DAILY EDUCATION

Thursday, February 15, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय, १०. वस्त्र

 


१०. वस्त्र

•जरा डोके चालवा

नायलॉन व रेयॉन हे डांबरा सारख्या पदार्थापासून बनते. पण मग डांबराचा मूळ स्त्रोत कोणता?

उत्तर - कोळसा, कार्बोहाट्रेट, चारकोल, इ . वर रसायनिक प्रक्रिया करून डांबर तयार केले जाते. म्हणजेच, मूळ स्त्रोत कोळसा (खनिज) आहे.

------------------------------------------------

•सांगा पाहू 

कपडे अस्वच्छ होण्यासाठी कोणकोणती कारणे तुम्ही सांगू शकाल ?

उत्तर - १) दिवसभरात एकच कपडे घालून असेल

          २) मैदानात मातीत खेळत असेल. 

          ३)घरातील काही काम करताना.

          ४) वातावरणातील धूळ प्रदूषण.

         ५) शरीराला येणाऱ्या घामामुळे कपडे.              अस्वच्छ होतात.

------------------------------------------------

• सांगा पाहू 

१)तुम्ही पहिलीत असतानाचे कपडे आता वापरता का ?

उत्तर - नाही, आम्ही पहिलीत असतानाचे कपडे आता वापरत नाही.

               -------------------------

२) वापरत नसल्यास कोणते कपडे तुम्ही आता वापरता?

उत्तर - पूर्वीच्या कपड्यापेक्षा जरा मोठे कपडे आम्ही वापरतो.   

                -------------------------

३) पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारण काय ?

 उत्तर - एक वर्षानंतर शरीराची वाढ झाली असते. पूर्वीचे कपडे आता अंगानेटके होत नसतात म्हणून ते आता वापरता येत नाहीत. 

               --------------------------

४) लहान असताना तुम्हाला अत्यंत आवडलेला एखादा ड्रेस तुम्ही आता का वापरू शकत नाही ?

 उत्तर - वय वाढले की शरीराची वाढ होते म्हणून शरीराची वाढ झाल्याने लहानपणीचा आवडता ड्रेस आता आम्ही वापरू शकत नाही.

               ---------------------------

 ५)तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचे काय होते?

उत्तर - आम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचे आई एक गाठोडे तयार करते व दारावर जुने कपडे देऊन नवीन भांडे देणाऱ्या बाईला आई ते कपडे देते व नवीन भांडे घेते.

------------------------------------------------

स्वाध्याय

अ) खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या.



उत्तर :




आ ) चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात ?



उत्तर - साबण, डिटर्जंट पावडर

इ) कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते?

 कल्हई वाला, बोहारीण, कासार 

उत्तर - बोहारीण 

---------------------------------------------

ई) अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे. त्याने काय करायला हवे ? योग्य गट शोधा.

अ) स्वच्छ आंघोळ करणे.

      अत्तर लावणे. 

      कपडे बदलणे. 

ब)  स्वच्छ आंघोळ करणे.

      कपडे बदलणे. 

      राख लावणे. 

क) स्वच्छ आंघोळ करणे. 

      स्वच्छ कपडे घालणे. 

      औषधोपचार करणे.

उत्तर - स्वच्छ आंघोळ करणे.

          स्वच्छ कपडे घालणे. 

          औषधोपचार करणे. 

----------------------------------------------

उ) हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो ? चार वाक्य लिहा.

उत्तर - आपण जिथे राहतो त्या प्रदेशातल्या हवामानानुसार आपण कपडे वापरतो.

१) दक्षिणेकडे कमी थंडी असते तेथील लोक सैल, सुती; लुंगी सारखे कपडे वापरतात. 

२) काश्मीरला अतिशय थंडी असते तेथे उबदार लोकरीचे कपडे वापरतात. 

३) कडक उन्हाळा व दमट हवामान ज्याठिकाणी असते तेथे सुती कपडे वापरले जातात. 

४) राजस्थानसारख्या वाळवंटी भागात ऊन व रेतीपासून संरक्षण मिळविण्यासाठी घोळदार अंगरखे वापरतात  

---------------------------------------------- 

ऊ) मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते. आणखी कोणता प्राणी आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येतो?

उत्तर - रेशीमच्या किड्यापासून आपणास रेशीम धागा मिळतो. त्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येतो.

--------------------------------------------- 


No comments:

Post a Comment