DAILY EDUCATION

Thursday, June 29, 2023

सुविचार संग्रह








 



•आळस हा माणसाचा शत्रू आहे.

• आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे.

• शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

• शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.

• परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत.

• सर्वांकडे समान कौशल्य नाही पण कौशल्य विकसित करण्याची समान संधी मात्र आहे.

• समाजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ते ज्ञान कामाचे नाही.

• ज्यांना हरण्याची भीती आहे, त्यांचा पराभव निश्चित आहे.

• तुम्हाला पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका, पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.

• एखादी चांगली गोष्ट आपण दररोज करत राहिलो तर त्या गोष्टीचे मिळणारे फळ हे महाकाय असते.

 •हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्या हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा.

• कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे तो वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पाडतो.

• शहाणपण कोणालाही शिकवता येत नाही ते उपजतच असावं लागतं.

• परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसाच्या सहवासात राहण्यापेक्षा, परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात रहा.

• तीन गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत सूर्य, चंद्र आणि सत्य. 

• प्रत्येक दिवस ही तुम्हाला मिळालेली दुसरी संधी असते.

• कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र मोठे लागते.

• गरुडाइतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधीही उडणे सोडत नाही.

• प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा प्रगती करत नाही.

• संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

• सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा. 

• काळोखास दोष देण्यापेक्षा एक लहान मेणबत्ती पेटवणे अधिक श्रेयस्कर असते.

• दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला, जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल.


No comments:

Post a Comment