** पिल्लू दर्शक शब्द
* माणसाचे - बाळ, लेकरू
* मांजराचे - पिल्लू
* शेळीचे - करडू
* गाईचे - वासरू
* घोड्याचे - शिंगरू
* गाढवाचे - शिंगरू
* पक्ष्याचे - पिल्लू
* मेंढीचे - कोकरू
* सिंहाचा - छावा
* वाघाचा - बछडा
* म्हशीचे - रेडकू
* हरणाचे - पाडस
-----------------------------------------------
** घर दर्शक शब्द
* माणसाचे - घर
* कावळ्याचे - घरटे
* कोंबडीचे - खुराडे
* चिमणीचे - घरटे
* वाघाची - गुहा
* सिंहाची - गुहा
*गाईचा - गोठा
* म्हशीचा - गोठा
* पक्षांचे - घरटे
* मुंग्याचे - वारूळ
* सापाचे - वारूळ
* घोड्यांचा - तबेला पागा
* घुबडाची - ढोली
* हत्तीचा - हत्तीखाना,अंबारखाना
* सुगरणीचा - खोपा
No comments:
Post a Comment