DAILY EDUCATION

Thursday, February 24, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली विषय गणित

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली 







विषय गणित

• चित्रावरून लहान-मोठा संबोध स्पष्ट करून घेतो.

•लहान-मोठ्या वस्तूंच्या जोड्या लावतो.

•विविध चित्रे पाहून त्यातील लहान-मोठे चित्र ओळखतो.

• लहान वस्तू मोठ्या वस्तूंचे चित्र वेगवेगळ्या रंगात रंगवतो. 

• चित्रावरून मागे पुढे संबोध स्पष्ट करून घेतो. 

• मागेपुढे असे चित्र पाहून चौकटीत योग्य पर्याय भरतो.

• विविध उदाहरणावरून लहान-मोठा संबोध सराव करतो. 

• वर खाली या संबोधाची ओळख करून घेतो.

• वर-खाली संबोधाचे दृढीकरण करून घेतो. 

• वर-खाली असणाऱ्या वस्तूंची नावे व माहिती सांगतो.

• चित्रे पाहून नावे सांगतो.

• चित्रावरून आधी व नंतर सांगतो.

• आधी नंतर हे चित्र रंगवतो.

• चित्राचे निरीक्षण करतो.

• चित्र पाहून चित्राचे वर्णन करतो.

• चित्रावरून एक हा संबोध समजून घेतो.

• एक अनेक या संबोधाची ओळख करून घेतो.

• चित्र पाहून एक अनेक सांगतो.

• एक वस्तू व अनेक वस्तू असणाऱ्या परिसरातील उदाहरणांची यादी बनवतो.

• चित्रावरून फरक ओळखतो.

• चित्र ओळखणे या खेळात सहभागी होतो.

• एक व दोन या अंकाच्या आकाराच्या वस्तू शोधतो.

• दिलेल्या अंकांचे आकार काढून ते गिरवतो. 

• पाठ्यपुस्तकातील चित्राचे वर्णन करतो.

• अंकांचे लेखन कसे करायचे हे समजून घेतो.

• अंकांची गाणी लयीत म्हणून दाखवतो.

• चित्र मोजतो व योग्य संख्या भोवती बरोबरची खूण करतो. 

• चित्र पाहतो व चित्रांची संख्या मोजून सांगतो.

• विविध अंक मालिकेत योग्य अंगाभोवती बरोबरची खूण करतो. 

• चित्र मोजून अंक सांगतो. 

• सुचविलेल्या अंकांच्या परिसरातील वस्तूंची यादी बनवतो.

• दिलेले तुटक अंक गिरवतो.

• सुचविलेले उत्तर येईल अशी प्रश्नाद्वारे योजना करतो. 

• अंक व चित्र यांच्या योग्य जोड्या लावतो. 

• सुचविलेल्या अंक,अंक कार्डातून शोधतो. 

• सुचविलेल्या अंकाचे गाणे म्हणतो.

• आठवड्यातील दिवसांची क्रमाने नावे सांगतो. 

• इंद्रधनुष्यातील रंगाची नावे सांगतो.

• आठवड्याचा तक्ता तयार करून आणतो.

• छत्री व कोळ्याचे चित्र पाहून 8 या अंकाची ओळख करून घेतो.

• गोलाकार वस्तू वरून व चित्रावरून शून्याची ओळख करून घेतो.

• शून्य संबोध म्हणजे काय हे उदाहरणासहीत स्पष्ट करतो.

• शून्याचे गाणे तालासुरात गा. 

• बाकी शून्य राहते अशी उदाहरणे सांगतो. 

• चित्रे पाहून कमी-जास्त संबोध स्पष्ट करतो करून घेतो.

• चित्रे मोजून योग्य चित्राखाली बरोबरची खूण करतो.

• वस्तूंच्या साह्याने कमी-जास्त चा सराव करून घेतो.

• मिसळणे, मिळवणे, एकत्र करणे म्हणजे बेरीज हे समजून घेतो.

• चढता-उतरता क्रम समजून घेतो.

• चित्र कार्ड मोजून बेरजेची उदाहरणे सोडवतो.

• चित्र कार्ड पाहून वजाबाकीची उदाहरणे सोडवतो. 

• दिलेले मणी क्रमाने मोजतो. 

• माळेत दशक एकक रंगाचे मणी दाखवतो.

• मण्यांची माळ तयार करून दाखवतो.

• मणी, आईस्क्रीम काड्या यांचा वापर करून दशकाचा समूह बनवितो. 

• विविध वस्तू पासून दशक बनवून दशक उडी स्पष्ट करतो. 

• विविध प्रकारची नाणी अचूकरित्या ओळखतो. 

• नाणी व नोटा यातील फरक समजावून घेतो.

• सुचविलेल्या रकमेसाठी आवश्यक अचुक नाणी व नोटा देतो.

• रक्कम सांगितल्यावर नाणी वापरणार की नोटा वापरणार हे सांगतो.

• दिलेल्या अंकांचे फलकावर लेखन करतो.

• संख्या कार्डाद्वारे लहान मोठी संख्या सांगतो.

• गाळलेले अंक अचूकरित्या सांगतो.

• योग्य संख्या लिहून चौकटी पूर्ण करतो

• क्रमवार संख्या मध्ये मधली संख्या लिहितो. 

• सुचविलेली संख्या माळेवर अचूक पणे सांगतो. 

• सुचविलेल्या संख्येच्या पुढची व मागची संख्या सांगतो. 

• आकृतिबंध तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती सांगतो. 

• आकृतिबंधाच्या मदतीने नक्षी काम करतो.

• संख्या मालिकेत आकृतिबंध शोधतो.

•आकृतिबंध तयार करून आणतो.

• योग्य रंगाद्वारे आकृतीबंध पूर्ण करतो.

• चित्रा वरून कोणते आत आहे व कोणते बाहेर आहे ते सांगतो.

• रुंद व अरुंद हे शब्द वापरून तुलना करतो.

• पाठ्यपुस्तकातील आकाराचे निरीक्षण करतो. 

• आपल्याजवळील वस्तू व चित्रातील वस्तू यांची तुलना करतो. 

• परिसरातील घरातील विविध आकारांच्या वस्तूंची यादी करतो. 

• चित्रे व आकार यांच्या योग्य जोड्या लावतो. 

• त्रिकोणी, चौकोनी, गोलाकार वस्तूंच्या नावांची यादी बनवतो.

• लांब आखूड वस्तू दाखवतो.

• डावा उजवा हे शब्द कोठे कोठे वापरले जातात ते सांगतो. 

• डावा-उजवा चा वापर करतो. 

• सप्ताहाचे वार या गीताचे तालासुरात गायन करतो.

• सप्ताहाच्या वारांची क्रमाने नावे सांगतो.

• विविध दैनंदिन वस्तू मोजतो.

No comments:

Post a Comment