DAILY EDUCATION

Sunday, February 18, 2024

इयत्ता चौथी प.अ. स्वाध्याय १३. दिशा व नकाशा




 १३. दिशा आणि नकाशा 

• सांगा पाहू.



पुढील प्रश्नांची उत्तरे द्या 

१) कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्या ?

उत्तर - डोंगर, किल्ला, दिव्याचा खांब, विहीर या चित्रांच्या दिशा आम्ही स्वतः ओळखून लिहिल्या.

----------------------------------------------------

२) कोणत्या चित्रांच्या दिशा ठरवताना तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागली किंवा अडचण आली ?

उत्तर - किल्ला, दिव्याचे खांब, विहीर, डोंगर या चित्रांच्या दिशा ठरवतांना आम्हाला अडचण आली.

----------------------------------------------------

 ३) मागील इयत्तेत तुम्ही शिकलेल्या मुख्य दिशा कोणत्या ? 

उत्तर - पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण.

----------------------------------------------------

• सांगा पाहू 

डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला ही चित्रे मुख्य दिशांवर नाहीत. ती चित्रे कोणत्या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आहेत. ते शोधा व खालील रकान्यात लिहा.



----------------------------------------------------

• जरा डोके चालवा.




तुम्ही तयार केलेल्या दिशाचक्राचा वापर वरील नकाशासाठी करा. 

बीड जिल्ह्यात दिशाचक्र ठेवून, कोणकोणते जिल्हे दिशा व उपदिशांवर येतात त्याची नोंद करा.

उत्तर - उत्तर दिशा - जालना,

 दक्षिण दिशा - उस्मानाबाद, 

पश्चिम दिशा -  अहमदनगर,

पूर्व दिशा - नांदेड,

आग्नेय दिशा - लातूर,

ईशान्य दिशा - परभणी,

वायव्य दिशा - औरंगाबाद, 

नैऋत्य दिशा - पुणे.

----------------------------------------------------

• जरा डोके चालवा.

 रसिक आणि रेशमा यांच्या घरातील अंतर १० किलोमीटर (किमी) आहे. नकाशा काढण्यासाठीचे प्रमाण १ सेंटीमीटर (सेमी) =  १ किमी असे आहे. नकाशामध्ये, त्यांच्या घरांमधील अंतर किती असेल?

 उत्तर - १ सेंटीमीटर = १ किलोमीटर असे आहे.

 म्हणजेच, १० सेंटीमीटर = १० किलोमीटर असे असेल. तर नकाशामध्ये रसिका आणि रेशमाच्या घरामधील अंतर १० सेंटीमीटर असेल.

----------------------------------------------------

 स्वाध्याय

अ) ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो ?

उत्तर - ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण नकाशाचा वापर करतो.

---------------------------------------------------

 आ) नकाशात प्रमाण कशासाठी देतात ?

उत्तर - नकाशाचा आकार लहान असल्यामुळे नकाशात ठिकाणांमध्ये अंतर हे कमी दाखवावे लागते. त्यामुळे  नकाशात प्रमाण देतात.

----------------------------------------------------


No comments:

Post a Comment