DAILY EDUCATION

Saturday, February 5, 2022

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

      • शब्दसमूहाबद्दल एक शब्द •



   







*अ 

• आधी जन्मलेला - अग्रज

• नंतर / मागून जन्मलेला - अनुज 

• ज्याला मरण नाही असा- अमर 

• पूर्वी कधी न पाहिले/ ऐकले असे - अपूर्व 

• ज्याला कोणी शत्रू नाही असा - अजातशत्रू

• तिथी,वार न ठरवता आलेला - अतिथी, आगंतुक

•थोडक्यात समाधान मानणारा - अल्पसंतुष्ट 

•अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा - अष्टावधानी 

• पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक

• अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट - अनपेक्षित

• कधीही जिंकला ना जाणारा - अजिंक्य 

• कमी आयुष्य असलेला - अल्पायू, अल्पायुषी 

• खूप पाऊस पडणे - अतिवृष्टी 

• पाऊस मुळीच न पडणे - अनावृष्टी,अवर्षण

• पायात जोडे न घातलेला - अनवाणी

• पूर्वी कधी घडले नाही असे - अभूतपूर्व 

• चित्रपटात काम करणारा - अभिनेता 

• मोजता येणार नाही असे - अगणित, असंख्य  

• आग विझवणारे यंत्र - अग्निशामक यंत्र

•ज्याचा तळ लागत नाही असा - अथांग

   *आ 

• देव आहे असे मानणारा - आस्तिक 

• लहानणापासून वृद्धांपर्यंत - आबालवृद्ध 

• हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत - आसेतुहिमाचल 

• कुस्ती खेळण्याची जागा - आखाडा 

• अगदी पूर्वीपासून राहणारे - आदिवासी 

   *उ 

• दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा - उदार 

• नदीची सुरुवात होते ती जागा - उगम 

• जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी - उभयचर 

• पहाटेपूर्वीची वेळ - उष:काल

• उदयाला येत असलेला - उदयोन्मुख 

    *ऐ  

• श्रम न करता खाणारा - ऐतोबा, ऐतखाऊ

• खूप मोठा विस्तार असलेले - ऐसपैस 

     *अं 

• लहान मुलांना झोपवण्यासाठीचे गाणे - अंगाईगीत

• अंग राखून काम करणारा - अंगचोर 

• राष्ट्रा-राष्ट्रातील - आंतरराष्ट्रीय 

    *श्र 

• भाषण ऐकणारे - श्रोते

• श्रम करुन जगणारा - श्रमजीवी 

    *क 

• केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ 

•केलेले उपकार न जाणणारा - कृतघ्न 

• इच्छिलेली वस्तू देणारे झाड - कल्पवृक्ष 

• कर्तव्याकडे पाठ फिरवणारा - कर्तव्यपरांड्•मुख  

• कवितेची रचना करणारा - कवी

• कवितेची रचना करणारी - कवयित्री 

• इच्छिलेले ली वस्तू देणारी गाय - कामधेनु 

• कथा सांगणारा - कथेकरी 

• कथा लिहिणारा - कथाकार

•कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा - कर्तव्यदक्ष

• कष्ट करून जगणारा - कष्टकरी 

• ‍कादंबर्या लिहिणारा/ लिहिणारी - कादंबरीकार 

• कैदी ठेवण्याची जागा - कारागृह 

• मालाचा साठा करून ठेवण्याची जागा - कोठार 

• मासे पकडणारा - कोळी

   *ख

• आकाशात गमन करणारा - खग

   *ग

• मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग - गाभारा

• गाणे गाणारा - गायक

• गाईसाठी काढून ठेवलेला घास - गोग्रास

•धन्य साठविण्याची बंदिस्त जागा - गोदाम 

• डोंगरकपारीत राहणारे लोक - गिरिजन 

• हिंडून करायचा पहारा - गस्त 

    *घ 

•शत्रूला जाऊन सामील झालेला - घरभेदी

• कल्पना नसताना आलेले संकट - घाला

• नेहमी घरात बसून राहणारा - घरकोंबडा 

     *च

• सैन्याची चक्राकार केलेली रचना - चक्रव्यूह

• चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चौक 

• चरित्र लिहिणारा - चरित्रकार 

• चित्र काढणारा - चित्रकार 

• ज्याच्या हातात चक्र आहे असा - चक्रपाणी, चक्रधर

• जाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासू

• जिवाला जीव देणारा - जिवलग 

• जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार 

