**समूहदर्शक शब्द
* पक्षांचा - थवा
* प्रवाशांची - झुंबड
* हत्तींचा - कळप
* हरिणांचा - कळप
* साधूंचा - जथा
* वेलींचा - कुंज
* लाकडांची - मोळी
* उसाची - मोळी
* मेंढ्यांचा - कळप
* मुंग्यांची - रांग
* फुलझाडांचा - ताटवा
* पालेभाजीची - जुडी, गड्डी
* प्रश्नपत्रिकांचा - संच
* आंब्याच्या झाडांची - राई
* उतारुंची - झुंड, झुंबड
* गाईगुरांचे - खिल्लार
* खेळाडूंचा - संघ
* केसांची - बट, जट
* केसांचा - झुबका
* ताऱ्यांचा - पुंजका
* तारकांचा - पुंज, समूह
* नाण्यांची - चळत
* विमानांचा - ताफा
* पोळ्यांची - चवड
* भाकऱ्यांची - चवड
* विद्यार्थ्यांचा - गट
* वस्तूंचा - संच
* मुलांचा - घोळका
* मडक्यांची - उतरंड
* माणसांचा - जमाव
* उपकरणांचा - संच
* किल्ल्यांचा - जुडगा
* करवंदाची - जाळी
* द्राक्षांचा - घोस
* नारळांचा - ढीग
* सैनिकांची - पलटण, तुकडी
* वाद्यांचा - वृंद
* फुलांचा - गुच्छ, झुबका
* केळ्यांचा - घड
* काजूंची - गाथण
* माशांची - गाथण
* उंटांचा - तांडा
* लमाणांचा - तांडा
* गवताची - गंजी, पेंढी
* गवताचा - भारा
* जहाजांचा - काफिला
* रुपयांची - चवड
* दुर्वांची - जुडी
* धान्याची - रास
* नोटांचे - पुडके
* पोत्यांची - थप्पी
* पुस्तकांचा - गठ्ठा
* वह्यांचा - गठ्ठा
No comments:
Post a Comment