प्रार्थना
वंदन हे तुजला
वंदन हे तुजला, शारदे वंदन हे तुजला
वंदन करितो तव चरणाला
देवी शारदा सरस्वतीला
विद्या वैभव देई सकला
आज्ञ बालकाला
वंदन हे तुजला.......
तुझ्या कृपेने मुके बोलती
पांगुळ पवना पुढे धावती
तुझ्या दर्शने पावन होती
वंदन पद कमला
वंदन हे तुजला.......
No comments:
Post a Comment