DAILY EDUCATION

Sunday, February 18, 2024

इयत्ता चौथी प.अ.१स्वाध्याय १२.छोटे आजार, घरगुती उपचार




१२. छोटे आजार, घरगुती उपचार 

स्वाध्याय 

अ) काय करावे बरे ?

मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली. तिची शुद्ध हरपली. पायाला जबरदस्त दुखापत झाली. 

उत्तर - हेलनच्या पायाची जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. ती कोरडी करून जखमेवर ' टिंक्चर आयोडीन ' लावावे. नंतर त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून घ्यावी आणि हेलनला लगेच जवळच्या दवाखान्यात न्यावे.

-------------------------------------------------

आ) जरा डोके चालवा. 

१) अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो?

उत्तर - अडुळशाच्या पानांचा अर्क खोकल्यासाठी उपयोगी पडतो. 

--------------------------------------------------

२) सर्दीची लक्षणे कोणती?

उत्तर - घसा खवखवणे, डोके दुखणे, नाकामधून आणि डोळ्यातून पाणी गळणे ही सर्दीची लक्षणे आहेत.

--------------------------------------------------

 ३) बाम कशासाठी वापरला जातो? 

उत्तर - डोके दुखत असल्यास आणि सर्दी झाली असल्यास आपले दुखणे कमी होण्याकरिता बाम वापरला जातो.

--------------------------------------------------

४) ताप उतरल्याची खूण कोणती 

उत्तर - ताप उतरल्यानंतर आजारी व्यक्तीला ताजेतवाने वाटू लागते. त्या व्यक्तीला जेवायची इच्छा होते आणि घाम येऊन शरीराचे तापमान कमी होते.

--------------------------------------------------

इ) कोष्टक पूर्ण करा.

 पुढे काही आजारांची नावे दिली आहेत. 

१)सर्दी २) चिकुनगुनिया ३) हिवताप ४) खेळताना पडून खरचटणे ५) पोटाला तड जाणे ६) विषमज्वर ७) गरम तव्याचा बोटांना चटका बसणे ८) पाय मुरगळणे.





ई)थोडक्यात उत्तरे लिहा.

१) सखूचा घसा का दुखू लागला ?

उत्तर - सखूने एक दिवस थंडगार आईस्क्रीम खाल्ले, म्हणून दुसऱ्या दिवशी सखूचा घसा दुखू लागला. 

------------------------------------------------

२) कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली ? 

उत्तर - कावीळ झाल्यामुळे ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.

--------------------------------------------------

३) सर्दीवर घरगुती उपचार कोणता?

उत्तर - सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात आणि छाती शेकतात.

---------------------------------------------------

४) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का?

उत्तर - पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे उचित नसते.

-----------------------------------------------------

 गाळलेले शब्द 

१) सखूच्या ताईचे डोळे पिवळसर दिसत होते.

२) साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला.

३) धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंचर आयोडीन लावावे.

-------------------------------------------------

No comments:

Post a Comment