• पाण्यात राहणारे प्राणी - जलचर 

• रात्रीचा पहारेकरी - जागल्या

     *त्र 

• दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक 

     *ट 

• नाणी पाडण्याची जागा - टाकसाळ 

    *ड 

• नदीतील खोलगट भागातील खोल पाणी -डोह 

    *ढ

• ढगांनी भरलेले- ढगाळलेले 

    *त

• शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज - तगाई

• किल्ल्याच्या भोवतीची भिंत - तट

• हाल-अपेष्टा सहन करण्याचा गुण- तितिक्षा 

• तीन रस्ते एकवटतात ती जागा - तिठा 

• घोडे बांधण्याची जागा - तबेला,पागा 

      *द 

• खूप दानधर्म करणारा - दानशूर

• दोनदा जन्मलेला- द्विज

• दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक 

• अस्वलाचा खेळ करणारा - दरवेशी 

• तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश - द्वीपकल्प

• दोन नद्यांमधील जागा - दुआब/दोआब

• दैवावर भरवसा ठेवून राहणारा - दैववादी

• तोंडा तोंडी चालत आलेली गोष्ट - दंतकथा

• खूप आयुष्य असलेला -दीर्घायु,दीर्घायुषी

• दररोजचा ठरलेला कार्यक्रम - दिनक्रम

• दारावरील पहारेकरी - द्वारपाल,दारवान

• दुष्काळात सापडलेले लोक - दुष्काळग्रस्त

• सतत काम करणारा - दिर्घोद्योगी 

• देशाची सेवा करणारा - देशसेवक 

     *ध

• उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह - धबधबा

• एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे - धर्मांतर

      *न 

• देव नाही असे मानणारा - नास्तिक 

• कुणाचाही आधार नसलेला - निराधार 

• घरादारास, स्वदेशास पारखा झालेला - निर्वासित 

• पायाच्या नखा पासून शेंडीपर्यंत - नखशिखांत

• नाटकात भूमिका करणारा पुरुष - नट 

• नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत - नांदी

• कसलीच इच्छा नसलेला - निरिच्छ 

• घरदार नष्ट झाले आहे असा - निर्वासित

• अनेकांमधून निवडलेले -निवडक 

• ज्याला लाज नाही असा -निर्लज्ज

• ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे - नियतकालिक 

• देवापुढे सतत तेवत असणारा दिवा - नंदादीप

• नाटक लिहिणारा - नाटककार 

• सतत निंदा नालस्ती करणारा - निंदक

• स्वर्गातील इंद्राची बाग - नंदनवन 

• होडी/नाव चालवणारा - नावाडी, नाखवा, नाविक 

    *प 

• एकमेकांवर अवलंबून असणारे - परस्परावलंबी 

• पुरामुळे नुकसान झालेले लोक - पूरग्रस्त 

• पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक 

• मोफत पाणी मिळण्याची सोय - पाणपोई 

• गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा - पाणवठा

• तिथी, वार, नक्षत्र, योग यांची पुस्तिका - पंचांग 

• ज्याला आईवडील नाही असा - पोरका 

• दुसऱ्यावर अवलंबून असणारा - परावलंबी

• दुसऱ्यावर उपकार करणारा - परोपकारी 

• पायी जाणारा - पादचारी 

• पाण्याखालून चालणारी बोट - पाणबुडी 

• चित्रपटाच्या कथा लिहिणारा - पटकथालेखक 

• रोग्यांची शुश्रुषा करणारी - परिचारिका

• पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक

• राज्यातील लोक- प्रजाजन प्रजा 

• प्रेरणा देणारा - प्रेरक 

     *फ

• शत्रूला सामील झालेला -फितूर 

     *ब 

• डोंगर पोखरुन आरपार केलेला रस्ता - बोगदा

• बस थांबण्याचे ठिकाण -  बसस्थानक

     *भ 

• जमिनीखालील गुप्त मार्ग - भुयार 

• जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर 

• जमिनीचे दान- भूदान 

• स्तुती गाणारा - भाट 

      *म

•निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन - मानधन

• मोजके असे बोलणारा - मितभाषी

• लग्न झालेल्या मुलीच्या आई-वडिलांचे घर - माहेर 

• दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा - मनकवडा

