DAILY EDUCATION

Friday, February 16, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय,३.साठवण पाण्याची


३. साठवण पाण्याची

• जरा डोके चालवा.

तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत का, याची माहिती घ्या हे पाणी आता कसे वापरता येईल?

उत्तर - आम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत. आम्ही असलेल्या भागात हौद आहे. त्याचा वापर अजूनही होतो. पंपाने पाणी काढले जाऊन नळाद्वारे पुरविले जाते.

------------------------------------------------------------

 २) नदी, धरण, विहीर, तलाव इत्यादी जलसाठ्यांना पाणी कुठून मिळते?

 उत्तर - पावसापासून मिळणारे पाणी उंच भागाकडून सखल भागाकडे जमिनीवर वाहून जाते. काही पाणी जमिनीमध्ये मुरते. आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते. म्हणजेच नदी, धरण, विहीर, तलाव इत्यादी जलसाठ्यांना पाणी पावसापासून मिळते.

------------------------------------------------------------

स्वाध्याय 

थोडक्यात उत्तरे द्या. 

१) पाणी कशासाठी साठवायचे?

उत्तर - पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आणि पाणी सजीवांच्या जीवनात आवश्यक आहे. पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही. म्हणून पाणी साठवून ठेवणे गरजेचे आहे.

------------------------------------------------------------

२) पारंपारिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत ?

उत्तर - पारंपारिक पद्धतीत पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आड खणले जात असत. तसेच माठ, पिंप किंवा हौदात पाणी साठवले जात असे.

------------------------------------------------------------

३) धरण कशावर बांधतात? 

उत्तर - नदीचे पाणी अडवून नदीवर धरण बांधतात.

------------------------------------------------------------

४)पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ?

उत्तर -  पाण्याचा वापर काटकसरीने करावा. आपल्याला आवश्यक असेल इतकेच पाणी वापरावे. आदल्या दिवशी भरलेले पाणी शिळे झाले म्हणून फेकू नये. बराच काळ पाणी साठवले गेले तर ते बागकामासाठी किंवा कपडे धुण्यासाठी वापरावे. भांडी धुताना, कपडे धुताना, अंघोळ करताना सतत नळ उघडा ठेवू नये. ही काळजी घ्यावी.

------------------------------------------------------------

५) पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?

उत्तर - पाण्याचे स्त्रोत म्हणजे विहिरी, तलाव, नद्या यात मानव  कचरा टाकतो. संपूर्ण गावातील सांडपाणी हे या पाण्यात गोळा होते. तसेच लोक नदीवर, विहिरीवर कपडे धुतात, आंघोळ करतात, गाई म्हशी धूतात त्यामुळे पाणी दूषित होते. त्यालाच पाण्याचे प्रदूषण असे म्हणतात.

------------------------------------------------------------

आ) पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल, याचा विचार करा. त्यासाठी काय करता येईल ते सुचवा.

उत्तर - पाणीटंचाई असलेल्या भागात जमीन ही मातीचीच असू द्यावी. त्यामुळे त्यामध्ये पावसाचे पाणी मूरते व त्याचा उपयोग नंतर होऊ शकतो. तसेच घरी विहिरी आणि विंधन विहिरी तयार कराव्या. त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता येईल. पाण्याची साठवण करण्यासाठी टाक्या बांधाव्या. टॅंकरने पाणी बोलवावे. पाणी जमिनीत मुरेल अशी जागा ठेवावी. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात जमा होईल. अशाप्रकारे पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी साठवता येईल.

------------------------------------------------------------

इ) पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात ?

उत्तर - तोंड धुताना, कपडे धुताना, भांडी धुताना, अंघोळ करताना सतत नळ सुरू ठेवणार नाही.

२) बादलीत पाणी घेऊन त्याचा वापर करू.

३) घरात अधिक काळ साठवलेले पाणी बाग कामासाठी व कपडे धुण्यासाठी वापरू.

४) आपल्याला आवश्यक असेल तितकेच पाणी वापरू.

-------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment