हापूस आंबा 

च) जळगाव : केळी 

--------------------------------------------------

२. या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील त्याची माहिती मिळवा आणि लिहून काढा.

उत्तर - कारण त्या गावाचा परिसर, हवामान हे त्या फळाच्या झाडांसाठी योग्य असते. म्हणून त्या फळांची झाडे त्या विशिष्ट गावाच्या परिसरातच वाढत असतील. 

--------------------------------------------------

ई) खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 

१. वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो?

उत्तर - वनस्पतीची माणसाला गरज असते. अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ, फुले आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात. सुती कापडासाठी लागणारा कापूस, औषधी, लाकूड इत्यादी वस्तू मिळण्यास आपणास वनस्पतींचा उपयोग होतो.

--------------------------------------------------

२. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात ?

उत्तर - जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवणारे प्राणी, झाडावर राहणारे प्राणी म्हणजेच वृक्षव्रसी प्राणी होय. 

माकड, खारी, पक्षी हे वृक्षवासी प्राणी होय.

--------------------------------------------------

३. मार्च महिना सुरू झाला, की झाडांमध्ये काय बदल होतो ?

उत्तर - मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. याच सुमाराला अनेक झाडांना पालवी फुटते. रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. कोकीळ पक्ष्यांचा मंजुळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो.

--------------------------------------------------

उ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

 १. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. 

२.आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात, म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो.

 ३.वनस्पतीला कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो. 

४.हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात.

---------------------------------------------------

No comments:

Post a Comment