• ऐकायला, बोलायला न येणारा - मूकबधिर

• दर महिन्याला प्रसिद्ध होणारे - मासिक

• मन आकर्षित करणारा - मनोहर,मनोवेधक

• माकडांचा खेळ करून दाखवणारा - मदारी

• मूर्ती बनवणारा - मूर्तिकार 

• मूर्तीची पूजा करणारा - मूर्तिपूजक 

• मूर्तीची तोडफोड करणारा - मूर्तिभंजक 

• महान ऋषी - महर्षी

• मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय 

• शिकारीसाठी उंच बांधलेला - माळा, मचाण 

• हत्तीला काबूत ठेवणारा - माहूत 

• हरिणासारखे डोळे असणारी - मृगाक्षी, मृगनयनी 

      *य

• योजना आखणारा - योजक 

• युद्ध करण्याची कला - युद्धकला

      *र

• अचूक गुणकारी असणारे - रामबाण 

• रक्षण करणारा - रक्षक 

     *ल

• लिहिण्याची हातोटी - लेखनशैली 

• लाखो रुपयांचा धनी - लक्षाधीश 

• लोकांचा आवडता - लोकप्रिय

• लोकांचे नेतृत्व करणारा - लोकनायक

• लोकांनी मान्यता दिलेला - लोकमान्य 

     *व 

• भाषण करण्याची जागा - व्यासपीठ 

• भाषण करण्याची कला - वक्तृत्व 

• दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप - वामकुक्षी

• पती मरण पावला आहे अशी स्त्री - विधवा 

• पत्नी मरण पावली आहे असा पुरुष - विधुर 

• अरण्याचा राजा - वनराज 

• करण्याची शोभा - वनश्री 

• बक्षीस/ इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन - वतन

• गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा - वावटळ 

• वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे - वार्षिक

• बातमी आणून देणारा /देणारी - वार्ताहर

• बातमी सांगणारा - वृत्तनिवेदक

• बातमी सांगणारी - वृत्तनिवेदिका

• भाषण करणारा - वक्ता 

• रणांगणावर आलेले मरण - वीरमरण

• लग्नासाठी जमलेले लोक - वऱ्हाडी 

• वनात राहणारे प्राणी - वनचर 

• वाडवडीलांकडून मिळालेली जमीन/संपत्ती - वडिलोपार्जित 

• विमान चालवणारा -वैमानिक

• व्याख्यान देणारा - व्याख्याता 

• संकट दूर करणारा - विघ्नहर्ता 

    *श

• दगडावर केलेले कोरीव काम - शिल्प 

• दगडाच्या मूर्ती घडवणारा - शिल्पकार

• दगडावर कोरलेला लेख - शिलालेख 

• चांदण्या रात्रीचा पंधरवडा - शुद्धपक्ष, शुक्लपक्ष 

• दगडाच्या मूर्ती घडवणारा - शिल्पकार 

• शेती करणारा - शेतकरी

• शंकराची उपासना करणारा - शैव 

• दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - षणमासिक

     *स

• दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा - संगम 

• समाजात समता रहावी असे म्हणणारा - साम्यवादी 

• दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास - सुस्कारा

• दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक

• फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण - सदावर्त 

• लिहिता वाचता येणारा - साक्षर 

• शोध लावणारा - संशोधक 

• समाजाची सेवा करणारा - समाजसेवक 

• स्वतःची बुद्धी न वापरता सांगितलेले तेवढेच काम करणारा - सांगकाम्या

• सुखाच्या मागे लागलेला - सुखलोलुप 

• स्वतः संपादन केलेली - स्वर्जित, स्वसंपादित

• स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा - स्वार्थी 

• स्वतःबद्दल अभिमान असलेला - स्वाभिमानी 

• स्वतःबद्दल अभिमान नसलेला - स्वाभिमानशून्य

• स्वदेशाचा अभिमान असणारा - स्वदेशाभिमान 

• स्वतःशी केलेले भाषण - स्वगत 

• आपल्या लहरीप्रमाणे वागणारा - स्वच्छंदी 

• कोणावरही अवलंबून नसलेला - स्वावलंबी 

    *ह 

• देशासाठी प्राणार्पण केलेला - हुतात्मा

• शत्रु कडील बातमी आणणारा - हेर /खबऱ्या 

• हृदयाला भिडणारे - हृदयस्पर्शी 

     *क्ष

• जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा -क्षितिज




No comments:

Post a Comment