DAILY EDUCATION

Thursday, February 3, 2022

म्हणी - स्पर्धा परीक्षा सराव

*म्हणी 









१. अति तेथे माती

२. घरोघरी मातीच्या चुली

३. ऐकावे जनाचे करावे मनाचे 

४.आधी पोटोबा मग विठोबा

५. काखेत कळसा गावाला वळसा 

६. खाई त्याला खवखवे 

७. कामापुरता मामा 

८. नाव मोठे लक्षण खोटे 

९. देश तसा वेश 

१०. गोगल गाय पोटात पाय 

११. गरजवंताला अक्कल नसते

१२. गर्वाचे घर खाली

१३. गाढवाला गुळाची चव काय?

१४. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

१५. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही

१६. डोंगर पोखरून उंदीर काढणे

१७. दुरून डोंगर साजरे 

१८. पदरी पडले पवित्र झाले 

१९. पुढच्यास ठेच मागचा शहाणा 

२०. नावडतीचे मीठ अळणी 

२१. नाकापेक्षा मोती जड 

२२. आगीतून फुफाट्यात 

२३. अडला हरी गाढवाचे पाय धरी 

२४. एक ना धड भाराभर चिंध्या 

२५. इकडे आड तिकडे विहीर 

२६. खाण तशी माती

२७. दाम करी काम

२८. थेंबे थेंबे तळे साचे 

२९. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी 

३०. नाचता येईना अंगण वाकडे 

३१. पळसाला पाने तीनच 

३२. गाव करी ते राव न करी 

३३. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

३४. शेरास सव्वाशेर 

३५. हातच्या काकणाला आरसा कशाला?

३६. साखरेचे खाणार त्याला देव देणार 

३७. सगळे मुसळ केरात 

३८. लेकी बोले सुने लागे 

३९. रात्र थोडी सोंगे फार 

४०. भिक नको पण कुत्रा आवर 

४१. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी 

४२. बळी तो कान पिळी 

४३. गुरुची विद्या गुरुलाच फळली 

४४. दैव देते कर्म नेते 

४५. नव्याचे नऊ दिवस

४६. दगडापेक्षा वीट मऊ 

४७. कोळसा उगाळावा तितका काळाच 

४८. करावे तसे भरावे 

४९. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग 

५०. अंथरूण पाहून पाय पसरावे 

५१. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी

५२. उचलली जीभ लावली टाळ्याला

५३.दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ 

५४.पालथ्या घागरीवर पाणी 

५५. सुंठीवाचूनखोकला जाणे 

५६. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

५७.भित्यापाठी ब्रह्मराक्षस 

५८.खायला काळ भुईला भार 

५९.गरज सरो वैद्य मरो 

६९.न कर्त्याचा वार शनिवार 

६१.जे न देखे रवी, ते देखे कवी 

६२. कानामागून आली आणि तिखट झाली 

६३. चोराच्या मनात चांदणे 

६४. हाजीर तो वजीर

६५. सरड्याची धाव कुंपणापर्यंत 

६६. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र 

६७. रोज मरे त्याला कोण रडे 

६८. कोल्हा काकडीला राजी 

६९. चोर सोडून संन्याशाला फाशी 

७०. उथळ पाण्याला खळखळाट फार 

७१. आपला हात जगन्नाथ 

७२. असतील शिते तर जमतील भूते 

७३. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही 

७४. तळे राखी तो पाणी चाखी 

७५. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे 

७६. पाचही बोटे सारखी नसतात

७७. देव तारी त्याला कोण मारी

७८. तहान लागल्यावर विहीर खणणे

७९. झाकली मूठ सव्वा लाखाची 

८०. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शाम भटाची तट्टाणी

८१. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती 

८२. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे

८३. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये 

८४. गाजराची पुंगी वाजली तर वाजली 

 नाहीतर मोडून खाल्ली 

८५. सत्तेपुढे शहाणपण नाही

८६. प्रयत्नांती परमेश्वर 

८७. गरजेल तो पडेल (बरसेल)काय ?

८८. कोंड्याचा मांडा करुन खाणे

८९. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही 

९०. बैल गेला आणि झोपा केला 

९१. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे

९२. हसतील त्याचे दात दिसतील

९३. शितावरून भाताची परीक्षा 

९४. वासरात लंगडी गाय शहाणी

९५. पाचामुखी परमेश्वर 

९६. दिव्याखाली अंधार 

९७. ताकापुरती आजी 

९८. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे 

९९. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार

१००. आयत्या बिळात नागोबा 

१०१. एका हाताने टाळी वाजत नाही 

१०२. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

१०३.  भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा 

१०४. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही 

१०५. लहान तोंडी मोठा घास 

१०६. दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत

१०७. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये 

१०८. शेंडी तुटो की पारंबी तुटो 

१०९. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन

११०. अति शहाणा त्याचा बैल रिकामा 

१११. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये 

११२. कुडास कान ठेवी ध्यान 

११३. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा

११४. पडत्या फळाची आज्ञा

११५. पदरी पडले पवित्र झाले 

११६. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना

११७. उंदराला मांजर साक्ष

११८. दुष्काळात तेरावा महिना 

११९. दृष्टी आड सृष्टी 

१२०. देखल्या देवा दंडवत 

१२१. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर 

१२२. शीर सलामत तो पगडी पचास

१२३.थोरा घराचे श्वान, त्याला सर्व देते मान 

१२४.लाथ मारीन तिथे पाणी काढीन 

१२५. असंगाशी संग प्राणाशी गाठ

1 comment: