DAILY EDUCATION

Tuesday, January 25, 2022

इयत्ता तिसरी नोंदी विषय शारीरिक शिक्षण



 विषय शारीरिक शिक्षण

•तोल सांभाळण्याच्या कृती करतो.

•दररोज नियमितपणे व्यायाम सराव करतो

• स्थानिक खेळांची नावे सांगतो 

•संधी व स्नायूंना उत्तेजित करणाऱ्या व्यायामाचा सराव करतो

 •स्थानिक व पारंपरिक खेळाचा कृतीद्वारे सराव करतो

• स्थानिक व पारंपरिक खेळांची यादी तयार करतो 

•उपक्रमावर आधारित स्पर्धकांची नावे सांगतो 

•शाळेमध्ये उपक्रमावर आधारित घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतो 

•आहार ही संकल्पना स्पष्ट करून सांगतो 

•प्रामाणिकपणा व खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहे 

•कोणत्या खेळात किती खेळाडू असतात ते सांगतो 

•विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो 

•विविध खेळाडूंच्या नावांची यादी करून वर्गात लावतो.

 •खेळ यांचे प्रकार व खेळाडू यांचा तक्ता तयार करून वर्गात लावतो 

•विविध एरोबिक्सचा कृती करतो 

•स्वतःच्या पोषाखाबाबत वापर अतिशय दक्ष असतो 

•चौरस आहार म्हणजे काय हे माहीत करून घेतो 

•आहाराच्या सवयीची माहिती मिळवतो 

•क्रीडांगणाच्या चांगल्या सवयीची माहिती मिळवतो 

•नखे व केस नियमितपणे कापतो 

•रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो 

•हवामानानुसार पोशाख कसा बदलतो याची माहिती मिळवतो 

•क्रीडांगणांशी संबंधित सवयीची माहिती घेऊन त्याचे पालन करतो 

•उंची वरून उड्या मारतो 

•धावणे, चढणे-उतरणे या कृती करतो 

•दररोज प्राणायाम नियमितपणे करतो 

•खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ खेळतो 

•खेळाच्यावेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो 

•कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो

 •आरोग्यदायी जीवनशैली मुळे सहसा आजारी पडत नाही व्यायामाचे फायदे पटवून देतो

 •जागा बदलत करावयाच्या हालचालींचा सराव करतो

• विविध पद्धतीने उड्या मारत जाण्याची कृती करतो

• चेंडू झेलणे चेंडू फेकणे या कृती सफाईदारपणे करतो 

•विविध आकाराच्या चेंडूना फटका मारणे व अडवणे ही कृती करतो 

•खेळांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो 

•लघु खेळाचा परिचय करून घेतो 

•साहित्य व विनासाहित्य लघुखेळाचे चित्रे गोळा करतो 

•नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो 

•दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो 

•आवडत्या खेळाची पूर्ण माहिती मिळवितो 

•विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो 

•विश्रांती व झोपेचे महत्त्व जाणतो 

•शिस्त, सहकार्य, श्रम या मूल्यांचा स्वतःमध्ये विकसित करतो

 •शरीराची आकृती दाखवून अवयवांची नावे सांगतो 

•शरीराच्या अवयवांच्या हालचालींची कृती करून दाखवतो 

•मैदानाची स्वच्छता ठेवतो व इतरांनाही सांगतो

• मैदान स्वच्छ करण्याच्या साहित्याची नावे सांगतो 

•सुचविलेले आसनप्रकार करतो 

•व्यायाम प्रकार व आसनांची कृती कशी केली ते सांगतो 

•प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याची ओळख करून घेतो 

•प्रथमोपचार पेटीतील साहित्याचा उपयोग कसा व कशासाठी करावा ते सांगतो 

•खेळताना कोण कोणत्या दक्षता घ्यावयाच्या आहेत याची माहिती सांगतो 

•आवडत्या खेळाचे नियम व्यवस्थित सांगतो 

•सुचविलेल्या व्यायाम प्रकाराच्या क्रिया योग्य रीतीने पूर्ण करतो 

•स्वतः कृती करतो व लिहितो

 •क्रीडांगणात असलेला कचरा उचलून टाकतो 

•शर्यतीमध्ये सहभागी होतो 

•शरीर स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगतो 

•कपड्यांची स्वच्छता करण्याची कारणे समजून घेतो

• क्रीडा संबंधित साहित्याची हाताळणी काळजीपूर्वक करतो 

•क्रीडा साहित्याची निगा कशी राखायची हे कृतीद्वारे समजून घेतो 

•विविध धाडसी व्यायाम प्रकार करून दाखवतो 

•विविध उंचीवरून उड्या मारतो 

•विश्रांती व झोप यातील फरक समजून घेतो. 

•वैयक्तिक शर्यतीत भाग घेतो 

•चांगल्या सवयींचे पालन करतो 

•खेळात सहकार्य वृत्ती व आपसी संबंध जपतो 

•खेळताना सांघिक भावना जपतो.


No comments:

Post a Comment