DAILY EDUCATION

Friday, February 16, 2024

इयत्ता चौथी प. अ.१ स्वाध्याय,४. पिण्याचे पाणी



४. पिण्याचे पाणी.

•सांगा पाहू 

पावसाळ्यात नदीनाल्यांमधले पाणी गढूळ होते ते आपण का पीत नाही?

उत्तर - पावसाळ्यात नदीनाल्यामध्ये किनाऱ्यावरील कचरा, माती सुद्धा मिसळली असते. त्यामुळे पाणी गढूळ होते. ते पाणी प्यायल्याने माणसे आजारी पडू शकतात. म्हणून पावसाळ्यात नदीनाल्यामधले गढूळ पाणी आपण पीत नाही.

------------------------------------------------------

२) तुम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला गेलात, तिथल्या झऱ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असेल, तर तुम्ही ते पाणी प्याला का ?

उत्तर - त्या झाऱ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असेल तर ते पाणी आम्ही पिणार नाही. कारण, त्यामुळे आम्ही आजारी पडू शकतो.

------------------------------------------------------

•जरा डोके चालवा 

पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत. याचा काय फायदा असू शकेल?

उत्तर - पाण्यात काही पदार्थ न विरघळल्याने आपल्या पोटात ते जात नाही व आरोग्यास हानी होणार नाही. 

------------------------------------------------------

•काय करावे बरे ?

आईने दुकानातून जिरे आणले होते. पण त्यात चुकून वाळू सांडली वाळू वेगळी करून आईला पुन्हा स्वच्छ जिरे द्यायचे आहे.

 उत्तर - रवा चाळायच्या चाळणीने जिरे चाळून घेतले तर वाळू चाळली जाईल व जिरे स्वच्छ होण्यासाठी पुन्हा एकदा ते निवडून घ्यावे लागतील.

------------------------------------------------------

 स्वाध्याय 

•जरा डोके चालवा 

रवा आणि साबुदाणा मिसळल्या गेले आहेत. ते चाळून वेगळे करण्यासाठी चाळणीची भोके कशी हवी ?

उत्तर - रवा आणि साबुदाणा वेगळे करण्यासाठी चाळणीची भोके बारीक हवी. जेणेकरून चाळणीतून फक्त रवा चाळल्या जाईल.

------------------------------------------------------

अ) खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 

१) लिंबाचे शरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे ?

उत्तर - लिंबाचे सरबत लिंबू, साखर, मीठ, पाणी या पदार्थांचे द्रावण आहे.

------------------------------------------------------

२)पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असेल तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही याचे कारण काय 

उत्तर - पाणी स्वच्छ दिसत असेल तरी विहिरी, नद्या, तलाव यासारखे पाण्याचे स्त्रोत उघडे असतात. त्यामुळे त्या पाण्यात केर, कचरा माती, गाळ, सांडपाणी असते. म्हणून पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असेल तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही.

३) सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो?

उत्तर - सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी सरबत सतत ढवळत राहावे. तसेच त्यात पिठीसाखर घातली की ती लवकर विरघळते.

४) तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते ?

उत्तर - तेल पाण्यात बुडत नाही तेल पाण्यावर तरंगते.

 ------------------------------------------------------

इ) तक्ता भरा 

पाठातील ' बुडणे - तरंगणे ' प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा. पाठात सांगितलेल्या वस्तूंशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा. त्यांची नावेही तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा.



------------------------------------------------------

 ई) रिकाम्या जागा भरा.

१) साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे. होतात.

२) पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण. म्हणतात. 

३) जलसंजीवनी हे उपयुक्त. द्रावणाचे एक उदाहरण आहे. 

४) सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार. होऊ शकतात.

 ५) तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या. असतात. 

६) गरुड पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी. फिरवतात.

------------------------------------------------------

उ) चूक की बरोबर सांगा. 

१) तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही. - चूक 

२) पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत.- चूक

 ३) गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो. - बरोबर 

४) खोडरबर पाण्यात तरंगते.- चूक 

५) चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो.- बरोबर 

------------------------------------------------------

ऊ) पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते ?

उत्तर - पाणी पारदर्शक होते म्हणजे पाण्यातील गाळ हा खाली बसला की पाणी स्वच्छ आणि शुद्ध दिसू लागते यालाच पाणी पारदर्शक असणे म्हणतात.

------------------------------------------------------

No comments:

Post a Comment